लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा: महात्मा गांधी आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर या दोघांनाही या देशात अस्पृश्यता नको होती. गांधी हा बदल सामाजिक सुधारणांतून घडवू पाहत होते, तर बाबासाहेबांना त्यासाठी कठोर कायदे असावेत, असे वाटत होते. दोघांचा उद्देश एकच होता, मात्र भिन्न मार्ग असलेले हे सहवेदनेचे प्रवासी होते, असे उद्गार गांधी फॉर फ्युचर समितीद्वारे आयोजित गांधी समजून घेताना व्याख्यानमालेत राजकीय विश्लेषक अशोक वानखडे, दिल्ली यांनी काढले.स्थानिक सत्यनारायण बजाज सार्वजनिक जिल्हा ग्रंथालयाच्या सभागृहात क्रांतिदिनी वानखडे यांनी ‘गांधींतील आंबेडकर आणि आंबेडकरांतील गांधी’ या विषयाची मांडणी केली. गांधी आणि आंबेडकर या दोघांनीही कळत-नकळत एकमेकांना अंगिकारले होते, याकडे अद्यापही गांभीर्याने बघितले गेले नाही, असे मत व्यक्त करीत वानखडे यांनी गांधी आणि आंबेडकर यांच्या जीवनातील समान दुवे मांडले. कधीकाळी सदैव सुटाबुटात वावरणारे बॅरिस्टर गांधी या देशात परतल्यावर इथल्या अर्धनग्न शोषित-पीडित समाजाला पाहून साऱ्याच सुखाचा त्याग करताना आणि एक पंचा वस्त्र म्हणून स्वीकारताना दिसतात. तर दुसºया बाजूने आपला समाज फाटका आणि अस्वच्छ असू नये, तो स्वकर्तृत्वावर उभा राहावा म्हणून नीटनेटके राहण्याचा आदर्श डॉ. आंबेडकर घालून देतात.या देशातील अस्पृश्य आणि शोषितांचे नेतृत्व आपण करतो, याचे समान भान गांधी आणि आंबेडकर या दोघांनाही होते. गांधींनी अस्पृश्यता निवारणाचे कार्य द. आफ्रिकेतील आपल्या वास्तव्यात सुरू केले होते. भारतीय स्वातंत्र्याच्या आंदोलनातही व्यक्तिगत आणि सामाजिकस्तरावर कुणीही जातिभेद पाळणार नाही, यासाठी सत्याचा प्रयोगशील मार्ग त्यांनी स्वीकारला होता. लोकांनी गांधींच्या हरिजनप्रेमापोटी आश्रमाला देणग्या देणेही बंद केले; पण गांधींनी आपला मार्ग बदलला नाही. पहिल्या गोलमेज परिषदेत गांधींनी दलितांची भूमिका मांडली होती. त्यामुळे दुसºया गोलमेज परिषदेत प्रथमच गांधी आणि आंबेडकर समोरासमोर आल्यावर दलित नेतृत्वाचा मुद्दा निर्माण झाला होता, हा इतिहास सर्वज्ञात आहे.गांधींनी आजीवन स्वीकारलेला सत्य, अहिंसा, शांतीचा मार्ग बुद्ध धम्माचे अनुयायी बनून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी अनुसरला आणि अस्मितेची जाणीव समग्र समाजाला करून दिली, असे वानखडे म्हणाले. प्रारंभी स्वागताध्यक्ष किशोर माथनकर यांच्या हस्ते चरखा व खादीवस्त्र देऊन अशोक वानखडे यांचा सत्कार करण्यात आला. प्रास्ताविक मनोहर पंचारिया तर संचालन प्रा. पद्माकर बाविस्कर यांनी केले. तर आभार अभिजित फाळके यांनी मानले. आयोजनाकरिता संजय इंगळे तिगावकर, मुरलीधर बेलखोडे, अमोल देशमुख, प्रा. सूचिता ठाकरे, प्रा. किशोर वानखडे, सुधीर पांगूळ, रितेश घोगरे, जयंत सबाने, आकाश जयस्वाल, डॉ. सचिन पावडे, अभिनय खोपडे, अनिल ढबाले, राहुल वकारे, प्रवीण काटकर, घोगरे, ढगे,पंकज वंजारे, मोहित सहारे, भैसारे, प्रशांत नागोसे, ठाकरे आदींनी सहकार्य केले.गांधी-आंबेडकरांचा मार्केटिंग ब्रॅण्ड म्हणून वापरआज गांधी आणि आंबेडकर हे दोघेही मार्केटिंगचे ब्रॅण्ड म्हणून वापरले जात आहेत. राष्टÑपिता महात्मा गांधी आणि डॉ.बाबासाहेब आंबेडकर हे केवळ जयंती आणि पुण्यतिथी साजरी करण्यासाठी लागणारे पुतळे नाहीत, तो मानवी हिताचा विचार आहे, याचे भान आता प्रत्येकाला जोपासावे लागेल. राजकीय स्वाथार्साठी त्यांचा वापर होत असेल ते नाकारून, हे दोन विचारप्रवाह या देशाचे संविधान सक्षम ठेवण्यासाठी एकत्र ठेवणाची जबाबदारी प्रत्येक सुज्ञ नागरिकाची आहे, याची जाणीव अशोक वानखडे यांनी करून दिली. व्याख्यानाचा समारोप त्यांनी रवींद्रनाथ टागोर यांच्या 'व्हेअर द माईंड इज विदाऊट फीअर' या कवितेने केला. व्याख्यानाकरिता विविध क्षेत्रातील नागरिकांची लक्षणीय उपस्थिती होती.
महात्मा गांधी-डॉ.आंबेडकर हे सहवेदनेचे प्रवासी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 12, 2019 10:40 PM
महात्मा गांधी आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर या दोघांनाही या देशात अस्पृश्यता नको होती. गांधी हा बदल सामाजिक सुधारणांतून घडवू पाहत होते, तर बाबासाहेबांना त्यासाठी कठोर कायदे असावेत, असे वाटत होते. दोघांचा उद्देश एकच होता, मात्र भिन्न मार्ग असलेले हे सहवेदनेचे प्रवासी होते, असे उद्गार गांधी फॉर फ्युचर समितीद्वारे आयोजित गांधी समजून घेताना व्याख्यानमालेत राजकीय विश्लेषक अशोक वानखडे, दिल्ली यांनी काढले.
ठळक मुद्देअशोक वानखडे : जिल्हा ग्रंथालयात ‘गांधी समजून घेताना' नववे मासिक व्याख्यान