लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : निम्न वर्धा प्रकल्पातील प्रकल्प्रगस्तांचे पुनर्वसनातील कामे दर्जेदार करावी. तिथे राहणारी हाडामासाची माणसे आहेत याची जाणीव ठेवून पिण्याचे पाणी, शाळा आणि इतर नागरी सुविधांची कामे जबाबदारीने मार्चपूर्वी पूर्ण करावीेत, अशा सूचना विभागीय आयुक्त अनुपकुमार यांनी दिल्यात.जिल्ह्यातील विविध विकास कामे आणि शासनाच्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाचा आढावा जिल्हाधिकारी कार्यालयात घेण्यात आला, यावेळी ते बोलत होते. या बैठकीला जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी नयना गुंडे, अप्पर जिल्हाधिकारी संजय दैने, निवासी उपजिल्हाधिकारी राजलक्ष्मी शहा यांच्यासह इतर विभागाचे अधिकारी उपस्थित होते.निम्न वर्धा प्रकल्पातील २० गावांतील प्रकल्पग्रस्तांना वाटप करण्यात आलेले जमिनीचे पट्टे प्रकल्पग्रस्तांच्या नावे करण्यात आले. नावाचा उल्लेख असलेला सातबारा या प्रकल्पग्रस्तंना यावेळी देण्यात आला. त्यामुळे आता प्रकल्पग्रस्तांना त्यांच्या हक्काचे दस्तावेज मिळाले असल्याने त्यांना जिल्हा पुनर्वसन कार्यालयात येण्याची आणि परवानगी घेण्याची गरज नाही. प्रकल्पग्रस्तांना पट्यांचे सातबारा करून देणारा वर्धा हा पहिला जिल्हा आहे, अशी माहिती जिल्हा पुनवर्सन अधिकारी राजलक्ष्मी शहा यांनी दिली.कृषी पंपाच्या वीज जोडणीचा आढावा घेताना २,५२६ प्रलंबित प्रकरणे निकाली निघण्यासाठी निधी मिळण्यासाठी पाठपुरावा करावा, अशा सूचना अनुपकुमार यांनी दिल्यात.प्रधानमंत्री आवास योजनेत जिल्हा राज्यात दुसºया क्रमांकावर असल्याबद्दल त्यांनी प्रशासनाचे अभिनंदनही केले. राष्ट्रीय दूध विकास मंडळामार्फत जास्त दूध खरेदी होण्यासाठी प्रयत्न करावेत. तसेच त्यासाठी दुग्धव्यवसाय करू इच्छिणाºया पशुपालकांना प्रोत्साहित करावे, असेही त्यांनी यावेळी सुचवले. मेगा फुड पार्क प्रकल्पासाठी काही प्रस्तावांना मान्यता घ्यावयाची असल्यास हिवाळी अधिवेशनामध्ये घेण्यात यावी. पार्क मध्ये २२० केव्हीए उपकेंद्रासाठी ७२ कोटींच्या कामाला मान्यता मिळाली असल्याचे अधीक्षक अभियंता सुनील देशपांडे यांनी सांगितले.तलाव तिथे मासळी या प्रकल्पाअंतर्गत जिल्ह्यात ८८ तलावांमध्ये यावर्षी हा प्रकल्प राबविण्यात येत आहे. यामध्ये निर्माण होणाºया यशकथांचे डॉक्युमेंटेशन करून ठेवण्यास अनुपकुमार यांनी सांगितले. यावेळी जिल्हाधिकारी यांनी जिल्ह्यात राबविण्यात येत असलेले नाविण्यपुर्ण प्रकल्पाची माहिती दिली. यामध्ये रूरल मॉल, शेतकरी उद्योजक कंपन्या, सामुहिक कृषी सुविधा केंद्र, पांदन रस्ते, सार्थक जीवनासाठी गांधी मुल्ये, ई-कार्यालय, वर्धा नियोजन अॅप, गुन्हे माहिती व्यवस्थापन प्रणालीबाबत माहिती दिली. या बैठकीला सर्व विभाग प्रमुख, तहसीलदार उपस्थित होते.
पुनर्वसन गावातील कामांचा दर्जा सांभाळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 10, 2017 12:53 AM
निम्न वर्धा प्रकल्पातील प्रकल्प्रगस्तांचे पुनर्वसनातील कामे दर्जेदार करावी. तिथे राहणारी हाडामासाची माणसे आहेत याची जाणीव ठेवून पिण्याचे पाणी, शाळा आणि इतर नागरी सुविधांची कामे जबाबदारीने मार्चपूर्वी पूर्ण करावीेत, अशा सूचना विभागीय आयुक्त अनुपकुमार यांनी दिल्यात.
ठळक मुद्देअनुपकुमार : आढावा बैठकीत अधिकाºयांना सूचना