लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : शिवसेना ही विदर्भ राज्य निर्मितीसाठी विरोध करीत असल्याने ती सरकारच्या गळ्याची हड्डी झाली होती. शिवसेनेने पुढील काळात स्वतंत्र निवडणूक लढण्याचे जाहीर केले आहे. याच संधीचे सोने विदर्भ राज्याच्या निर्मितीसाठी सरकारने केले पाहिजे. वेगळ्या विदर्भाच्या मागणीचा वेळीच विचार न झाल्यास आपण राजीनामाही देऊ, अशी माहिती आ. आशिष देशमुख यांनी आयोजित पत्रकार परिषदेत दिली.विदर्भ राज्याच्या मागणीसाठी त्यांनी ७ जानेवारीपासून ‘विदर्भ आत्मबळ यात्रा’ सुरू करण्यात आली आहे. या यात्रेच्या निमित्ताने बेरोजगार, शेतकरी, शेतमजूर आदींशी संवाद साधत विदर्भ विकासासाठी विदर्भ राज्याची निर्मिती गरजेची असल्याचे सांगण्यात आले.आ. देशमुख पुढे म्हणाले, विदर्भ आत्मबळ यात्रा मंगळवार ३० जानेवारीला सेवाग्राम होत वर्धेत दाखल झाली आहे. आतापर्यंत यात्रेच्या माध्यमातून जनतेशी संवाद साधल्यानंतर जनतेमध्ये सरकारबाबत रोष असल्याचे दिसून येते. त्याचे मुख्य कारण वाढती बेरोजगारी व बंद होत असलेले उद्योग हे आहे. विदर्भात राज्याच्या तुलनेत ६५ टक्के विजेची निर्मिती होते. परंतु, याच भागातील शेतकºयांच्या कृषीपंपांना अद्यापही मोफत विद्युत पुरवठा नाही. तेलंगाना सरकार प्रमाणे विदर्भातील शेतकºयांच्या कृषीपंपांना मोफत विद्युत पुरवठा देण्यात यावा. शासनाच्या अनेक योजना असल्या तरी त्याची प्रभावी अंमलबजावणी होत नाही. त्यामुळे सरकार बदलले तरी ग्राऊंड लेवलवर परिस्थिती जैसे थेच आहे. एखाद्या शेतकºयावर मंत्रालयात जाऊन विष प्राशन करण्याची वेळ येते. या प्रकारामुळे भाजपा सरकारची संवेदन शिलताच हरविली असल्याचे यावेळी त्यांनी स्पष्ट केले. समृद्धी महामार्गासाठी जमीन संपादीत करणे सुरू आहे. परंतु, पुन्हा एखाद्या शेतकºयांवर मोबदला न मिळाल्याने आत्महत्या करण्याची वेळ येणार नाही याची दक्षता सरकारने घेतली पाहिजे. जमिनीचा योग्य मोबदला शेतकऱ्यांना दिला पाहिजे. कर्नाटक राज्यात दुग्ध उत्पादक शेतकºयांला सरकारच्यावतीने प्रती लिटर ५ रुपये अनुदान दिले जाते. अशाच पद्धतीने राज्यातील शेतकऱ्यांनाही अनुदान द्यावे. सरकारने स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशी लागू कराव्यात. साडे सात हजार कोटींच्या कर्जाचा बोझा असलेले राज्य सरकार येत्या काही दिवसांमध्ये विदर्भाचा अनुषेश कसा भरून काढेल हे कळण्यास मार्ग नाही. विदर्भ राज्य व्हावा यासाठी एक दोन वेळा नाही तर तब्बल सात वेळा ठराव घेण्यात आला आहे. परंतु, अद्यापही विदर्भ राज्याची निर्मिती करण्यात आली नाही. सरकारने विदर्भ राज्याची निर्मिती करावी, अशी मागणी या यात्रेच्या माध्यमातून सुरू आहे. पक्षाकडून आपल्याला २० डिसेंबरला कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे. त्याचे उत्तर अद्यापही आपण दिले नाही. विदर्भासाठी वेळप्रसंगी राजीनामाही देऊ, असे याप्रसंगी आ. देशमुख यांनी सांगितले. पत्रकार परिषदेला राजेंद्र शर्मा, इक्राम हुसेन यांची उपस्थिती होती.वर्धेत पत्रकार परिषदे पूर्वी आ. आशिष देशमुख यांनी सेवाग्राम आश्रम गाठत महात्मा गांधी यांना आदरांजली अर्पण केली. येथे त्यांनी प्रार्थना केली. यावेळी आश्रम प्रतिष्ठाणचे पदाधिकारी उपस्थित होते.
शिवसेनेच्या निर्णयामुळे सरकारने मिळालेल्या संधीच सोन करावं
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 30, 2018 11:40 PM
शिवसेना ही विदर्भ राज्य निर्मितीसाठी विरोध करीत असल्याने ती सरकारच्या गळ्याची हड्डी झाली होती. शिवसेनेने पुढील काळात स्वतंत्र निवडणूक लढण्याचे जाहीर केले आहे. याच संधीचे सोने विदर्भ राज्याच्या निर्मितीसाठी सरकारने केले पाहिजे.
ठळक मुद्देआशिष देशमुख : विदर्भ राज्यासाठी ‘विदर्भ आत्मबळ यात्रा’ं