लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : उन्नाव येथे युवतीवर तर कठुआ येथे चिमुरडीवर अत्याचार करण्यात आला. या घटनांचा जिल्हा काँगे्रस कमिटीने कॅण्डल मार्च काढून निषेध नोंदविला. भाजप सरकारचाही यावेळी निषेध नोंदविण्यात आला.शहर व जिल्हा महिला काँगे्रसद्वारे जिल्हा काँग्रेस कमिटीच्या नेतृत्वात व महिला काँगे्रसच्या प्रदेशाध्यक्ष अॅड. चारूलता टोकस यांच्या उपस्थितीत छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे कॅण्डल मार्च काढण्यात आला. यावेळी विद्यमान भाजप सरकारचा तीव्र निषेध नोंदविला. कायदा व सुव्यवस्था शिल्लक नाही, याचा प्रत्यय महिलांवर होणाऱ्या अत्याचारातून येत आहे. चिमुरडीलाही सुरक्षा मिळणार नाही काय, याचा जाब विचारण्याची वेळ सरकारने आणल्याच्या भावना अॅड. टोकस यांनी व्यक्त केल्या. यावेळी शेखर शेंडे, हेमलता मेघे, जि.प. सदस्य संजय शिंदे, विपीन राऊत, महेश तेलरांधे, सुनील कोल्हे व पदाधिकारी सहभागी झाले होते.
कॅण्डल मार्च काढून कठुआ, उन्नाव घटनांचा निषेध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 14, 2018 10:28 PM
उन्नाव येथे युवतीवर तर कठुआ येथे चिमुरडीवर अत्याचार करण्यात आला. या घटनांचा जिल्हा काँगे्रस कमिटीने कॅण्डल मार्च काढून निषेध नोंदविला. भाजप सरकारचाही यावेळी निषेध नोंदविण्यात आला.
ठळक मुद्देकाँगे्रसने ओढले भाजप सरकारवर ताशेरे