गुन्ह्यातील जीप जप्त : आरोपी फरार; शोध सुरू लोकमत न्यूज नेटवर्कसमुद्रपूर : विवाहितेला जीपमध्ये बसवून नागपूर मार्गे हिंगणघाटला नेत तिच्यावर अतिप्रसंग केल्याची तक्रार विवाहितेने गिरड पोलिसात केली. पोलिसांनी या प्रकरणाची नोंद करून घटनास्थळ नागपूर जिल्ह्यातील बेला ठाण्यांतर्गत येत असल्याने प्रकरण बेला ठाण्यात वर्ग केले. ही घटना गुरुवारी सकाळी उघड झाली असून या प्रकरणी अद्याप कुणालाही अटक करण्यात आली आहे. पोलीस सुत्रानुसार, पीडिता ही पुतणीच्या प्रवेशाकरिता नागपूर जात असताना सिर्सी येथील रंगनाथबाबा मंदिराजवळ ती बसची वाट पाहत होती. यावेळी गिरड येथील दोन युवकांनी सदर महिला व तिच्या पुतणीला जीपमध्ये नागपूरला नेले. तेथे पुतणी अर्ज भरण्याकरिता महात्मा गांधी सर्जिकल रुग्णालयात गेली असता वाहनातील युवकाने या महिलेशी अश्लील चाळे केले. महिलेची पुतणी येताच तो त्याच्या सिटवर जावून बसला. परतीच्यावेळी सदर जीप जाम येथे थांबविण्याकरिता प्रयत्न केले असता गाडी न थांबविता ती हिंगणघाट मार्गावर उबदा पुलाच्या खाली नेत महिलेच्या पुतणीला व सोबत असणाऱ्याला उतरवून महिलेवर अतिप्रसंग केला. यात महिला बेशुद्ध पडल्याने तिला जाग आली तेव्हा ती वरोराच्या मच्छीमार्केटमध्ये असल्याचे महिलेने तक्रारीत सांगितले. तेव्हा रात्रीचे १ वाजले होते. त्यावेळी मोबाईल वरुन वरोरा येथील बहनीला फोन करून सर्व हकीकत सांगितली व तिच्याकडे थांबली. दुसऱ्या दिवसी या महिलेने गिरड गाठत पतीला सर्व हकीकत सांगितली व गिरड पोलिसात तक्रार दाखल केली.सदर महिलेचे पलायन सिर्सीवरुन झाल्याने गिरड पोलिसांनी गुन्हा नोंद करून सिर्सी हे बेला पोलीस ठाण्यांतर्गत येत असल्याने प्रकरण बेला पोलिसांकडे वर्ग करण्यात केले. बेला पोलिसांनी आरोपी किशोर नौकरकार रा. गिरड व अधिक एकसाथीदार याच्या विरुद्ध भादंविच्या कलम ३६३, ३६४, ३७६, ५०४,५०६ नुसार गुन्हा नोंद केला असून गुन्हात वापरलेली जीप जप्त करण्यात आली आहे. यातील आरोपीचा शोध सुरू आहे.
विवाहितेला पळवून अतिप्रसंग
By admin | Published: June 30, 2017 1:41 AM