शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL Auction 2025 : RR च्या नाकावर टिच्चून MI नं खेळला मोठा डाव; ६२ धावांच्या 'त्या' इनिंगमुळे हा खेळाडू रात्रीत 'करोडपती'
2
"प्रिय बंधु-भगिनींनो... सप्रेम नमस्कार..."! देवेंद्र फडणवीस यांचं जनतेला पत्र; सांगितले विजयाचे 4 'खरे शिल्पकार'
3
IPL Auction 2025: तब्बल ५ तासांनी Mumbai Indians ने विकत घेतला पहिला खेळाडू, १२.५० कोटींना कोण आलं संघात?
4
'ज्यांनी मला त्रास दिला ते सगळे साफ झाले', अशोक चव्हाणांची थोरात-देशमुखांवर बोचरी टीका
5
IPL Auction 2025: मुंबई इंडियन्सने सोडलेला जोफ्रा आर्चर अखेर राजस्थान रॉयल्समध्ये गेला, किती मिळाली किंमत?
6
शिवसेना मुख्यमंत्री पदावर अडीच वर्षासाठी दावा करणार? केसरकर स्पष्टच बोलले...!
7
'तरुण नेतृत्व उभारणार, घरी बसणार नाही', पराभवानंतर शरद पवार नव्या जोमाने कामाला लागले
8
TATA IPL Auction 2025 Live: इशान किशन हैदराबादच्या ताफ्यात; SRH ने लावली 11.25 कोटींची बोली...
9
"सर्वेक्षण करा, जी ज्याची जागा असेल त्याला देऊन टाका..."; संभल जामा मशीद प्रकरणावर काय म्हणाले राकेश टिकैत?
10
IPL Auction 2025 : MI नं दिला नाही भाव; Ishan Kishan साठी काव्या मारन यांनी लावली एवढ्या कोटींची बोली
11
IPL Auction 2025 : बिग सरप्राइज! SRK च्या KKR नं रिलीज केलेल्या खेळाडूसाठी मोजली मोठी किंमत, अनेकांच्या भुवया उंचावणारी बोली
12
IPL Auction 2025: 'अनुभवी' अश्विनसाठी दोन जुने संघ भिडले, अखेर CSK ने RR ला दिली मात, कितीला विकत घेतलं?
13
IPL Auction 2025: Gujarat Titans ची शांतीत क्रांती! ३ मॅचविनर खेळाडूंना 'गपचूप' घेतलं ताफ्यात, पाहा कोण?
14
"योगी आदित्यनाथांच्या 'त्या' घोषणेमुळे...";'बटेंगे तो कटेंगे'वर शरद पवारांचे महत्त्वाचे विधान
15
"...त्यामुळे महिलांनी आमच्या विरोधात मतदान केलं"; निकालानंतर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया
16
IPL 2025 Auction : १८ कोटींच पॅकेज नाकरणाऱ्या KL Rahul साठी DC नं किती कोटी मोजले ?
17
"EVM बाबत माहिती नाही, पण लोक सांगतात की..."; पराभवानंतर शरद पवारांचे मोठं विधान
18
महायुतीच्या विजयात CM योगींची किती मोठी भूमिका? चंद्रशेखर बावनकुळे म्हणतात...
19
IPL Auction 2025: युजवेंद्र चहलला १७७ % 'अप्रेझल'! बनला सर्वात महागडा स्पिनर, पंजाब किंग्जने घेतलं संघात
20
"काय झालं हेच आम्हाला कळेना...;" निवडणूक निकालाच्या दुसऱ्या दिवशी काँग्रेसनं सांगितला पुढचा प्लॅन

पारा 46 अंशावर; शासकीय कर्मचारी कुलरच्या हवेसाठी भर दुपारी घरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 18, 2022 5:00 AM

पारा ४६ अंशांवर पोहोचला आहे. अशातच विविध कार्यालयांतील कर्मचारी भर दुपारी कार्यालयात राहतात की कुलरची हवा घेण्यासाठी घरी जातात याचा रिॲलिटी चेक मंगळवारी केला असता निम्म्याहून अधिक कार्यालयांत अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या खुर्च्याच रिकाम्या असल्याचे बघावयास मिळाले. विचारणा केल्यावर दौऱ्यासह जेवणाचे कारण पुढे करण्यात आल्याने अधिकारी खुर्चीत तोवरच कर्मचारी कार्यालयीन वेळेच कार्यालयात थांबतात असे म्हटल्यास वावगे ठरू नये.

