शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्राचे बेस्ट मुख्यमंत्री कोण? अजित पवारांनी घेतले या नेत्याचे नाव, म्हणाले...'युती-आघाडीच्या युगात...'
2
मौलाना सज्जाद नोमानींनी जारी केली यादी; मुंबईतील ३६ जागांवर कुणाला दिला पाठिंबा?
3
आगीचा भडका, किंकाळ्या, चेंगराचेंगरी, पालकांचा आक्रोश...; मन हेलावून टाकणारा Video
4
दुसऱ्या मतदारसंघात उभा असतो तर निवडून आलो असतो; अजित पवारांचे बारामतीत महत्वाचे वक्तव्य
5
वाढत्या महागाईत व्हिलेन बनताहेत भाज्या; टोमॅटो, कांदा, बटाट्याच्या वाढत्या किंमतींनी बिघडवलं किचनचं बजेट
6
"...म्हणून अशोक चव्हाण आपल्याकडे आले, त्यांनी बाबासाहेबांचं म्हणणं ऐकलं"; नेमकं काय म्हणाले एकनाथ शिंदे?
7
Priyanka Gandhi : "महाराष्ट्राच्या धरतीने नेहमीच देशाला दिशा दिली"; प्रियंका गांधींकडून जय भवानीचा जयघोष
8
"युतीचे सरकार आल्यावर उद्धव ठाकरेंना जेलमध्ये टाकू"; अब्दुल सत्तार यांचा ठाकरेंवर प्रतिहल्ला
9
अबब! मतदानाच्या ४ दिवस आधी मुंबईत मोठी कारवाई; ८४७६ किलो चांदी पाहून अधिकारी हैराण
10
Sankashti Chaturthi 2024: संकष्टीने सुरु होणारा आठवडा बाराही राशींसाठी ठरणार लाभदायी!
11
'या' १८ जिल्ह्यांमध्ये आता हॉलमार्किंगशिवाय सोन्याचे दागिने विकले जाणार नाहीत
12
'स्विंग इज किंग'! हा भारतीय खेळाडू ठरू शकतो IPL मेगा लिलावातील सर्वात महागडा गोलंदाज
13
पुढील वर्षी १० वंदे भारत स्लीपर ट्रेन सुरू करण्याची तयारी, मार्ग आणि फीचर्स जाणून घ्या...
14
IPO च्या समुद्रात उतरणार अमन गुप्ता यांची 'boAt', काय आहे कंपनीचा प्लान?
15
Maharashtra Vidhan Sabha Election 2024:'व्होट जिहादची भाषा होणार असेल तर महायुतीने बांगड्या भरलेल्या नाहीत'; आशिष शेलारांचा इशारा
16
Maharashtra Election 2024: "तुमची हिंमत असेल, तर माझी जागा पाडून दाखवा"; नवाब मलिकांचं भाजपला चॅलेंज
17
Maharashtra Election 2024 Live Updates: PM मोदींची स्मरणशक्ती गेलीय, राहुल गांधींचा घणाघात
18
जामनेरमध्ये 'विकासा'च्या मुद्याची चर्चा; गिरीश महाजन यांचा डोअर टू डोअर प्रचारावर भर
19
विशेष लेख: भारतीय कप्तान काय घरी बसून बाळाचं डायपर बदलणार?
20
देशातील सर्वात मोठी सरकारी बँक घेणार १.२५ अब्ज डॉलर्सचं लोन, पाहा काय आहे प्लान?

झाडाला अपत्य समजून जोपासना करा

By admin | Published: June 30, 2017 1:47 AM

आपल्याकडे पूर्वी ३१ टक्के जंगल होते, मात्र आता ही टक्केवारी २०.४४ पर्यंत खालावली आहे.

