पवनार येथे १९४९ मध्ये गांधीजींच्या स्मृतिप्रीत्यर्थ धामतिरी पवनार आश्रमासमोर छत्रीचे बांधकाम करण्यात आले. त्यावर गांधी-विनोबांचे विचार अंकीत केले आहेत. पर्यटकांचे आकर्षणाचे केंद्रबिंदू असलेल्या या छत्रीचे अनेक वर्षांपासून रंगरंगोटीचे व डागडूजीचे काम करण्यात आलेले नाही. काही प्रमाणात पायऱ्या खचत चालल्या असून छत्रीचा संपूर्ण रंग उडत चालला आहे. काही वर्षांपूर्वी आमदार पंकज भोयर यांनी बांधकाम विभागाला छत्रीची रंगरंगोटी व डागडूजी करण्याच्या सूचना दिल्या होत्या; पण निधीअभावी काम रखडलेले दिसते. एकीकडे पर्यटनावर कोट्यवधी रुपयांचा खर्च होत असताना दुसरीकडे ऐतिहासिक वास्तूंकडे दुर्लक्ष केले जात आहे. छत्रीची डागडूजी व रंगरंगोटी करण्याची मागणी पर्यटकांकडून केली जात आहे.
महात्मा गांधी आणि विनोबांची आठवण जपणारी छत्री दुर्लक्षित ...
By admin | Published: July 03, 2017 1:41 AM