आनंद इंगोले।लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : महिला व बालकांच्या कल्याणाकरिता शासनाच्या महिला व बालविकास मंत्रालयाच्यावतीने प्रधानमंत्री मातृ वंदना योजना सुरु केली आहे. आरोग्य विभागाने दोन वर्षाच्या कालावधीत या योजनेंची प्रभावी अंमलबजावणी केली. आठही तालुक्यातील १० हजार १२८ लाभार्थ्यांची नोंदणी करुन त्यांना ३ कोटी ४ लाख ४९ हजार रुपयाचे अनुदान त्यांच्या बँक खात्यात जमा केले आहे.भारत सरकारव्दारे चालविण्यात येणारा एक मातृत्व लाभ कार्यक्रम म्हणून महिला व बालविकास मंत्रालयाच्यावतीने प्रधानमंत्री मात वंदना योजना २०१० पासून राबविली जात आहे. भारतातील आर्थिक परिस्थितीचा विचार करता समाजातील मोठा घटक मोलमजूरी करुन जगत आहे. घरातील महिला व पुरुष दोघेही मोलमजुरी करतात. परंतु गर्भधारणेच्या अवस्थेत महिलेला काम करताना अडचणी येत असल्यामुळे ती काम करु शकत नाही. त्यामुळे परिवारातील आर्थिक स्थिती खालावते. अशा स्थितीत या परिवाराला मदत मिळावी आणि जन्म आणि बालसंगोपणाला हातभार लागावा याकरिता ही योजना पूर्वी इंदिरा गांधी मातृत्व सहकारिता योजना, या नावाने सुरु करण्यात आली होती. आता ही योजना प्रधानमंत्री मातृत्व वंदना योजना या नावाने सुरु आहे. १९ वर्षे किंवा त्यापेक्षा जास्त वयाच्या गर्भवती व स्तनपान करणाऱ्या महिला या योजनांच्या लाभार्थी असून या योजनेंतर्गत सरकारने ५ हजार रुपयाची तरतूद केली आहे. या योजनेचा लाभ प्रत्येक गावातील महिलांना मिळवून देण्यासाठी आरोग्य विभागाच्या आशा स्वयंसेविका, आरोग्यसेविका प्रयत्नरत आहे. या योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीमुळे महिला व बालकांच्या आरोग्यासाठी आर्थिक हातभार लागत आहे.तीन हप्त्यांमध्ये मिळतोच लाभया योजनेचा लाभ तीन हप्त्यात मिळत असून या लाभाकरिता लाभार्थ्याचे व त्यांच्या पतीचे अद्यावत आधार कार्ड हे बँक खात्याशी संलग्न असावे. पहिल्या हप्त्यात १ हजार रुपयाकरिता लाभार्थ्यांना मासिक पाळीच्या शेवटच्या तारखेपासून १५० दिवसाच्या आत गर्भधारणा नोंदणी करणे आवश्यक आहे. दुसरा हप्ता २ हजार रुपयाचा असून गर्भधारणेपासून सहा महिन्याच्याआत कमीत कमी एक तपासणी केल्यानंतर मिळतो. तिसरा हप्ता २ हजार रुपयाचा असून याकरिता प्रसुतीनंतर जन्म झालेल्या अपत्यांची जन्म नोंदणी व बालकास १४ आठवड्याच्या आतील संपूर्ण लसीकरण दिल्यानंतर मिळतो. तीनही हप्त्यातील पाच हजार रुपयाचे अनुदान डीबीटी व्दारे लाभार्थ्यांच्या खात्यात थेट जमा केले जाते.जिल्ह्यात मागील दोन वर्षापासून आरोग्य विभागाच्यावतीने प्रधानमंत्री मातृ वंदना योजनेची प्रभावीपणे अंमलबजावनी केली जात आहे. या योजनेचा आठही तालुक्यातील महिलांना लाभ मिळावा याकरिता आशा स्वयंसेविका व आरोग्यसेविका कार्यरत आहे. याबाबत अधिक माहितीकरिता जिल्हा कार्यक्रम समन्वयक नीता दांडेकर किंवा आशा व आरोग्यसेविकांशी संपर्क साधावा. ही योजना १०० टक्के यशस्वी करण्यासाठी सर्वांनी सहकार्य करण्याची गरज आहे.डॉ.अजय डवले, जिल्हा आरोग्य अधिकारी.
मातृ वंदना योजनेची जिल्ह्यात कोटी उड्डाणे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 18, 2019 9:59 PM
महिला व बालकांच्या कल्याणाकरिता शासनाच्या महिला व बालविकास मंत्रालयाच्यावतीने प्रधानमंत्री मातृ वंदना योजना सुरु केली आहे. आरोग्य विभागाने दोन वर्षाच्या कालावधीत या योजनेंची प्रभावी अंमलबजावणी केली. आठही तालुक्यातील १० हजार १२८ लाभार्थ्यांची नोंदणी करुन त्यांना ३ कोटी ४ लाख ४९ हजार रुपयाचे अनुदान त्यांच्या बँक खात्यात जमा केले आहे.
ठळक मुद्दे१० हजार १२८ लाभार्थ्यांना ३ कोटी ४ लाखांचे अनुदान