रामदास आंबटकर : वृक्षदिंडीचा जिल्ह्यातील भ्रमणाचा समारोपलोकमत न्यूज नेटवर्कहिंगणघाट : आपल्याकडे पूर्वी ३१ टक्के जंगल होते, मात्र आता ही टक्केवारी २०.४४ पर्यंत खालावली आहे. हे कसे झाले, कोणी केले याचा विचार करण्यापेक्षा भविष्यासाठी आता प्रत्येक व्यक्तीने एक झाड लावण्याची गरज आहे. मेळघाट मधील लोक आजही आंघोळीचे पाणी पिण्यासाठी वापरतात. ही परिस्थिती आजच सावरली नाही तर भूतलावावर भीषण दुष्परिणाम भोगावे लागतील. प्रत्येकाने वृक्षाचे संगोपन आपले अपत्य समजून करावे, असे आवाहन भाजपचे महाराष्ट्र प्रदेश महामंत्री रामदास आंबटकर यांनी केले. ग्रीन अर्थ आॅर्गनायझेशन यांच्यावतीने आ. अनिल सोले यांच्या नेतृत्त्वात वृक्षदिंडी काढण्यात आली आहे. विदर्भ भ्रमण करीत असलेल्या वृक्षदिंडीचे आगमन हिंगणघाट शहरात झाल्यावर स्वागत करण्यात आले. जिल्ह्यातील या दिंडीचा प्रवास पूर्ण झाल्याने समारोपीय कार्यक्रम घेण्यात आला. कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून ते बोलत होते. समुद्रपूर आणि हिंगणघाट शहरात दिंडीचे विविध ठिकाणी स्वागत करण्यात आले. स्वागताला आमदार समीर कुणावार यांची उपस्थिती होती. मंचावर आमदार अनिल सोले, भाजपा जिल्हाध्यक्ष राजेश बकाने, कौस्तुभ चॅटर्जी यांची प्रमुख उपस्थिती होती.या सजीव सृष्टीवरील माणूस जगावा. मनुष्य प्राण्यासोबत वन्यप्राण्यांना शुद्ध हवा आणि सुखी जीवन लाभावे यासाठी आमदार सोले यांची जी तळमळ आहे ती प्रामाणिक असून उल्लेखनीय आहे. आमदार असतानाही वृक्षदिंडी काढून वृक्ष लागवड करण्याचा प्रचार व प्रसार करुन विदर्भाचे भ्रमण करीत आहे. लोकजागृतीचे कार्य प्रेरणादायी असल्याचे मत आमदार कुणावर यांनी व्यक्त केले. पाऊस पडत नाही, याचे एकमेव कारण वृक्षांची होणारी कत्तल आहे. पाऊस पडत नाही म्हणून शेती पिकत नाही. शेती पिकत नाही म्हणून शेतकरी आत्महत्या करतो. यावर तोडगा म्हणून एक तरी झाड लावा आणि आपले पर्यावरण समृद्ध करा. आज लग्नाच्या समारंभात भेटवस्तू म्हणून झाडे दिली पाहिजेत. या वृक्षदिंडीने वृक्ष लागवडीचे वातावरण निर्माण झाले आहे. यामुळे जनतेला ज्ञात झाले आहे की, वृक्ष लागवड झाली नाही तर विनाश सुरू होईल. सजीव सृष्टीचा नाश होईल म्हणून प्रत्येकाला एक झाड लावण्याचे आवाहन करण्यात आले. चार कोटी वृक्ष लागवडीचे ध्येय असल्याचे आमदार सोले यांनी यावेळी सांगितले. यावेळी आमदार सोले यांनी एकच लक्ष चार कोटी वृक्ष, असा संदेश देऊन १ ते ७ जुलैला मोठ्या प्रमाणात वृक्षारोपण करण्याचे आवाहन केले. वृक्षाची महती काय आहे, वृक्ष कत्तलीचे दुष्परिणाम यावेळी मार्गदर्शनातून प्रकट केले. वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या मार्गदर्शनानुसार वृक्षलागवड चळवळ जनसामान्यांपर्यंत पोहचावी म्हणून या वृक्षदिंडीचे प्रयोजन असल्याचे त्यांनी सांगितले. यानंतर कार्यक्रमात आमदार समीर कुणावार, रामदास आंबटकर यांच्या उपस्थितीत वृक्षदिंडीच्या कार्यक्रमात प्रत्येकाने एक तरी झाड लावावे आणि झाडाची कत्तल करणार नाही, अशी शपथ ग्रीन अर्थ फाउंडेशनचे कार्यवाहक प्रशांत कामडी यांनी दिली. यावेळी मान्यवरांनी वृक्षारोपण करून झाडे लावण्याचा संदेश दिला.कार्यक्रमाला जि.प. अध्यक्ष नितीन मडावी, गंगाधर कोल्हे, प्रेम बसंतानी, समाधान शेडगे, उपवनसंरक्षक दिगंबर पगार, कौस्तुभ चॅटर्जी, नगरसेवक प्रशांत कामडे, कोसुरकर, भाजप महामंत्री किशोर दिघे, आशिष पर्वत, सोनू गवळी, सौरभ पांडे, सौ वंदना कामडी, विजय चौरसिया, भाजपा नेते बबली मेश्राम, किशोर पाटील, देवा डेहनकर, अशोक सायरे, विपुल सोले, सचिन पराते, विशाल सोले, वनविभागाचे कर्मचारी, नगरसेवक आणि स्वयंसेवी संस्थांचे पदाधिकारी, अधिकारी व नागरिक उपस्थित होते.हनुमान टेकडीवरील रोपांची केली पाहणीवर्धा - हनुमान टेकडीवर वैद्यकीय जनजागृती मंच व विविध सामाजिक संघटना, जिल्हा प्रशासन आणि लोकसहभागातून वृक्षारोपणासाठी खोदलेले खड्डे आणि जलसंवर्धन कामाची पाहणी आमदार अनिल सोले यांनी केली. वन महोत्सवादरम्यान या टेकडीवर लावण्यात येणाऱ्या आठ हजार रोपांचा खर्च करणार असल्याचे आ. सोले यांनी सांगितले. यावेळी नगराध्यक्ष अतुल तराळे, जेएनपीटीचे माजी सदस्य अविनाश देव, भाजपचे शहर अध्यक्ष प्रशांत बुर्ले, सहाय्यक वनसंरक्षक बडेकर, वनपरिक्षेत्र अधिकारी बनसोड, वैद्यकीय जनजागृती मंचचे अध्यक्ष डॉ. सचिन पावडे, सचिव डॉ. यशवंत हिवंज व सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रास्ताविक डॉ. सचिन पावडे यांनी केले. संचालन श्याम भेंडे यांनी तर आभार तराळे यांनी मानले.