लोकमत न्यूज नेटवर्कसेलू/घोराड : दिवाळी सण होवूनही या हंगामात जिनिंग मालकांनी कापूस खरेदीचा शुभारंभ केला नाही. यामुळे शेतकºयांची चिंता वाढत आहे. यामुळे सिंदी कृषी उत्पन्न बाजार समितीने पुढाकार घेत व्यापाºयांची सभा घेवून ६ नोव्हेंबर पासून कापूस खरेदी सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. सेलू येथील उपबाजारात कापूस आता लवकरच कापूस खरेदी होणार असून शेतकºयांचे लक्ष भावाकडे लागले आहे.या बाजारपेठेत सीसीअरयचे खरेदी केंद्र सुरू व्हावे, ज्यामुळे कापसाला हमीभाव मिळेल अशी मागणी शेतकºयांकडून करण्यात आली आहे. या बाजारपेठेची व इथल्या जिनिंग प्रेसिंग केंद्राची पाहणी सीसीआयने केली असून या हंगामात त्यांच्यावतीने येथे खरेदी सुरू होण्याची चिन्हे आहेत.कापूस वेचणीला सध्या वेग आला असून शेतकºयांच्या घरी कापूस येणे सुरू झाला आहे. ज्या शेतकºयांनी सोयाबीनचा पेराच केला नाही अशा शेतकºयांना कापूस विक्रीशिवाय पर्याय नाही; पण खरेदी केंद्रच सुरू झाले नसल्न्याने कापसाला शासनाने जाहीर केलेला हमीभाव मिळण्याची शक्यताही धुसर झाली आहे. व्यापाºयांकडून या संधीचा लाभ उचलत शेतकºयांची पिळवणूक होण्याची शक्यता अधिक आहे. या कापूस खरेदी दरम्यान शेतकºयांना किती रुपये दर मिळतो याचा खुलासा मुहूर्तावरच होत आहे. सद्यास्थितीत बाजारसत सोयाबीनची आवक मोठ्या प्रमाणात आहे. येथेही शेतकºयांची लूटच सुरू आहे.लांब धाग्याचा कापूस उत्पादक तालुकालांब धाग्याचा कापूस उत्पादन करणारा तालुका म्हणून सेलू तालुक्याची विदर्भात ओळच आहे. सेलूच्या बाजारपेठेत हिंगणी, जुवाडी येथे प्रत्येकी एक तर सेलू शहरालगत चार ते पाच जिनिंग केंद्र आहे. येथे परिसरातीलच नव्हे तर दुरवरुन शेतकरी कापूस विक्रीसाठी आणतात. पुढील महिन्यात बाजारपेठ पांढºया सोन्यांनी फुलणार आहे.उत्पादनात घटशेतीत सद्यस्थितीत कपाशीचे हिरवकंच असली तरी कपाशीला असलेली बोंडे पाहता उत्पन्नाची शास्वती कमी आहे. शेतकºयांनी बांधलेला अंदाज येथे फोल ठरण्याची शक्यता आहे. हंगामात केलेला खर्च पाहता तो निघण्याची चिंता शेतकºयांना पडली आहे. यामुळे उत्पन्नातील घट शेतकºयांना आर्थिक अडचणीत आणणारी ठरणार आहे.दि. २८ ला कापूस खरददारांची बैठक घेण्यात आली. यात ६ नोव्हेंबर पासून कापूस खरेदीचा शुभारंभ करण्यावर एकमत झाले. ७ नोव्हेंबर दरम्यान सेलूच्या बाजारपेठेत सीसीआयची खरेदी करण्याची शक्यता आहे. लिलावात व्यापाºयांसोबत सीसीआय सुद्धा भावाची बोली बोलतील. दिवसातून दोनदा कापसाचा लिलाव होईल. सकाळी ११ व दुपारी ३ अशी वेळ राहील. शेतकºयांना कापसाला चांगला भाव व तात्काळ चुकारा मिळावा म्हणून बाजार समितीचा प्रयत्न राहणार आहे. .- विद्याधर वानखेडे, सभापती, सिंदी कृषी उत्पन्न बाजार समिती.
बाजार समितीने शोधला कापूस खरेदीचा मुहूर्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 29, 2017 11:42 PM
दिवाळी सण होवूनही या हंगामात जिनिंग मालकांनी कापूस खरेदीचा शुभारंभ केला नाही. यामुळे शेतकºयांची चिंता वाढत आहे.
ठळक मुद्देसीसीआयच्या खरेदीची मागणी : जिनिंग मालकांची सभा