लोकमत न्यूज नेटवर्कविजयगोपाल : येथील शेतकºयांच्या कृषीपंपाना नवीन वेळापत्रकाप्रमाणे विद्युत पुरवठा केला जात आहे. त्यामुळे शेतकºयांना नाहक त्रास सहन करीत शेतातील उभ्या पिकांना पाणी द्यावे लागत आहे. शेतकरी हित जोपासून सुरू केलेले भारनियमन बंद करावे तसे न होत असल्यास नवीन वेळापत्रक रद्द करून जुन्याच वेळापत्रकाप्रमाणे भारनियमन करावे, अशी मागणी शेतकºयांनी महावितरणच्या कनिष्ठ अभियंता गुप्ता यांना सादर केलेल्या निवेदनातून केली आहे.विजयगोपाल विद्युत पॉवर स्टेशनने नवीन पद्धतीने सुरू केलेल्या भारनियमनामुळे शेतकºयांना पिकांना रात्रीला पाणी द्यावे लागत आहे. रात्रीच्या सुमारास शेतपिकांना पाणी देणे हे धोक्याचे ठरते. विजयगोपाल पॉवर स्टेशन अंतर्गत कृषीपंपांना विद्युत पुरवठा करण्याच्या वेळेत बदल करण्यात आल्याने शेतकºयांना कमालीचा त्रास सहन करावा लागत आहे.पूर्वीचे वेळापत्रक काहीसे दिलासा देणारे होते. त्यामुळे तेही महावितरणच्या अधिकाºयांनी कायम ठेवल्यास शेतकºयांना काहीसे चालेल असेही निवेदनात नमुद आहे. महावितरणच्या कनिष्ठ अभियंत्यांना निवेदन देताना वासुदेव वाकाडे, देविदास अवसरे, दिलीप श्रीराव, विपीन अवसरे, प्रवीण डडमल, राहुल पटेकर, नानाजी हजारे, विजय पेटकर, जगन हजारे, अब्दुल नबी गुलाम नबी, विश्वनाथ ढांगे आदी उपस्थित होते.मागणीचा विचार न झाल्यास रस्ता रोको आंदोलनमहावितरणच्यावतीने सुरू करण्यात आलेले भारनियमन बंद करावे अथवा शेतकरी हितार्थ निर्णय घेत भारनियमनाच्या वेळापत्रकात आवश्यक तो बदल करावा या मागणीचे निवेदन परिसरातील शेतकºयांनी महावितरणचे कनिष्ठ अभियंता गुप्ता यांना सादर केले आहे. सदर निवेदनाची प्रत उर्जामंत्री चंद्रशेख बावनकुळे यांनाही पाठविण्यात आली आहे. शेतकºयांच्या मागणीवर येत्या काही दिवसात सहानुभूतीपूर्वक विचार न झाल्यास शेतकरी एकत्र येत महावितरणच्या शेतकरी विरोधी धोरणांच्या निषेधार्थ रास्तारोको आंदोलन करतील, असा इशाराही निवेदनातून देण्यात आला आहे.
भारनियमनाचे वेळापत्रक पूर्वीप्रमाणे कायम ठेवा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 29, 2017 1:15 AM
येथील शेतकºयांच्या कृषीपंपाना नवीन वेळापत्रकाप्रमाणे विद्युत पुरवठा केला जात आहे. त्यामुळे शेतकºयांना नाहक त्रास सहन करीत शेतातील उभ्या पिकांना पाणी द्यावे लागत आहे.
ठळक मुद्देशेतकºयांची मागणी : कनिष्ठ अभियंत्यांना साकडे