राज्यभर दारुबंदीची मागणी : दारूबंदीकरिता झटणाऱ्या पोलिसांचा सत्कारलोकमत न्यूज नेटवर्कसेलू : संपूर्ण महाराष्ट्र राज्यात दारूबंदी करावी या मागणीसाठी सेलू ते सेवाग्राम ही पदयात्रा सोमवारी सकाळी तहसील कार्यालयाजवळून निघाली. या यात्रेत दारूबंदी महिला मंडळ व सामाजिक कार्यकर्ते सहभागी होते. यावेळी दारूबंदीसाठी काम करणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांचा सत्कारही करण्यात आला. संपूर्ण महाराष्ट्रात दारूबंदी करावी, एका वर्षात दारू विकताना एका व्यक्तीला दोनवेळा पकडल्यास एक वर्षे त्याला जमानत मिळणार नाही अशी तरतुद कायद्यात करावी, दारूबंदीसाठी काम करणाऱ्या महिला मंडळांना मानधन द्यावे, अवैध दारू विक्रेत्यावर विषारी द्रव्य विकल्याचा गुन्हा दाखल करावा आदी मागण्या यावेळी करण्यात आल्या. या पदयात्रेत महिलांचा उत्स्फुर्त प्रतिसाद होता. तालुका दारूबंदी महिला मंडळाच्या अध्यक्ष पुष्पा झाडे यांच्यासह गोविंद पेटकर, उमेश कांबळे, मारोती कुकडे, अनंता सयाम, उर्मीला पाठक, अनिता भोवरे, रूपाली बनसोड, नंदा सहारे, शालिनी पाठक, शकुंतला वानखेडे, सुनीता खंडाते, कुंदा कुकडे, सुनीता व सविता मेश्राम, सीता उईके, लिला लिल्हारे, सुनीता राऊत, अंजना सयाम, पुष्पा दुधकोहळे, सुधा जगताप, रूपाली बनसोड, मारोती कुबडे, पंकज पाटील, चंद्रशेखर मडावी, कांता नेहारे, कुसूम मरसकोल्हे यांचा सहभाग होता.तहसील कार्यालयाजवळून पदयात्रा निघाली. यावेळी दारूबंदीत सहकार्य करणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांचा ठाणेदार संजय बोठे, सेलू नगरपंचायत उपाध्यक्ष चुडामण हांडे, घोराडच्या सरपंच ज्योती घंगारे यांनी सत्कार केला. पदयात्रा पवनार जवळ पोहचली असता दुपारी ३ वाजता जोरदार पावसाचा फटका बसला तरीही यात्रेकरूंनी सेवाग्राम गाठले.
‘सेलू ते सेवाग्राम’ दारूबंदी पदयात्रेत अनेकांचा सहभाग
By admin | Published: June 27, 2017 1:14 AM