लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : वर्धा जिल्ह्यातील चार विधानसभा मतदारसंघातील तीन मतदारसंघांचा कौल भाजपच्या बाजूने लागला आहे. तर देवळीमध्ये काँग्रेसचा उमेदवार विजयी झाला आहे. आर्वीची जागा काँग्रेसकडून भाजपचे उमेदवार दादाराव केचे यांनी खेचून आणली आहे.आर्वी मतदारसंघात काँग्रेसचे आ. अमर काळे यांचा भाजपचे उमेदवार दादाराव केचे यांनी १२ हजारांहून अधिक मतांनी पराभव केला. तर हिंगणघाट मतदारसंघात भाजपचे विद्यमान आमदार समीर कुणावार ५० हजारांहून अधिक मतांनी विजयी झाले. कुणावार यांना १ लाखावर मताधिक्य या मतदारसंघात मिळाले. या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार प्रा. राजू तिमांडे ५० हजारांवर मते घेऊन दुसऱ्या स्थानावर राहिले. वर्धा विधानसभा मतदार संघात मतदारांनी पुन्हा भाजपचे उमेदवार डॉ. पंकज भोयर यांना संधी दिली आहे.सेलू भागातही पंकज भोयर यांनी जोरदार मुसंडी मारली. या भागात काँग्रेस उमेदवाराला १ हजारावरच लीड मिळाले. शिवाय ७ हजारांवर अधिक मतांनी पंकज भोयर विजयी झाले. देवळी मतदार संघात काँग्रेस उमेदवार रणजित कांबळे ३६ हजारांवर अधिक मतांनी विजयी झाले आहेत.या मतदारसंघात अपक्ष उमेदवार राजेश बकाणे दुसºया स्थानावर तर शिवसेनेचे समीर देशमुख तिसºया स्थानावर राहिले. या निवडणुकीत गेल्यावेळीपेक्षा भाजपने एक जागा अधिक मिळवित जिल्ह्यावर आपले वर्चस्व प्रस्थापित केले आहे. या निवडणुकीत काँग्रेसचे वर्धा येथील उमेदवार शेखर शेंडे यांना तिसऱ्यांदा पराभव पत्करावा लागला.या निवडणुकीत राहुल गांधी यांची आर्वी येथे जाहीर सभा होऊनही काँग्रेसचे उमेदवार अमर काळे पराभूत झाले. या निकालाने जिल्ह्यातील जातीय समीकरणांना पूर्णपणे मुठमाती दिल्याचे दिसून येत आहे. तेलीबहुल असलेल्या वर्धा मतदारसंघात तेली समाज असलेल्या गावातही डॉ. भोयर यांना चांगले मताधिक्य मिळविण्यात यश आले. तर हिंगणघाट मतदार संघातही तेली व कुणबी समाजाचे उमेदवार रिंगणात असताना भाजपचे समीर कुणावार यांनी मोठ्या मताधिक्याने विजयश्री खेचून आणली.यंदाच्या निवडणुकीत देवळी विधानसभा मतदार संघात काँग्रेसला विजयश्री मिळविता आली. या ठिकाणी भाजपकडून सेनेच्या विरोधात बंडखोरी झाल्याने काँग्रेसचा मार्ग सुकर झाला. वंचित बहुजन आघाडी, बहुजन समाज पक्ष यांना आपला प्रभावही दाखविता आला नाही, हे या निवडणुकीच्या निकालाने स्पष्ट केले आहे. भाजपला मोठा जनादेश देत विकासाची अपेक्षा मतदारांनी व्यक्त केली आहे.वर्ध्यात कासवगतीने कायम राहिले मताधिक्यवर्धा विधानसभा क्षेत्राची मतमोजणी सुरू होताच पहिल्या फेरीत काँगे्रसचे उमेदवार शेखर शेंडे यांनी मुसंडी घेतली होती. परंतु, दुसऱ्या फेरीच्या निकालात भाजपचे उमेदवार यांनी काँग्रेसच्या उमेदवारांना मागे सोडले. त्यानंतर तिसऱ्या फेरीच्या निकालात काँग्रेसच्या उमेदवाराने ८६ मताधिक्य घेत भाजपचे उमेदवार आ. भोयर यांना मागे सोडले. त्यांची ही मुसंडी सातव्या फेरीच्या निकालापर्यंत कायम होती. परंतु, जसा आठव्या फेरीचा निकाल स्पष्ट झाला, त्यानंतर भाजपच्या उमेदवाराने घेतलेले मताधिक्य कासवगतीने का होईना, पण कायम राहिले, हे विशेष!निकालाचा चढ-उतार ठरला रंजकवर्धा विधानसभा क्षेत्राची मतमोजणी गुरुवारी सकाळी ८ वाजपासून वर्धा शहराशेजारी असलेल्या एमआयडीसी भागातील भारतीय खाद्य निगमच्या गोदामात झाली. पहिल्या फेरीचा निकाल येताच काँग्रेसचा उमेदवार पुढे राहिला. तर त्यानंतर दुसºया फेरीच्या निकालात भाजपचा उमेदवार पुढे राहिला; पण त्यानंतर सातव्या फेरीच्या निकालापर्यंत काँग्रेसची आघाडी कायम राहिल्याने व भाजपच्या उमेदवाराने मुसंडी घेतल्याने ही निकालाची चढ-उताराची रंजकता उमेदवारांसह त्यांच्या समर्थकांचे हृदयाचे ठोके वाढविणारी ठरली होती.आतातरी लीडची आशा कायम होतीगत विधानसभा निवडणुकीच्या तुलनेत काँग्रेसच्या उमेदवाराला यंदा बऱ्यापैकी मत मिळाल्याचे बोलले जात आहे. असे असले तरी मतमोजणीदरम्यान या फेरीत भाऊ मागे पडले असे म्हणणाऱ्यांना पुढील फेरीत भाऊ नक्कीच मुसंडी मारतील, अशी आशा कायम होती.जसजसा सूर्य मावळतीला गेला, तसतसा भारतीय जनता पक्षाचे उमेदवार डॉ. पंकज भोयर यांनी कासवगतीने का होईना पण, आपले मताधिक्य कायम ठेवत विजय प्राप्त केला.
Maharashtra Election 2019 ; भाजपने वर्धा, हिंगणघाटचा गड राखला, आर्वीत भाजपचे दादाराव केचेंना पसंती, देवळीत काँग्रेस विजयी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 25, 2019 6:00 AM
वर्धा विधानसभा मतदार संघात मतदारांनी पुन्हा भाजपचे उमेदवार डॉ. पंकज भोयर यांना संधी दिली आहे. सेलू भागातही पंकज भोयर यांनी जोरदार मुसंडी मारली. या भागात काँग्रेस उमेदवाराला १ हजारावरच लीड मिळाले. शिवाय ७ हजारांवर अधिक मतांनी पंकज भोयर विजयी झाले. देवळी मतदार संघात काँग्रेस उमेदवार रणजित कांबळे ३६ हजारांवर अधिक मतांनी विजयी झाले आहेत.
ठळक मुद्देचारही मतदारसंघात विजयाचा जल्लोषदेवळीत काँग्रेस उमेदवाराचा सलग पाचव्यांदा ऐतिहासिक विजय