शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्याचे नवे मुख्यमंत्री कोण? सस्पेन्स अजून कायम; १ किंवा २ डिसेंबरला शपथविधी होणार
2
निवडून येतात तेव्हा गपगार, पराभवानंतर EVM ला दाेष; काेर्टाने याचिकाकर्त्यांना फटकारलं
3
कुजबुज! एका छताखाली कोणता झेंडा हाती?; पराभूत उमेदवार आता देवदर्शन करणार
4
प्रत्येक निवडणुकीनंतर EVM विरोधात घोंघावणारे हे वादळ कायमस्वरूपी शमविण्याची गरज
5
...तर महाराष्ट्रात खळबळ उडेल; उद्धव - राज यांनी एकत्र येण्याला आणखी कुठला मुहूर्त हवा?
6
गुजरात ते मुंबई प्रवासात हत्येचा थरार?; तीन वर्षांनी हत्येचा गुन्हा, तपास सुरू
7
...तोपर्यंत कांजूर डम्पिंग बंद करणे अशक्य; मुंबई महापालिका पर्यायी जागेच्या शोधात
8
पश्चिम रेल्वेवर वाढणार एसी लोकलच्या १३ फेऱ्या; वातानुकूलित फेऱ्यांची संख्या ९६ वरून १०९
9
इन्फ्लुएंझामुळे मुंबईकर ‘आजारी’, राज्यात ५७ रुग्णांचा मृत्यू; काय आहेत लक्षणे?
10
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
11
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
12
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
13
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
14
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
15
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
16
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
17
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
18
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
19
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
20
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले

पुरुषांमध्ये काटोल तर महिलांत यवतमाळ विजेता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 02, 2018 12:14 AM

नगर परिषद वर्धा व जिल्हा क्रीडा खो-खो प्रेमी यांच्या सहकार्याने आयोजित पालकमंत्री चषक विदर्भ राज्यस्तरीय महिला-पुरुष खो-खो स्पर्धेत पुरूषांमध्ये काटोल तर महिलांमध्ये यवतमाळ येथील संघांनी विजय प्राप्त केला.

ठळक मुद्देपालकमंत्री चषक : विदर्भस्तरीय खो-खो स्पर्धा

आॅनलाईन लोकमतवर्धा : नगर परिषद वर्धा व जिल्हा क्रीडा खो-खो प्रेमी यांच्या सहकार्याने आयोजित पालकमंत्री चषक विदर्भ राज्यस्तरीय महिला-पुरुष खो-खो स्पर्धेत पुरूषांमध्ये काटोल तर महिलांमध्ये यवतमाळ येथील संघांनी विजय प्राप्त केला. पुरस्कार वितरण रविवारी पार पडले.अध्यक्षस्थानी भाजपचे प्रदेश सरचिटणीस डॉ. रामदास आंबटकर तर अतिथी म्हणून संघटन मंत्री उपेंद्र कोठेकर, खा. रामदास तडस, आ.डॉ. पंकज भोयर, जि.प. अध्यक्ष नितीन मडावी, नगराध्यक्ष अतुल तराळे, मुख्याधिकारी अश्विनी वाघमळे, उपाध्यक्ष प्रदीप ठाकूर, सभापती निलेश किटे, मीना भाटीया, बंटी गोसावी, श्रेया देशमुख, सर्व नगरसेवक तथा कर्मचारी उपस्थित होते.वैयक्तिक पुरस्कारांची लयलूटपालकमंत्री चषक विदर्भ राज्यस्तरीय खो-खो स्पर्धेत महिला विभागात उपान्त्य फेरीमध्ये पराभूत संघ हयुमिनिटी स्पोर्टींग क्लब परतवाडा व विदर्भ क्रीडा मंडळ काटोल यांना पुरस्कार देण्यात आले. याप्रसंगी वैयक्तिक पुरस्कारानेही खेळाडूंना सन्मानित करण्यात आले.महिला विभागात द्वितीय क्रमांकाचा संघ छत्रपती युवक क्रीडा प्रसारक मंडळ नागपूर रोख पुरस्कार तथा संघातील १२ खेळांडूना आकर्षक भेटवस्तू देण्यात आल्या. पुरुष विभागात चतुर्थ क्रमांकाचा संघ नवजय हिंद क्रीडा मंडळ यवतमाळ, तृतीय क्रमांकाचा संघ तुळजाई क्रीडा मंडळ परतवाडा आणि द्वितीय स्थानावरील संघ विदर्भ युथ क्रीडा मंडळ काटोल यांना रोख पुरस्कार तथा संघातील १२ खेळाडूंना भेटवस्तू देण्यात आल्या.स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट महिला संरक्षक यवतमाळची सुप्रिया घुघरे तथा सर्वोत्कृष्ट पुरूष संरक्षक विदर्भ क्रीडा मंडळ काटोलचा शुभम जांभळे, दिलराज सेंगर यांना वैयक्तिक प्रोत्साहनपर पुरस्कार देण्यात आले.महिला विजयी संघ नवजयहिंद क्रीडा मंडळ यवतमाळ तथा पुरूष विजयी संघ विदर्भ क्रीडा मंडळ काटोल यांना रोख पुरस्कार व १२ खेळाडूंना भेटवस्तू देण्यात आल्या. अरुण पट्टेवार, किरण मारतोडे यांच्या स्मृतीत स्पर्धेदरम्यान अष्टपैलू महिला व पुरष खेळाडूंना सचिता नासरे, सचिन पट्टेवार यांना प्रोत्साहनपर रोख पुरस्कार देण्यात आले.पुरस्कार वितरण कार्यक्रमाला रमेश बुटे, विनोद हांडे, गणेश उईके, सुनील चुन्ने, अविनाश सेलुकर, राजू देशमुख, श्याम भेंडे, संजय इंगळे, सुनील मोहड, दिनकर काकडे, सतीश काकडे, राजेश मारतोडे, प्रकाश मारतोडे, डॉ. यशवंत हिवंज, कैलास बाकरे तसेच विदर्भाच्या विविध भागातून या स्पर्धेत पुरूष व महिला खेळाडू उपस्थित होते. पालिकेच्या पुढाकाराने आयोजन झाले.मान्यवर व खेळाडूंचा सत्कारखो-खो क्रीडा प्रेमींतर्फे नगराध्यक्ष तराळे यांचा सत्कार करण्यात आला. शिवाय खो-खो व हॅन्डबॉल खेळाचे खेळाडू प्रशिक्षक नंदिनी बोंगाडे, हॅन्डबॉल प्रशिक्षक मार्गदर्शक सुरेश बोंगाडे, कबड्डीपटु व आंतरराष्ट्रीय कबड्डी स्पर्धेकरिता विदर्भातील एकमेव पंच प्रतिनिधी रामराव किटे, कबड्डीचे प्रशिक्षक किशोर पोफळी, आंतरराष्ट्रीय अ‍ॅथलेटीक्समधील तांत्रिक अधिकारी, अ‍ॅफ्रो. एशियन मैदानी स्पर्धेत तांत्रिक अधिकारी म्हणून कार्य केलेले तसेच महाराष्ट्र अ‍ॅथलेटीक्स असो.तर्फे २०१७ चा जीवन गौरव पुरस्कार प्राप्त रमेश बुटे, माजी खो-खो खेळाडू सुनील तिनघसे तथा १९९४ हॉलीबॉलसाठी छत्रपती पुरस्कार प्राप्त अंजली रहाणे यांच्याद्वारे त्यांच्या मातोश्रींनाही सन्मानित केले गेले.