वर्धा - नगर पालिकेच्या कचरा संकलन केंद्रात पहाटेच्या सुमारास भीषण आग लागली. आगीत घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पाच्या खत निर्मितीच्या मशीन जळून खाक झाल्या. आग लागल्याची माहिती मिळताच नगर पालिकेच्या अग्निशमक बंबाच्या मदतीने आगीवर नियंत्रण मिळविण्यात आले.
बोरगाव (मेघे) परिसरात असलेल्या नगर पालिकेच्या कचरा संकलन केंद्रात रविवारी पहाटेच्या सुमारास भीषण आग लागली. आगीत घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पाच्या बेलिंग मशीन, सेक्रेनिंग मशीन आणि दोन ग्रेडर मशीन जळून खाक झाल्या. तर ओला आणि सुका कचऱ्याचे सेटदेखील जळून खाक झाले. या आगीत लाखोंचे साहित्य जळून खाक झाल्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे.
आगीची माहिती मिळताच इंजापूर येथील सरपंचांनी अग्निशमक दलाला पाचारण केले. अग्निशामक दलाच्या बंबाने आगीवर पाण्याचा मारा करून आगीवर काहीप्रमाणात नियंत्रण मिळविले असून अजूनही आग धुमसत असल्याची माहिती आहे. आगीवर पूर्णपणे नियंत्रण मिळविणे सुरू असून घटनास्थळी नगर पालिकेचे अधिकारी दाखल झाले आहे.
महत्त्वाच्या बातम्या
Delhi Election Results : हटके असणार केजरीवालांचा शपथविधी; ते 50 'आम आदमी' ठरणार लक्षवेधी
Delhi Election Results : अरविंद केजरीवाल तिसऱ्यांदा मुख्यमंत्री होणार, आज शपथ घेणार
China Coronavirus : जगभरात ६७ हजार लोकांना कोरोनाचा संसर्ग; तब्बल १६०० बळी
'मतभेदांना देशविरोधी ठरवणं हा लोकशाहीवरील हल्ला'
राज्यात लवकरच शेतीसाठी पाणी महागणार, उद्योजकांनाही फटका