शहरं
Join us  
Trending Stories
1
Vinod Tawde: हे गँगवॉर असू शकते...; विनोद तावडे प्रकरणात उद्धव ठाकरेंनी व्यक्त केला संशय
2
“५ कोटी कोणाच्या सेफमधून बाहेर आले?”; विनोद तावडे प्रकरणी राहुल गांधींचा PM मोदींना सवाल
3
विनोद तावडेंवर पैसे वाटपाचा आरोप; बविआचा राडा, निवडणूक आयोगाची पहिली प्रतिक्रिया काय?
4
राज्यातील 'हे' ३१ उमेदवार स्वतःला मत देऊ शकणार नाहीत! नक्की काय आहे प्रकरण?... वाचा
5
Amol Kolhe : "पैशाच्या जोरावर महाराष्ट्र जिंकायचा, गुजरातच्या दावणीला बांधायचा"; अमोल कोल्हेंचा भाजपावर हल्लाबोल
6
'पैशासाठी दिल्ली कॅपिटल्सचा संघ सोडलेला नाही...', IPL 2025 लिलावापूर्वी Rishabh Pant च्या पोस्टने खळबळ
7
मतदान एका दिवसावर! महायुती की मविआ?... हे मुद्दे विचारात घेऊन मतदार मत देणार…
8
Vinod Tawde : भाजप नेते विनोद तावडे यांच्यावर निवडणूक आयोगाची कारवाई, पैसे वाटल्याच्या आरोपावरून FIR दाखल
9
मणिपूरमध्ये वाद वाढला, एनडीएचा प्रस्ताव मैतेई संघटनेने फेटाळला; २४ तासांचा अल्टिमेटम दिला
10
“भाजप अन् विनोद तावडेंवर निवडणूक आयोगाने कठोर कारवाई करावी”: बाळासाहेब थोरात
11
Video - डान्स करतानाच नवरदेवाला आला हार्टअटॅक; वराती ऐवजी निघाली अंत्ययात्रा
12
विनोद तावडेंच्या डायरीत १५ कोटी रुपयांची नोंद; क्षितीज ठाकूर यांचा खळबळजनक आरोप
13
संपूर्ण महाराष्ट्रात २० नोव्हेंबरला सरकारी सुट्टी; शेअर बाजार-बँका बंद, पण...
14
शेत, प्लॉट मोजणीचे शुल्क किती, माहितेय का?
15
...अन् शेवटी तावडे आणि ठाकूर एकाच गाडीत बसून गेले; चार तासांत नेमकं काय-काय घडलं?
16
एवढा पैसा आला कुठून? विनोद तावडेंच्या आरोपावरून सुप्रिया सुळेंचा सवाल
17
‘एक है तो सेफ है’ घोषणेवरून लालूप्रसाद यादवांची भाजपासह साधूसंतांवर टीका, म्हणाले...  
18
Vinod Tawde: विनोद तावडे प्रकरणात ९,९३,५०० रुपये रक्कम सापडली; निवडणूक आयोगाची माहिती
19
IPL 2025: मेगा लिलावाआधी १९ वर्षीय मराठमोळ्या खेळाडूची रंगली चर्चा, कोण आहे तो?
20
“गृहखात्याने पाळत ठेवली अन् विनोद तावडे जाळ्यात अडकतील याचा बंदोबस्त केला”; राऊतांचा दावा

बांध दुरूस्तीचे कामे प्राधान्याने करा

By admin | Published: September 21, 2015 2:02 AM

जलयुक्त शिवार कार्यक्रमाच्या माध्यमातून शेतीला शाश्वत सिंचनाचा लाभ मिळावा, यासाठी जिल्ह्यातील सर्व नादुरूस्त सिमेंट बंधाऱ्यासह जलसंधारणाचे दूरुस्तीची कामे प्राधान्याने पूर्ण करा.

