लोकमत न्यूज नेटवर्कहिंगणघाट : येथील नूतन शाळेच्या मैदानावरील अतिक्रमण काढण्यात यावे. या भागात येणाऱ्या मद्यपिंसह गुन्हेगारी प्रवृत्तीच्या नागरिकांचा बंदोबस्त करीत शाळेचे मैदान विद्यार्थ्यांना खेळण्यासाठी उपलब्ध करून देण्यात यावे, अशी मागणी भाजयुमोचे दिनेश वर्मा यांनी केली आहे. याबाबत न.प. मुख्याधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले आहे.नूतन शाळेच्या मैदानात शहरातील अनेक खेळाडू तसेच पोलीस दलात जाण्यासाठीची इच्छा बाळगणारे तरुण-तरुणी सकाळी व सायंकाळी नियमित सराव करतात. मात्र, सदर मैदान सध्या काही ठेकेदारांची मालमत्ता होऊ पाहत आहे. या मैदानाचा वापर जड वाहने उभी करण्यासाठी तसेच रेती, गिट्टी, पाईप आदी साहित्य ठेवण्यासाठी होत आहे. यामुळे खेळाडू प्रवृत्तीला खो मिळत आहे. शिवाय जे नियमित सराव करीत आहेत. त्यांना मैदानावरील साहित्य व वाहनांचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे. या परिसरात दररोज सायंकाळी मद्यपींचा डेरा असतो. त्यांचा बंदोबस्त करीत सदर मैदान तरुण-तरुणींना सरावासाठी देण्यात यावी अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे. निवेदन देताना मुजीब शेख, राकेश शर्मा, कादीर बक्श, शुभांगी डोंगरे, निलेश पोगळे आदींची उपस्थिती होती.
नूतन शाळेचे मैदान खेळांसाठी उपलब्ध करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 13, 2018 11:22 PM
येथील नूतन शाळेच्या मैदानावरील अतिक्रमण काढण्यात यावे. या भागात येणाऱ्या मद्यपिंसह गुन्हेगारी प्रवृत्तीच्या नागरिकांचा बंदोबस्त करीत शाळेचे मैदान विद्यार्थ्यांना खेळण्यासाठी उपलब्ध करून देण्यात यावे, ....
ठळक मुद्देमुख्याधिकाऱ्यांना साकडे : अतिक्रमण काढण्याची मागणी