राजेश सोळंकीलोकमत न्यूज नेटवर्क देऊरवाडा (आर्वी) : मागील काही दिवसांपासून सूर्य आगच ओकू पाहत असून पारा ४६ अंशांवर पोहोचला आहे. अशातच विविध कार्यालयांतील कर्मचारी भर दुपारी कार्यालयात राहतात की कुलरची हवा घेण्यासाठी घरी जातात याचा रिॲलिटी चेक मंगळवारी केला असता निम्म्याहून अधिक कार्यालयांत अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या खुर्च्याच रिकाम्या असल्याचे बघावयास मिळाले. विचारणा केल्यावर दौऱ्यासह जेवणाचे कारण पुढे करण्यात आल्याने अधिकारी खुर्चीत तोवरच कर्मचारी कार्यालयीन वेळेच कार्यालयात थांबतात असे म्हटल्यास वावगे ठरू नये. पूर्वीच पाच दिवसांचा आठवडा करण्यात आला आहे. अशातच दुपारच्या सुमारास कर्मचारीच कार्यालयात राहत नसल्याने विविध कामांनिमित्त येणाऱ्या नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. कार्यालय प्रमुख कार्यालयात नसल्याच्या संधीचे सोने कामचुकार करीत असल्याचे दिसून आले.

कायमस्वरूपी मुख्याधिकारीच नाही

-    मंगळवारी दुपारी २ वाजता आर्वी येथील नगरपालिका कार्यालयात रिॲलिटी चेक केला असता येथे कायमस्वरूपी मुख्याधिकारी नसल्याने कर्मचारीही मनमर्जीचा अवलंब करीत असल्याचे दिसून आले. - पालिकेतील १२ प्रमुख अधिकाऱ्यांपैकी एक वर्धा व एक नागपूर येथे सेवा अधिग्रहित करण्यात आल्याने आणि दोन  अधिकारी सुट्टीवर होते. १७ लिपिकांपैकी दोन सुट्टीवर तर १६ शिपायांपैकी ३ सुट्टीवर होते. ८५ आरोग्य सफाई कर्मचाऱ्यांपैकी आठ रजेवर होते. दुपारी २ वाजता जेवणासाठी चार कर्मचारी थेट घरी गेल्याचे दिसून आले.

वर्धा येथील मनोजकुमार शहा यांच्याकडे सध्या सीओंचा प्रभार आहे. महिला कर्मचारी कार्यालयातच डबा आणून जेवण करतात. तर काही कर्मचारी भोजन अवकाशात घरी जात जेवण करतात. ते वेळीच परतही येतात. करतात.- रणजित पवार, उपमुख्यधिकारी, न.प. आर्वी. 

सलगच्या सुटीचा घेतला काहींनी आनंद

-    दुपारी अडीच वाजता आर्वी पंचायत समिती कार्यालयातील सातही विभागांची पाहणी केली असता काही महिला व पुरुष  कर्मचारी त्यांच्या टेबलावर जेवण करीत असल्याचे निदर्शनास आले. - तर प्रभारी गटविकास अधिकारी यांच्या केबिनमध्ये बैठक सुरू होती. त्यामुळे विविध कामांनिमित्त आलेले नागरिक गटविकास अधिकाऱ्यांच्या दालनासमोर प्रतीक्षा करीत होते. या कार्यालयात पंचायत विस्तार अधिकाऱ्यांकडे प्रभार आहे. नऊ पर्यवेक्षक परिचरपैकी तिघे रजेवर असल्याचे सांगण्यात आले.

पंचायत समिती कार्यालयांतर्गत एकूण ५९ अधिकारी आणि कर्मचारी आहेत. ९० टक्के कर्मचारी डब्बा आणून भोजन अवकाशात कार्यालयात जेवण करतात. तर ज्यांचे घर जवळ आहे ते घरी जात वेळीच कार्यालयात परत येतात.- डी. आर. घारड, सहा. प्रशासकीय अधिकारी, पं. स. आर्वी. 

महावितरणचे कर्मचारी दक्षच

-    दुपारी ३ वाजता महावितरण कार्यालय गाठून पाहणी केली असता काही कर्मचारी जेवण करीत होते. तर कार्यकारी अभियंता यांच्या दालनात बैठक सुरू होती. - या कार्यालयात कार्यकारी अभियंतासह आठ अधिकारी आहेत. एक व्यवस्थापक व पाच लिपिक तसेच लेखा विभागात पाच लेखा लिपिक व दोन शिपाई असून कुणीच रजेवर नसल्याचे सांगण्यात आले.- सध्या महावितरणच्या अधिकाऱ्यांची थकबाकीने अडचण वाढविली असून थकबाकी वसुलीनंतरचा थकवाच कर्मचाऱ्यांच्या चेहऱ्यावर बघावयास मिळाला.

महावितरण या कार्यालयांतर्गत २० अधिकारी कर्मचारी कार्यरत आहेत. आर्वी, आष्टी, कारंजा, पुलगाव, खरांगणा असे पाच सब डिव्हिजन आहे. या कार्यालयातील सर्व अधिकारी कर्मचारी आपले घरून डबा आणत असून भोजन अवकाशात त्याचा आस्वाद घेतात.- जी. एन. गायकी, मुख्य लिपिक, महावितरण, आर्वी. 

 

टॅग्स :Governmentसरकार