लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : या आधुनिक युगात वेळ आणि पैशाच्या बचतीला महत्त्व आहे. त्यामुळे नागपुरातील स्टॅण्डर्डगेज मेट्रोनंतर आता वर्धा ते नागपूर, वर्धा ते रामटेक, वर्धा ते सावनेर,नरखेड,नागभीड व वडसापर्यंत ब्रॉडगेज मेट्रो सुरू होणार आहे. या चार डब्याच्या मेट्रोतील अर्धा डबा शेतकऱ्यांच्या शेतमालाकरिता राखीव राहणार आहे. याची वेगमर्यादा ही ताशी १२० कि.मी.असल्याने वर्धा ते नागपूर हा प्रवास केवळ ३५ मिनिटात होणार असल्याने आता वर्धा जिल्ह्याचे भविष्य बदलणार आहे, असा विश्वास केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी वर्धेकरांना दिला.स्थानिक सर्कस मैदानावर आज भाजपा-सेना महाआघाडीचे उमेदवार डॉ. पंकज भोयर यांच्या प्रचारार्थ जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मार्गदर्शन करताना ते बोलत होते. पुढे बोलताना ते म्हणाले की, स्टँडरगेज व ब्रॉडगेज मेट्रोकरिता आवश्यक असलेले डबे बनविण्याचे काम एका कंपनीच्या माध्यमातून सिंदी (रेल्वे) येथे केले जाणार असल्याने या जिल्ह्यातील हजारो तरुणांना काम मिळणार आहे. काही लोकांच्या आग्रहास्तव साखर कारखाना सुरु केला पण, राज्यातील २२ साखर कारखान्यांचे दिवाळे निघाले आहे. कचºयाला भाव आहे पण साखरेला भाव नाही, अशी परिस्थिती आहे. त्यामुळे या कारखान्यातून आता इथेनॉलची निर्मिती केली जाणार आहे. यासाठी उपाययोजना सुरु केल्या असून लवकरच इथेनॉलच्या पंपाना परवानगी दिली जाणार आहे. त्यामुळे येत्या पाच वर्षात वर्धा, भंडारा, गोंदिया, नागपूर, चंद्रपूर व गडचिरोली हे सहा जिल्हे डिझेलमुक्त होणार आहे.राज्यातील सिंचनाच्या अभावामुळे शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढत आहे. ग्रामीण भागात रोजगार नसल्याने शहराकडे धाव घेत असल्याने ग्रामीण भाग ओसाड पडला आहे. त्यामुळे ग्रामीण भागात शेती आणि उद्योगाना चालना देण्यासाठी विशेष प्रयत्न सुरू आहे. नागपुरातील मिहानमध्ये ५० हजार रोजगारांची निर्मिती करून त्यामध्ये ८० टक्के स्थानिकांना संधी मिळणार आहे. जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणात राष्ट्रीय महामार्ग गेले असून त्या एका मार्गाची किंमत २२ हजार कोटीच्या वर आहे. महाराष्ट्र निर्मितीपासून जिल्ह्याचा झालेला विकास आणि आमदार डॉ.पंकज भोयर यांच्या नेतृत्वात झालेला पाच वर्षांतील विकासाची तुलना करा. यात नक्कीच परिवर्तन झालेले दिसेल. याचे सर्व श्रेय आपण मतदारबंधंूना जाते. त्यामुळे पुन्हा या विकासाची पावती देत डॉ.पंकज भोयर यांना विधानसभेत पाठवा, असे आवाहनही ना.नितीन गडकरी यांनी यावेळी केले. या कार्यक्रमाला पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, खासदार विकास महात्मे, खासदार रामदास तडस, माजी खासदार दत्ता मेघे, विजय मुडे, सुरेश वाघमारे, डॉ.पंकज भोयर, शिवसेना जिल्हा प्रमुख अनिल देवतारे, रविकांत बालपांडे, रिपाइंचे जिल्हाध्यक्ष विजय आगलावे, नगराध्यक्ष अतुल तराळे, उपाध्यक्ष प्रदीपसिंग ठाकूर, शेतकरी नेते प्रशांत इंगळे तिगावकर, शहराध्यक्ष प्रशांत बुरले, अशोक कलोडे, डॉ.