लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा: जिल्ह्यातील सेलू घोराड येथील शेतकऱ्यांनी नगदी पीक म्हणून भोपळे (कोहळे) पिकवले. मात्र लॉकडाऊनमुळे बाजारपेठा बंद असल्याने हे भोपळे शेतकऱ्यांच्या घरात पडून मातीमोल ठरण्याची भीती निर्माण झाली आहे.उन्हाळी पीक म्हणून बहुतांश शेतकऱ्यांनी शेतात कोहळ्याचे पीक घेतले होते. आता कोहळे बाजारात नेऊन दोन पैसे जवळ येईल ही आशा शेतकऱ्यांना होती. पण संचारबंदीमुळे आठवडी बाजार तर बंदच झाले पण मोठ्या प्रमाणात असणारे हे कोहळे जिल्ह्याच्या बाजार पेठेत दलालजवळ नेऊन विकल्या जाते पण जिल्हा बंदी असल्याने कोहल्याचे भाव गडगडले. त्या मुळे कोहळे विकून येणारे पैसे जर मोजल्या गेले तर लावलेला खर्च निघेनासा झाला आहे. शेतकऱ्यांजवळ शेतात साठवणूक करण्यासाठी व्यवस्था नाही. अश्यातच ढगाळ वातावरणामुळे व पावसाच्या आलेल्या सरीमुळे शेतकऱ्याला शेतातच कोहळे तडपत्रीचा आधार घेऊन झाकण्याचा वेळ आला आहे. मात्र संचार बंदीत वाढ झाल्यास कोहळ्याला नुकसान पोहचण्याची भीती जास्त आहे. त्या मुळे संचार बंदीत कोहळे अडचणीत सापडले आणि शेतकरी ऐन खरिपाच्या तोंडावर अडचणीत सापडले आहे .
बाजार उपलब्ध नसल्याने व कोहळे निघण्याची वेळ आली काहींनी तोडलीसुद्धा. पण संचार बंदीमुळे जिल्ह्याबाहेर कोहळे विकता येत नाही आणि आता ४ ते ५ रू भावाने मागत असल्याने खर्चही निघत नाही अशी वाईट परिस्थिती आली आहे.पंकज तडस शेतकरी