लोकमत न्यूज नेटवर्कसेवाग्राम (वर्धा) : नागपूर येथील राष्ट्रीय आयकर अकादमीत प्रशिक्षणासाठी आलेल्या राष्ट्रकुलच्या (कॉमन वेल्थ) टीममधील भारतासह नऊ राष्ट्रांतील प्रशिक्षितांनी बुधवारी सेवाग्राम आश्रमाला भेट देऊन महात्मा गांधीचे विचार व कार्य जाणून घेतले.नागपूरच्या राष्ट्रीय आयकर अकादमीमध्ये आयोजित चार दिवसांच्या प्रशिक्षणात फिजी, घाणा, केनिया, मलेशिया, श्रीलंका, रुगांडा, झांबिया, युके, काटा व भारत या देशातील चाळीस सदस्य सहभागी झाले. यात पाच मुलींचा सहभाग आहे. हे सर्व कॉमन वेल्थ टिमच्या माध्यमातून आले असून त्यांचे प्रमुख युकेचे अँण्ड्रिव ईवन्स आहे. त्याच्या नेतृत्वात त्यांनी सेवाग्राम आश्रमाला भेट दिली. यावेळी आश्रमाच्यावतीने सर्वांचे स्वागत करण्यात आले. त्यांनी आदी निवास, बा व बापू कुटी, बापू दप्तर, आखरी निवास आदी स्थळांची पाहणी करीत माहिती जाणून घेतली. आश्रमचे अधीक्षक भावेश चव्हाण यांनी त्यांना सर्व माहिती व आश्रमातील कार्यप्रणाली सांगितली. यावेळी पाहुण्या सदस्यांनी बापूंच्या पारिवारिक, आंदोलने, सत्याग्रह, गावातील कार्य याबाबत सविस्तर चर्चा केली. आश्रमातील वातावरण, साधी घरे व राहणी तसेच जीवनपद्धती पाहून सारेच भारावून गेले होते. ही भेट आमच्या सदैव स्मरणात राहील, असे यावेळी सदर पाहूण्या मंडळींनी सांगितले.
कॉमन वेल्थच्या टीमने जाणले महात्माजींचे कार्य
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 22, 2018 11:43 PM
नागपूर येथील राष्ट्रीय आयकर अकादमीत प्रशिक्षणासाठी आलेल्या राष्ट्रकुलच्या (कॉमन वेल्थ) टीममधील भारतासह नऊ राष्ट्रांतील प्रशिक्षितांनी बुधवारी सेवाग्राम आश्रमाला भेट देऊन महात्मा गांधीचे विचार व कार्य जाणून घेतले.
ठळक मुद्देसेवाग्राम आश्रमाला दिली भेट