रामदास तडस : मुख्यमंत्री व पालकमंत्र्यांना पत्रलोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : जिल्हा बँकेत अनेक शेतकरी व शेतमजुरांची रक्कम अडकली आहे. ही बँक आता ऊभी होणे शक्य नाही यामुळे बँकेची चल व अचल संपत्ती लिलावात काढून प्राप्त रक्कमेतून जनतेला त्यांच्या ठेवी वितरीत कराव्या अशी मागणी खा. रामदास तडस यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व वित्तमंत्री तथा पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्याकडे केली केली आहे. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक आघाडी सरकारच्या काळात तत्कालीन राज्यकर्त्यांनी दिवाळखोरीत काढली; परंतु भारतीय जनता पक्षाचे सरकार आल्यानंतर पक्षपात न करता आपल्या सरकारने वर्धेसह इतरही जिल्ह्यातील दिवाळखोरीत निघालेल्या सहकारी बँकाना मदत करून व्यवहार सुरू केले. जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांचे, बहुसंख्य ग्रामीण भागातील व्यापाऱ्यांच्या रकमा या बँकेमध्ये ठेवण्यात आल्या होत्या; परंतु बँक दिवाळखोरीत निघाल्याने जनतेचा पैसा बँकेत अडकल्याचा आरोप खा. तडस यांनी केला आहे.
जिल्हा बॅकेच्या संपत्तीचा लिलाव करुन शेतकऱ्यांना पैसा द्यावा
By admin | Published: June 06, 2017 1:09 AM