लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : श्री संत गजानन महाराज प्रगटदिनानिमित्त द इव्हेंट्स व वैद्यकीय जनजागृती मंचच्यावतीने गौरव समारंभात कर्तबगार व्यक्ती, विद्यार्थी आणि वॉटर कप स्पर्धेतील क्रमांक प्राप्त गावांचा सन्मान करण्यात आला.जिल्हाधिकारी विवेक भिमनवार, जि. प. चे मुख्य कार्यपालन अधिकारी डॉ. सचिन ओंबासे, उपजिल्हाधिकारी मनोज खैरनार, उपविभागीय अधिकारी सुरेश बगळे, कार्यक्रम संयोजक डॉ. सचिन पावडे, सुरेश पावडे, डॉ. अरुण पावडे, राजेंद्र गरपाल, कराळे उपस्थित होते. कार्यक्रमात बहार नेचर फाउंडेशनमधील सदस्य, वानरविहिरा (सेलू) येथील प्रिया नेहारे, जिव्हाळा स्वयंसेवी संस्था, पवनार येथील उत्कर्ष ग्रामविकास संस्था, पतीच्या निधनानंतर कुटुंबाकरिता स्वबळावर जिद्दीने कुलीचे काम करणाऱ्या कावळे, अवघ्या ४ वर्षांच्या अर्णवी सागर राचर्लावार हिने आग्रा येथील राष्ट्रीय नृत्य स्पर्धेत द्वितीय क्रमांक मिळविल्याबद्दल तिचा गौरव करण्यात आला.या गावांचा झाला सन्मानवॉटर कपमध्ये तालुकास्तरावर आर्वी तालुक्यातील प्रथम बाजारवाडा, द्वितीय उमरी, तृतीय किन्हाळा, सेलू तालुक्यातील प्रथम हिवरा (दिंदोडा) द्वितीय दिंदोडा (हिवरा), तृतीय पळसगाव (बाई), देवळी तालुका प्रथम हिरापूर, द्वितीय शेंदरी, तृतीय मलकापूर, कारंजा तालुका प्रथम बांगडापूर, द्वितीय महादापूर, तृतीय पुरस्कार सावरडोह गावाला सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. आसमंत अनाथालय येथील बालकांना शालेयपयोगी भेटवस्तू द इव्हेंट्सच्या ज्येष्ठ व्यक्तींच्या हस्ते देऊन गौरविण्यात आले. डॉ. प्रशांत वाडीभस्मे व संचाने छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनातील अजरामर प्रसंग अफजलखानाचा वध यावर पोवाडा सादर केला. कार्यक्रमाचे संचालन प्रा.अमोल गाढवकर व प्रा. श्याम भेंडे यांनी केले. आभार शैलेंद्र कराळे यांनी मानले.
कर्तबगार व्यक्ती, वॉटर कपमधील गावांचा सन्मान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 21, 2020 6:00 AM
जिल्हाधिकारी विवेक भिमनवार, जि. प. चे मुख्य कार्यपालन अधिकारी डॉ. सचिन ओंबासे, उपजिल्हाधिकारी मनोज खैरनार, उपविभागीय अधिकारी सुरेश बगळे, कार्यक्रम संयोजक डॉ. सचिन पावडे, सुरेश पावडे, डॉ. अरुण पावडे, राजेंद्र गरपाल, कराळे उपस्थित होते.
ठळक मुद्देवैद्यकीय जनजागृती मंचचा उपक्रम : बहार नेचर फाऊंडेशन व जिव्हाळा संस्थेचा गौरव