लोकमत न्यूज नेटवर्कदेवळी : विकासाची संकल्पना एकांगी स्वरूपाची नसते. याकरिता जनतेचा भक्कम विश्वास व साथ हवी असते. या बळावरच आपण देवळी पुलगाव मतदार संघाचा विकास करू, असे प्रतिपादन समीर देशमुख यांनी केले. देवळी येथे आयोजित शिवसैनिकांच्या बैठकीत ते बोलत होते. देवळी-पुलगाव मतदारक्षेत्राची ओळख ही आजची नसून पूर्वीपासून आहे. येथील समस्यांची आपल्याला जाण आहे. स्व. दाआजींनी खेड्यापाड्यात शाळा उभारल्या.या माध्यमातून आज ग्रामीण विद्यार्थी उच्चपदावर कार्यरत आहेत. ही अभिमानाची बाब असून खेडे समृद्ध व्हावे हीच संकल्पना आपण जोपासली असून गत अनेक वर्षापासून शेतकरी, शेतमजूर, विद्यार्थी भगिनींकरिता कार्य करीत आहे. मागील १५ ते १७ वर्षांपासून आपण समाजकारणात असून विधायक कार्य करणारे असंख्य तरूण आपण या माध्यमातून आत्मसात केले आहे. स्थानिक कॉँग्रेसच्या आमदारांनी काय कार्य केले, या खोलात आपण जाणार नसून आपल्यावर ठेवलेला विश्वास आपण सार्थ करून दाखवू, याची खात्री आपण देत असल्याचे सर्व शिवसैनिकांना त्यांनी बैठकीत सांगितले. खा. रामदास तडस यांची आपल्याला भक्कम साथ असून त्यांनी केलेली विकासकामे आपल्याला माहिती आहेत. देवळी आणि पुलगाव हे शहर न राहता विकासाने परिपूर्ण असे सुंदर शहर अशी विकासाची ब्लू प्रिंट आपण तयार केली आहे. लोकप्रतिनिधी हा जनतेचा सेवक असून सौजन्याची वागणूक मिळावी, अशी रास्त अपेक्षा जनतेची असते. आपल्या समस्येचे निराकरण व्हावे, समजून घ्यावे अशा माफक अपेक्षाचा भंग आपण कदापि होऊ देणार नाही. जनता सर्वश्रेष्ठ आहे ही भावना आपण बिंबविली आहे. या भावनेने आपले कार्य राहणार आहे. सर्वांची साथ आणि आशीर्वादाने विजयश्री खेचून आणू, असा विश्वास यावेळी उपस्थित शिवसैनिकांनी समीर देशमुख यांना दिला.बैठकीला शिवसेनेचे ज्येष्ठ नेते अनंत देशमुख, विराज निवल, गणेश कामनापुरे, पिंटू ठाकरे, सुनील कामनापुरे, किरण राऊत, महेश जोशी, मुन्ना तिडके, नीलेश मोटघरे, संदीप पातुरकर, मंगेश वानखेडे, प्रवीण कात्रे, ओरके यांच्यासह शिवसैनिकांची उपस्थिती होती.समीर देशमुख आज नामाकंन अर्ज दाखल करणारदेवळी - शिवसेनेचे देवळी विधानसभा क्षेत्राचे उमेदवार समीर सुरेश देशमुख शुक्रवारी, ४ आॅक्टोबर रोजी शिवसेनेच्या वतीने उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. सकाळी ९ वाजता यवतमाळ मार्गावरील तडस लॉन येथून मिरवणूक निघेल. या मिरवणुकीत खा.रामदास तडस, माजी खा.सुरेश वाघमारे, शिवसेना संपर्कप्रमुख अनंत गुढे, जिल्हाप्रमुख अनिल देवतारे, भाजपचे ज्येष्ठ नेते संजय गाते, शिवसेना जिल्हाप्रमुख बाळा शहागडकर, रवी बालपांडे, मिलिंद भेंडे, नाना ढगे, अनंत देशमुख, तुषार देवढे या शिवसेना पदाधिकाऱ्यांसह भाजपचे सर्व जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, सरंपच, ग्रामपंचायत सदस्य सहभागी होणार आहेत. तडस लॉन येथून निघालेली मिरवणूक मिरणनाथ मंदिर मार्गे शिवसेना चौक, ठाकरे पुतळा येथून १२ पर्यंत तहसील कार्यालय येथे पोहोचेल. समीर देशमुख यांना आशीर्वाद देण्यासाठी हजारोंच्या संख्येत उपस्थित राहावे, असे आवाहन देवळी पुलगाव शिवसेनेच्या वतीने करण्यात आले आहे.
Maharashtra Election 2019 ; आपल्या सर्वांच्या सहकार्यातून विजयश्री खेचून आणू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 04, 2019 6:00 AM
या माध्यमातून आज ग्रामीण विद्यार्थी उच्चपदावर कार्यरत आहेत. ही अभिमानाची बाब असून खेडे समृद्ध व्हावे हीच संकल्पना आपण जोपासली असून गत अनेक वर्षापासून शेतकरी, शेतमजूर, विद्यार्थी भगिनींकरिता कार्य करीत आहे. मागील १५ ते १७ वर्षांपासून आपण समाजकारणात असून विधायक कार्य करणारे असंख्य तरूण आपण या माध्यमातून आत्मसात केले आहे.
ठळक मुद्देसमीर देशमुख : देवळीत शिवसेना पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांशी साधला संवाद