लोकमत न्यूज नेटवर्कदेवळी : येथील नगरपालिकेच्या नवनिर्मित खासदार रामदास तडस स्टेडीयमवर राज्यस्तरीय अजिंक्यपद कुस्ती स्पर्धेचा महासंग्राम रंगला आहे. चार दिवस चालणाऱ्या या महिला व पुरुषांच्या दंगलीत पहेलवानांनी मैदान गाजवायला सुरुवात केली आहे. प्रारंभी उद्घाटनाच्या दिवशी रविवारी आणि सोमवारी पुरुष मल्लांच्या ४५ ते ११० किलो वजन गटातील स्पर्धा रंगल्या. या रोमांचक सामन्यांमध्ये मल्लांंनी एकमेकांना धोबीपछाड देत स्पर्धेवर आपले नाव कोरले. यात सोलापूर जिल्ह्याच्या मल्लांनी राज्यस्तरीय सांघिक विजेतेपद तर कोल्हापूरने उपविजेतेपद पटकावित आपला दबदबा निर्माण केला आहे.दोन दिवस चाललेल्या पुरुष गटातील दंगलीमध्ये राज्यभरातून ५०० पहेलवानांनी सहभाग नोंदविला. त्यांची दंगलीत चढाई ही प्रेक्षक तसेच क्रीडा पे्रमीच्या मनाचा ठाव चुकविणारी होती. पहेलवानांचा उत्साह वाढविण्याकरिता प्रेक्षकांनी भरभरुन दादही दिली.पुरुष गटातील विजेते व उपविजेत्या संघासह पहेलवानांना खासदार रामदास तडस यांच्या हस्ते तर कुस्तीगीर परिषदेच्या पदाधिकाºयांच्या उपस्थितीत सुवर्ण, कास्य व रौप्यपदक व सृतीचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले. ही कुस्ती स्पर्धा ३० जानेवारीपर्यंत चालणार असून मंगळवार व बुधवारला महिलांच्या कुस्ती रंगणार आहे. यासाठी वरिष्ठ महिला गटात ४१० व कनिष्ठ महिला गटात ४१० स्पर्धकांची करण्यात आली आहे. वरिष्ठ गटात ५० ते ७६ व कनिष्ठ गटात ३६ ते ७३ किलो वजन गटात सामने होणार आहे. ही कुस्त्यांची दंगल पाहण्यासाठी राज्यभरातून प्रेक्षक आले असून सर्वजण मल्लांना प्रोत्साहीत करीत असल्याने देवळीतील कुस्त्यांचा महासंग्राम चांगलाच रोमांचक ठरत आहे. आणखी दोन दिवस महिलांची कुस्तीस्पर्धा चालणार असल्याने क्रीडाप्रेमींची गर्दी होत आहे.या मल्लांनी मारली बाजीवजन गट- ४५- स्वप्निल भिंगारे (सोलापूर), प्रविण वाडकर (कोल्हापूर), धवलसिंह चव्हाण (उस्मानाबाद), सचीन चौगुले (कोल्हापूर)वजन गट- ४८- शुभम लांडगे (अहमदाबाद), प्रतिक साळोंखे (कोल्हापूर), रणजीत गावळे (सांगली), निखिल माळे (धुळे),वजन गट- ५१- सुदर्शन पाटील (कोल्हापूर), संदिप बोडके (नाशीक), राकेश यादव (पुणे), संदेश पाटील (कोल्हापूर)वजन गट- ५५- महेश जाधव (पिपरी चिंचवड), विपुल आडकर (पुणे), सनी केदार (पुणे), ओमकार तोडकर (बीड),वजन गट-६०- सरदार पाटील (कोल्हापूर), संकेत नंदीवाले (कोल्हापूर), करण ठाणे (सोलापूर), आकाश सावरगावे (लातूर),वजन गट- ६५- शिवाजी वाकळे (पुणे), महेश फुलमाळी (अहमदनगर), निलेश हिरगुडे (कोल्हापूर) ,मयुर जाधव (मुंबई),वजन गट-७१- रोहण ढोले (कोल्हापूर), प्रथमेश पाटील (सांगली), अनिकेत मढवी (कल्याण), अजय थोरात (सातारा),वजन गट- ८०- रविंद्र खैरे (कोल्हापूर), दत्ता बोडरे (सोलापूर), जीवन तामखेडे (सांगली), अलखमीद इनामदार (सातारा),वजन गट-९२- ऋषीकेश सावंत (पूणे), पृथ्वीराज खडके (नांदेड), उदय सोठे (सांगली), विक्रमसिंग भोसले (सोलापूर) ,वजन गट-११०- रविराज सरोदे, सरनोबत मुंतजी (उस्मानाबाद), पृथ्वीराज मोहोळ (पुणे), अजय खरात (सोलापूर)
पुरुषांची दंगल; सोलापूरला राज्यस्तरीय सांघिक विजेतेपद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 28, 2019 10:16 PM
येथील नगरपालिकेच्या नवनिर्मित खासदार रामदास तडस स्टेडीयमवर राज्यस्तरीय अजिंक्यपद कुस्ती स्पर्धेचा महासंग्राम रंगला आहे. चार दिवस चालणाऱ्या या महिला व पुरुषांच्या दंगलीत पहेलवानांनी मैदान गाजवायला सुरुवात केली आहे. प्रारंभी उद्घाटनाच्या दिवशी रविवारी आणि सोमवारी पुरुष मल्लांच्या ४५ ते ११० किलो वजन गटातील स्पर्धा रंगल्या. या रोमांचक सामन्यांमध्ये मल्लांंनी एकमेकांना धोबीपछाड देत स्पर्धेवर आपले नाव कोरले.
ठळक मुद्देकोल्हापूरला उपविजेतेपद : सुवर्ण, कास्य व रौप्य पदाकाने पहेलवानांचा सन्मान