लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : तब्बल १ महिना १३ दिवसांनी गुरुवारी लोकसभा मतदारसंघाच्या मतमोजणीच्या दिवस आला. दरम्यान गुरुवारी सर्वांच्या नजरा निकालाकडे असल्याने शहरातील बाजारपेठ आणि विविध प्रमुख रस्त्यांवर कमालीचा शुकशुकाट होता.गुरुवारी सकाळी आठ वाजतापासून भारतीय खाद्य निगमच्या गोदामात मतमोजणीला प्रारंभ झाला. आपल्या मतदार संघाचा निकाल शिवाय देशातील स्थिती जाणून घेण्याकरिता नागरिक सकाळपासूनच दूरचित्रवाणी संचावरील विविध वृत्तवाहिन्यांवरील निकाल पाहण्यात व्यस्त होते. अनेक शासकीय कर्मचारी देखील निकाल पाहण्यासाठी रजेवर होते. त्यामुळे शासकीय कार्यालये एवढेच नव्हे तर बाजारपेठेतील कापड दुकाने, सराफा ओळ, उपाहारगृहंमध्ये फारशी गर्दी नव्हती. तर ग्राहकच नसल्याने व्यावसायिक देखील दुकानातील टीव्हीवर निकाल पाहण्यात व्यस्त होते. बाजारपेठ, विविध रस्ते, वॉर्डांत स्मशान शांतता पसरलेली होती. शहरातील अनेक पान ठेल्यांवर गर्दी दिसून आली. येथे खर्रा चघळण्यासोबतच निकाल पाहण्याचा आनंद घेत होते. तर काही चौकांमध्ये सायंकाळी नागरिक निकालावर चर्चा करताना आढळून आले. चर्चेतून त्यांनी मोदी लाट अद्याप ओसरली नसल्याचाच सूर आळवला.सूर्यप्रहाराचाही धसकालोकशाहीच्या उत्सवाचा आज निकाल असल्याने शहरातील मार्गावर गर्दी उसळण्याची शक्यता वर्तविली जात होती. परंतु, सूर्यप्रहाराने अनेकांनी चार भिंतीआत बसूनच निकालाची माहिती जाणून घेतली. आज वर्ध्यातील तापमान ४६ अंशांवर गेल्याने उन्हाचे चटके असहय्य असल्याने अनेकांनी जनसंपर्क कार्यालयात बसूनच आनंद साजरा केला.
बाजारपेठ, प्रमुख रस्त्यांवर अघोषित संचारबंदी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 23, 2019 11:28 PM
तब्बल १ महिना १३ दिवसांनी गुरुवारी लोकसभा मतदारसंघाच्या मतमोजणीच्या दिवस आला. दरम्यान गुरुवारी सर्वांच्या नजरा निकालाकडे असल्याने शहरातील बाजारपेठ आणि विविध प्रमुख रस्त्यांवर कमालीचा शुकशुकाट होता. गुरुवारी सकाळी आठ वाजतापासून भारतीय खाद्य निगमच्या गोदामात मतमोजणीला प्रारंभ झाला.
ठळक मुद्देसारे दूरचित्रवाणी संचापुढे : व्यावसायिकही निकाल पाहण्यात दंग