लोकमत न्यूज नेटवर्कदेवळी : पुलगावच्या दारूगोळा भांडारातील घटनेमागे संरक्षण मंत्रालयाचे अधिकारी व संबंधीत ठेकेदार यांचे अर्थपूर्ण संबंध कारणीभूत आहे, असा आरोप शिवसेनेचे वर्धा जिल्ह्याचे संपर्क प्रमुख तथा माजी खासदार अनंतराव गुढे यांनी स्थानिक विश्रामगृहात आयोजित पत्रपरिषदेत केला.गुढे पुढे म्हणाले, तालुक्यातील सोनेगाव (आबाजी) जवळील सीएडी कॅम्पच्या प्रतिबंधित क्षेत्रात कालबाह्य बॉम्ब निकामी करीत असताना स्फोट झाला. यात सहा जण ठार झाले. यामध्ये जबलपूर डिफेन्सचा एक अधिकारी व देवळी तालुक्यातील ५ जणांचा समावेश आहे. या घटनेला पुलगाव डिफेन्सचे अधिकारी व ठेकेदार अशोक चांडक सर्वस्वी जबाबदार असल्याने त्यांच्यावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात यावा. सीमेवर एखादा जवान ठार झाल्यानंतर त्याच्या कुटंूबियांना जी शासकीय मदत दिली जाते ती मदत या घटनेतील मृतकांच्या कुटुंबियांना देण्यात यावी. कुटूंबातील एका व्यक्तीला शासकीय नोकरीत सामावून घेण्यात यावे, अशी मागणीही त्यांनी यावेळी केली. ठेकेदार चांडक यांच्याकडे बॉम्ब निकामी करण्याचा परवाना होता का? तशा प्रकारचे प्रशिक्षण जखमींसह मृतकांना घटनेपुर्वी दिले होते काय, ठेकेदार डिफेन्सचा अधिकृत ठेकेदार होता का, मृतक डिफेन्सच्या मस्टरवर होते का आदी बाबी संशयास्पद असल्याने त्याबाबतची चौकशी करण्यात यावी. मृतक व जखमींच्या कुटुंबियांना तात्काळ शासकीय भरीव मदत देण्याची मागणी यावेळी शिवसेनेचे संपर्क प्रमुख अनंतरावर गुढे यांनी केली.जखमी व मृतकांच्या कुटुंबीयांना मदत द्यामृतकांसह जखमींच्या कुटूंबीयांना तात्काळ शासकीय मदत करण्यात यावी, अशी मागणी याप्रसंगी करण्यात आली. पत्रपरिषदेला शिवसेनेचे जिल्हा प्रमुख बाळू शहागडकर, अनंता देशमुख, विलास निवल, प्रविण कात्रे आदींची उपस्थिती होती.
मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांचे ठेकेदारांशी अर्थपूर्ण संबंध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 21, 2018 11:51 PM
पुलगावच्या दारूगोळा भांडारातील घटनेमागे संरक्षण मंत्रालयाचे अधिकारी व संबंधीत ठेकेदार यांचे अर्थपूर्ण संबंध कारणीभूत आहे, असा आरोप शिवसेनेचे वर्धा जिल्ह्याचे संपर्क प्रमुख तथा माजी खासदार अनंतराव गुढे यांनी स्थानिक विश्रामगृहात आयोजित पत्रपरिषदेत केला.
ठळक मुद्देअनंतराव गुढे यांचा आरोप : दारूगोळा भांडारातील बॉम्बस्फोटाचे पडसाद