शैलेश शर्मा : जलयुक्त शिवार अभियानातील कामांचा घेतला आढावावर्धा : जलयुक्त शिवार कार्यक्रमाच्या माध्यमातून शेतीला शाश्वत सिंचनाचा लाभ मिळावा, यासाठी जिल्ह्यातील सर्व नादुरूस्त सिमेंट बंधाऱ्यासह जलसंधारणाचे दूरुस्तीची कामे प्राधान्याने पूर्ण करा. त्यानंतरच नवीन कामे सुरू करावीत, अशा सूचना सहकार विभागाचे प्रधान सचिव व जिल्ह्याचे पालक सचिव डॉ. शैलेश शर्मा यांनी दिल्या.जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात पालक सचिव डॉ. शैलेशकुमार शर्मा यांनी जिल्ह्यातील विविध विकासकामांचा आढावा घेतला. वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत बैठक घेण्यात आली. यावेळी त्यांनी मार्गदर्शन केले.बैठकीला जिल्हाधिकारी आशुतोष सलिल, मुख्य कार्यपालन अधिकारी संजय मीणा, अपर मुख्य कार्यपालन अधिकारी प्रमोद पवार, महावितरणाचे अधीक्षक अभियंता शंकर कांबळे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी ज्ञानेश्वर पवार, निवासी उपजिल्हाधिकारी वैभव नावडकर, तसेच सर्व विभाग प्रमुख उपस्थित होते. जिल्ह्यातील अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांना विविध योजनांचा प्रत्यक्ष लाभ घेताना खरीप हंगामासाठी विविध बॅँकांकडून करण्यात आलेल्या कर्ज वाटपासंदर्भात आढावा डॉ. शर्मा यांनी घेतला. यावेळी ते म्हणाले, सर्वच शेतकऱ्यांना कर्ज कसे उपलब्ध करून देता येईल, या दृष्टीने नियोजन करताना कर्जाचे पुनर्गठन व प्रत्यक्ष कर्ज पुरवठा करताना बॅँकांचा सहभाग वाढवावा. शेतकऱ्यांना सिंचनासाठी धडक सिंचन विहिरींचा कार्यक्रम प्रभावीपणे राबविण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. धडक सिंचन कार्यक्रमाअंतर्गत मंजूर झालेल्या व अपूर्ण असलेल्या १ हजार २८७ विहिरी डिसेंबर अखेरपर्यंत पूर्ण करण्यात याव्यात, तसेच शेतकऱ्यांच्या मागणीनुसार मनरेगांतर्गत विहिरींचा कार्यक्रम जिल्ह्यात राबविण्यात यावा, ग्रामीण भागात महात्मा गांधी रोजगार हमी योजनेवर असणाऱ्या सर्व मजुरांना वेळेवर मजुरी मिळेल यासाठी तालुका व जिल्हास्तरावर समन्वय असावा, ज्या मजुरांचे जुलैपासून अद्यापर्यंत वेतन दिलेले नाही, ते तातडीने देण्याच्या सूचना डॉ. शर्मा यांनी केल्या. जिल्हा नियोजन मंडळाकडून विविध विकासकामांसाठी मंजूर झालेला निधी खर्च करण्याची जबाबदारी संबंधित विभागाची असून त्यांनी आपल्या विभागामार्फत मंजुरी घेऊन खर्चाचे नियोजन करावे. जलयुक्त शिवार अभियानात जिल्ह्यात झालेल्या कामाचा आढावा घेताना डॉ. शर्मा म्हणाले, प्रत्येक विभागाने केलेल्या कामाचे सादरीकरण करावे. तसेच सिंचनासाठी व उत्पादन वाढीसाठी याचा काय प्रभाव झाला या संदर्भातही माहिती सादर करावी. भूजल सर्वेक्षण विभागाने भूजलाच्या पातळीत झालेली वाढ याबाबत तालुकानिहाय माहिती संकलित करावी. सावकारी कर्जमुक्तीची प्रकरणे तातडीने निकाली काढावी. तसेच शेतकऱ्यांना घेतलेल्या कर्जातून मुक्त करण्याकरिता तालुकानिहाय बैठकीचे आयोजन करावे, अशा सूचना डॉ. शर्मा यांनी यावेळी दिल्या.या बैठकीत जिल्हाधिकारी आशुतोष सलिल यांनी जिल्ह्यातील विविध विकासकामांची सादरीकरणाद्वारे माहिती उपस्थितांना दिली.(स्थानिक प्रतिनिधी)आत्महत्याग्रस्त कुटुंबाची भेट घेत केले सांत्वनसेवाग्राम येथील प्रमोद रमेश भोयर या तरुण शेतकऱ्याने कर्जबाजारीपणामुळे आत्महत्या केली होती. जिल्ह्याचे पालक सचिव डॉ. शैलेशकुमार शर्मा यांनी त्यांच्या निवासस्थानी जाऊन भोयर कुटुंबियांची भेट घेतली. तसेच आत्महत्या केलेल्या तरुणाच्या आई बेबी भोयर यांना भेटून सांत्वन केले. भोयर यांच्याकडे चार एकर शेती असून त्यांनी त्यांच्यावर राष्ट्रीकृत बॅँकेचे कर्ज होते. यावेळी जिल्हाधिकारी आशुतोष सलील व मुख्य कार्यपालन अधिकारी संजय मीणा उपस्थित होते.