शहरं
Join us  
Trending Stories
1
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
2
"तुम्हाला आत टाकणार"; आदित्य ठाकरेंचा सदा सरवणकरांना भरसभेत इशारा
3
आधी २ 'बदक' आता 'पदक' मिळवणारी सेंच्युरी! संजूनं मोडला KL राहुलचा रेकॉर्ड
4
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
5
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
6
"काळा डाग गुलाबी रंगाने झाकला जात नाही...", अमोल कोल्हेंचा नाव न घेता अजित दादांवर निशाणा
7
संजू सॅमसन अन् तिलक वर्मा दोघांची शतकं; टीम इंडियाच्या जोडीनं रचला खास विक्रम
8
IND vs SA : सर्वोच्च धावसंख्या, सर्वाधिक षटकार अन् दोन शतकवीर; मॅचमधील ५ रेकॉर्ड्स 
9
दिल्लीत पुन्हा ड्रग्सची मोठी खेप जप्त; आंतरराष्ट्रीय बाजारात तब्बल 900 कोटी रुपये किंमत
10
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
11
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् आता सांगतात की..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
12
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
13
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
14
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
15
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
16
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
17
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
18
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
19
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
20
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!

वैद्यकीय अधिकारी व परिचारिकांत वाद

By admin | Published: July 03, 2016 2:12 AM

जिल्हा सामान्य रुग्णालयातील अतिदक्षता विभागात कार्यरत एका परिचारिकेला वैद्यकीय अधिकारी अर्वाच्च भाषेत बोलल्याचा आरोप करीत...

प्रकरण पोलिसांत : शिवीगाळ केल्याचा आरोपवर्धा : जिल्हा सामान्य रुग्णालयातील अतिदक्षता विभागात कार्यरत एका परिचारिकेला वैद्यकीय अधिकारी अर्वाच्च भाषेत बोलल्याचा आरोप करीत सकाळी परिचारिकांनी काम बंद आंदोलन केले. यात जिल्हा शल्य चिकित्सकांनी मध्यस्थी केल्यानंतर परिचारिका कामावर परतल्या. ही घटना शनिवारी सकाळी ८ वाजताच्या सुमारास घडली. या प्रकरणी सदर परिचारिकेने या वैद्यकीय अधिकाऱ्याविरूद्ध पोलिसांत तक्रार दाखल केली. पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून चौकशी सुरू केली आहे. सामान्य रुग्णालयाद्वारे समिती गठित करून चौकशी सुरू केल्याचे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. पुरूषोत्तम मडावी यांनी सांगितले.प्राप्त माहितीनुसार, सामान्य रुग्णालयात रात्र पाळीत कार्यरत डॉ. स्वप्नील बेले यांनी यावेळी कर्तव्यावर असलेल्या परिचारिकेला एका रुग्णाच्या रक्त व लघवीचे नमुने घेऊन ते तपासणीसाठी पाठविण्याच्या सूचना केल्या. त्या नमून्याच्या अहवालावरून डॉ. बेले व परिचारिकेत हमरीतुमरी झाली. यात अधिकाऱ्याने मारहाण करण्याची भाषा बोलल्याचा आरोप परिचारिकेने केला. सकाळी याची परिचारिकांच्या संघटनांना माहिती होताच त्यांनी कामबंद आंदोलन केले. ही बाब कळताच जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. मडावी व अतिरिक्त जिल्हा शल्य चिकिस्तक डॉ. निवृत्ती राठोड यांनी रुग्णालय गाठत माहिती घेतली व परिचारिका संघटनांशी चर्चा केली. एक समिती गठित करून चौकशी केली जाईल, असे सांगितले. यावर संघटनांनी आंदोलन मागे घेतल्याचे रुग्णालयाद्वारे सांगण्यात आले. असे असले तरी परिचारिकेने डॉ. बेले विरूद्ध शहर ठाण्यात तक्रार केली. यात वैद्यकीय अधिकाऱ्याने जातीवाचक शिवीगाळ केल्याची तक्रार केली. यावरून डॉ. बेले यांच्याविरूद्ध भादंविच्या कलम ५०६ व अ‍ॅट्रॉसिटी कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.(प्रतिनिधी)सदर प्रकरणाची माहिती मिळाली. याची चौकशी करण्याकरिता एक तीन सदस्यीय समिती गठित करण्यात आली आहे. समितीचा अहवाल आल्यानंतर दोषीवर कारवाई करण्यात येईल. यात कुणालाही समर्थन देण्यात येणार नाही. याबाबत परिचारिकांच्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा केली असून त्यांनी संप मागे घेतला. रुग्णांना त्रास होणार नाही याची दक्षता घेण्यात येत आहे. - डॉ. पुरूषोत्तम मडावी, जिल्हा शल्य चिकित्सक, वर्धा.