शिरिष गोडे, गुड्डू कावळे, कपील शुक्ला, डॉ. शिरिष गोडे, डॉ. आर.जी.भोयर, समीर देशमुख, सुनील गफाट, महिला जिल्हाध्यक्ष अर्चना वानखेडे आदींची उपस्थिती होती. प्रास्ताविक शहराध्यक्ष प्रशांत बुरले, संचालन आशिष कुचेवार तर आभार अतुल तराळे यांनी मानले.पर्यटनविकासाला चालना दिल्यास रोजगाराचा प्रश्न सुटेलया जिल्ह्याला ऐतिहासिक वारसा लाभला आहे. आतापर्यंतच्या सत्ताधाºयांनी महात्मा गांधी आणि आचार्य विनोबा भावे यांच्या नावाचा वापर केवळ राजकारणासाठी केला. त्यामुळे विकासाकडे त्यांची नजर गेली नाही. भाजपाची सत्ता येताच पाच वर्षात सेवाग्राम विकास आराखड्याला मंजुरी प्राप्त होऊन २५० कोटींच्या कामांना गती देण्यात आली. रामनगर लीज, बसस्थानकांचे बांधकाम, दहा ग्रामपंचायत परिसरातील बांधकाम परवानगी, आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय अशी अनेक कामे शासनाच्या भक्कम पाठबळामुळे पूर्ण करता आली. यापुढेही अनेक कामे करण्यासाठी प्रयत्नरत आहे. सेवाग्राम विकास आराखड्यात वरुड व पवनारसह इतरही दहा ग्रामपंचायतींचा समावेश करुन केंद्राकडून निधी उपलब्ध करुन द्यावा, केळझरला ‘अ’ दर्जाचे पर्यटनस्थळ घोषित करावे तसेच हिंगणा आणि वर्धा मतदार संघात असलेल्या बोर व्याघ्र प्रकल्पाच्या विकासाला चालना द्यावी जेणे करुन रोजगाराला चालना मिळेल, अशी मागणी यावेळी डॉ. पंकज भोयर यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे केली. तसेच उपस्थित जनसमुदायाला त्यांनी निवडणुकीकरिता आशीर्वाद मागितले.मतांचे कर्ज द्या, विकासाच्या व्याजासह परतफेड क रणारमतदारांनी २०१४ मध्ये भाजपा-सेनेला एकहाती सत्ता दिली. त्यामुळे गेल्या पाच वर्षात विकासाचा सपाटा लावण्यात आला. जिल्ह्यातील राष्ट्रीय महामार्गांची संख्या १ वरुन ५ वर पोहोचली. १५ वर्षात जे प्रश्न सुटले नाही ते डॉ. भोयर यांच्या नेतृत्वात सोडविण्यात आले. त्यांनी रस्ते, बसस्थानक, शासकीय कार्यालयासाठी मोठा निधी उपलब्ध करुन देण्यासोबत ४५ हजार कामगारांना विकासाच्या प्रवाहात आणले. राज्यातील प्रमुख दहा आमदारांमध्ये त्यांचेही नाव असल्याने एक कनखर व विकासाचा ध्यास असलेले नेतृत्व या मतदार संघाला लाभले आहे. त्यामुळे विकासाचा आलेख असाच उंचावत ठेवण्यासाठी आपण जातीपातीच्या पलिकडे जाऊन कर्तुत्ववान डॉ. पंकज भोयर यांना आपल्या मताचे कर्ज द्या. ते त्याची पाच वर्षात विकासाच्या व्याजासह परतफेड करतील, असे आवाहन पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, खा.रामदास तडस, माजी खासदार दत्ता मेघे, सुरेश वाघमारे, सेनेचे अनिल देवतारे, रविकांत बालपांडे, प्रशांत इंगळे तिगावकर व अर्चना भेंडे यांनी आपल्या भाषणातून केले.
Maharashtra Election 2019 ; ब्रॉडगेज मेट्रोने वर्ध्याचे भविष्य बदलणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 13, 2019 6:00 AM
लोकमत न्यूज नेटवर्क वर्धा : या आधुनिक युगात वेळ आणि पैशाच्या बचतीला महत्त्व आहे. त्यामुळे नागपुरातील स्टॅण्डर्डगेज मेट्रोनंतर आता ...
ठळक मुद्देनितीन गडकरी । पंकज भोयर यांच्या प्रचारार्थ सर्कस मैदानावर जाहीर सभा