शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्याचे नवे मुख्यमंत्री कोण? सस्पेन्स अजून कायम; १ किंवा २ डिसेंबरला शपथविधी होणार
2
निवडून येतात तेव्हा गपगार, पराभवानंतर EVM ला दाेष; काेर्टाने याचिकाकर्त्यांना फटकारलं
3
कुजबुज! एका छताखाली कोणता झेंडा हाती?; पराभूत उमेदवार आता देवदर्शन करणार
4
प्रत्येक निवडणुकीनंतर EVM विरोधात घोंघावणारे हे वादळ कायमस्वरूपी शमविण्याची गरज
5
...तर महाराष्ट्रात खळबळ उडेल; उद्धव - राज यांनी एकत्र येण्याला आणखी कुठला मुहूर्त हवा?
6
गुजरात ते मुंबई प्रवासात हत्येचा थरार?; तीन वर्षांनी हत्येचा गुन्हा, तपास सुरू
7
...तोपर्यंत कांजूर डम्पिंग बंद करणे अशक्य; मुंबई महापालिका पर्यायी जागेच्या शोधात
8
पश्चिम रेल्वेवर वाढणार एसी लोकलच्या १३ फेऱ्या; वातानुकूलित फेऱ्यांची संख्या ९६ वरून १०९
9
इन्फ्लुएंझामुळे मुंबईकर ‘आजारी’, राज्यात ५७ रुग्णांचा मृत्यू; काय आहेत लक्षणे?
10
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
11
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
12
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
13
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
14
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
15
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
16
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
17
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
18
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
19
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
20
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले

मुख्य मार्गावर मोकाट जनावरांचा वावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 06, 2017 11:24 PM

स्थानिक नगरपंचायतीच्या सर्वसाधारण सभेत येथील मुख्य मार्गावरील मोकाट जनावरांचा बंदोबस्त करण्याबाबत ठरावाअन्वये चर्चा झाली.

ठळक मुद्देवाहनचालक त्रस्त : नगरपंचायतीच्या सभेत झाली चर्चा

लोकमत न्यूज नेटवर्कसमुद्रपूर : स्थानिक नगरपंचायतीच्या सर्वसाधारण सभेत येथील मुख्य मार्गावरील मोकाट जनावरांचा बंदोबस्त करण्याबाबत ठरावाअन्वये चर्चा झाली. परंतु, अद्यापही सदर मोकाट जनावरांचा बंदोबस्त करण्यात न आल्याने नागरिकांसह वाहनचालकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. सदर परिस्थिती मोठ्या अपघाताला निमंत्रण देत असल्याने तात्काळ योग्य कार्यवाहीची मागणी आहे.जाम-उमरेड हा मार्ग समुद्रपूरच्या मुख्य बाजारपेठेतून जातो. परंतु, दहेगाव चौरस्ता परिसररात दररोज सायंकाळी मोकाट जनावरे थेट रस्त्यावरच ठिय्या देतात. त्यामुळे वाहनचालकांना या मार्गावरून पुढील प्रवास करताना चांगलीच माथापच्छी करावी लागत आहे. बहुतांश वेळा या मार्गावर वाहतूक खोळंबते. इतकेच नव्हे तर चक्क वाहनचालकांना अनेकदा वाहनाबाहेर येऊन रस्त्याच्या मधोमध उभ्या असलेल्या मोकाट जनावरांना पळवून लावावे लागते. अनेकदा सदर मोकाट जनावरांना रस्त्यावरून हाकलून लावल्यानंतरही अवघ्या काही मिनीटातच परिस्थिती जैसे थे होते. त्यामुळे सदर समस्येवर कायम स्वरूपी उपाययोजना करण्याची मागणी नागरिकांची आहे. मोकाट जनावरे पकडण्यची मोहीम राबविण्याकडे नगरपंचायतीचे दुर्लक्ष होत असल्याने नागरिकांमध्ये नगरपंचायतीबाबत रोष वाढत असून याकडे लक्ष देण्याची गरज आहे.वर्ष लोटूनही समस्या जैसे थेमोकाट जनावराचा बंदोबस्त करण्यासाठी ४/८/२०१६ च्या सभेत चर्चा केली. याला वर्ष लोटले. परंतु, अद्यापही समस्या जैसे थेच आहे.शिवसेनेचे रवींद्र लढी यांनी आपल्या सहकार्यांच्या मदतीने याबाबत ३१ जानेवारी २०१७ ला सदर मोकाट जरावरे हाकलत कोंडवाड्यापर्यंत नेली होती. परंतु, कोंडवाडाच बंद होता.नगरपंचायतीच्या ४ आॅगस्ट २०१६ च्या सभेत हा प्रश्न आपण लावून धरला होता. त्यावेळी सभागृहात चर्चा झाली. प्रभावी अंमलबजावणीची मागणी यावेळी केली होती. परंतु, बहुमत असतानाही नगरपंचायत पदाधिकाºयांनी अद्याप सदर समस्या निकाली काढली नाही. सत्तेपुढे शहाणपण चालत नाही.- मधुकर कामडी,गटनेता नगरपंचायत, समुद्रपूर.