लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : सोयाबीन हा शेतमाल विक्री दरम्यान कुठलीही लुबाडणूक होऊ नये या उद्देशाने पणन महासंघाकडून जिल्ह्यात सात केंद्र सुरू करण्यात आले आहेत. या केंद्रांवर सध्या ३,८८० रुपये क्विंटल दराने शासनाला सोयाबीन विक्री करू इच्छिणाऱ्या शेतकऱ्यांची नोंद घेतली जात आहे. १५ सात केंद्रांवर शेतकऱ्यांसाठी नोंदणी सुविधा। १५ ऑक्टोबरला संपणार मुदतक्टोबरपर्यंत शेतकऱ्यांना सोयाबीन विक्री संदर्भात नोंदणी करता येणार असल्याचे सांगण्यात आले.यंदाच्या वर्षी जिल्ह्यात १ लाख ३९ हजार हेक्टरवर शेतकऱ्यांनी सोयाबीनची लागवड केली. हंगामाच्या सुरूवातीला वेळोवेळी झालेला पाऊस आणि पिकांची योग्य निगा राखल्याने पिकाची वाढही बऱ्यापैकी झाली. मात्र, सप्टेंबर महिन्यात सोयाबीन पिकावर खोंडमाशीने अटॅक केला. सोयाबीन उत्पादक शेतकरी या संकटावर मात करीत असतानाच सप्टेंबर महिन्यात सततच्या पावसामुळे सोयाबीनच्या शेंगांना कोंब फुटले.परिणामी, यंदाच्या वर्षी जिल्ह्यातील सोयाबीन उत्पादकांना चांगलाच फटका बसला आहे. अशाही परिस्थितीत हमी भावापेक्षा कमी दरात शेतकऱ्यांचे सोयाबीन विकल्या जाऊ नये या हेतूने पणन विभागाकडून जिल्ह्यात सात केंद्र सुरू करण्यात आले आहेत. तेथे १ ऑक्टोबरपासून शासनाला सोयाबीनची विक्री करू इच्छिणाऱ्या शेतकऱ्यांची नोंदणी केली जात आहे. असे असले तरी अद्यापही एकाही सोयाबीन उत्पादक शेतकºयाने सोयाबीन विक्रीसाठी नोंदणी केलेली नसल्याचे अधिकाºयांकडून सांगण्यात आले.या केंद्रांवर होतेय ऑनलाईन नोंदणीसोयाबीन खेरदीसाठी शासनाने जिल्ह्यात सात केंद्र सुरू केली आहेत. यात वर्धा तालुका सह. खरेदी विक्री समिती, देवळी तालुका खरेदी विक्री समिती, पुलगाव,कारंजा तालुका सह. खरेदी विक्री समिती, आष्टी तालुका खरेदी विक्री समिती, हिंगणघाट तालुका खरेदी विक्री समिती, समुद्रपूर तालुका खरेदी विक्री समितीचा समावेश असून तेथे ऑनलाईन पद्धतीने नोंदणी सुरू आहे.जोडावी लागणार ही कागदपत्रेसात केंद्रांवर ऑनलाईन पद्धतीने नोंदणी सुरु असली तरी नोंदणी करते वेळी शेतकऱ्यांना त्यांचे आधारकार्ड, सातबारा उतारा पीकपेरा, बँकेचे पासबुकची झेरॉक्स ही कागदपत्रे जोडावी लागणार आहे.सोयाबीन खरेदीसाठी शासनाने हंगाम २०२०-२१ साठी आधारभूत किंमतीनूसार १ ते १५ ऑक्टोबरपर्यंत शेतकऱ्यांची नोंदणी प्रक्रिया सुरु केली आहे. जिल्ह्यातील सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांनी १५ ऑक्टोबरपर्यंत सोयाबीन विक्रीसाठी नोंदणी करावी. सोयाबीनला प्रति क्विंटल ३ हजार ८८० रुपये देण्यात येणार आहे.- बिलाल शेख, जिल्हा पणन अधिकारी, वर्धा.
पणन महामंडळ घेणार ३,८८० प्रतिक्विंटल दराने सोयाबीन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 04, 2020 5:00 AM
यंदाच्या वर्षी जिल्ह्यात १ लाख ३९ हजार हेक्टरवर शेतकऱ्यांनी सोयाबीनची लागवड केली. हंगामाच्या सुरूवातीला वेळोवेळी झालेला पाऊस आणि पिकांची योग्य निगा राखल्याने पिकाची वाढही बऱ्यापैकी झाली. मात्र, सप्टेंबर महिन्यात सोयाबीन पिकावर खोंडमाशीने अटॅक केला. सोयाबीन उत्पादक शेतकरी या संकटावर मात करीत असतानाच सप्टेंबर महिन्यात सततच्या पावसामुळे सोयाबीनच्या शेंगांना कोंब फुटले.
ठळक मुद्देसात केंद्रांवर शेतकऱ्यांसाठी नोंदणी सुविधा। १५ ऑक्टोबरला संपणार मुदत