अपघाताचा धोका : अधिकारी व कर्मचाऱ्यांचे तक्रारींकडे दुर्लक्षकोळोणा(चोरे) : विद्युत वितरण कंपनीच्या वतीने ग्रामस्थांना विद्युत पुरवठा करण्यासाठी लावण्यात आलेल्या लोखंडी पोलची दैनावस्था झाली असून ते मोठ्या अपघाताला निमंत्रण देत आहेत. सदर प्रकाराकडे दुर्लक्ष होत असल्याने संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याकडे लक्ष देत योग्य कारवाई करण्याची मागणी ग्रामस्थांची आहे. स्थानिक ग्रामस्थांना तसेच गावातील पीठ गिरण्याना विद्युत परवठा देण्यासाठी ठिकठिकाणी लोखंडी खांब उभे करण्यात आले आहे. हे लोखंडी खांब ३५ ते ४० वर्षांपूर्वी उभे करण्यात आले आहे. त्यातील अनेक लोखंडी खांबाची दैनावस्था झाल्याने नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे. इतरांच्या जीवितास धोकादायक ठरणारे हे लोखंडी खांब तुकडे तुकडे जोडलेले आहेत. अपघातास कारणी भुत ठरेल अशा तऱ्हेचे हे खांब असल्याने सदर प्रकराची संबंधीतांना माहिती देण्यात आली. परंतु, याकडे दुर्लक्षच करण्यात आल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे गावातील अनेक खांब वाकलेले आहे. तर अनेक लोखंडी विद्युत खांब रस्त्याला लागुनच आहेत. परिणामी, वाहतुकीचा प्रश्नही निर्माण झाला आहे. ग्रा. प. समोरील पोल तसेच साहुनकर, घोडे आदींच्या घरासमोरील विद्युत खाबांची बिकट स्थिती आहे. हा प्रकार अपघाताला निमंत्रण देणारा असल्यान स्थानिक अधिकाऱ्यांकडे तक्रार करण्यात आली. मात्र, तेही दुर्लक्ष करीत असल्याने वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याकडे लक्ष देत कारवाई करावी, अशी मागणी ग्रामस्थांची आहे.(वार्ताहर)
महावितरणचे लोखंडी खांब जीर्ण अवस्थेत
By admin | Published: November 10, 2016 1:03 AM