ग्रामीण समाजकार्य शिबिर : चिमुकल्यांच्या वेशभुषा लक्षवेधक वर्धा : ग्रामीण समाजकार्य शिबिर अंतर्गत दत्तकग्राम पळसगाव येथे डॉ. आंबेडकर कॉलेज आॅफ सोशल वर्क वतीने श्रमसंस्कार शिबिर घेण्यात आले. यानिमित्त जि.प. प्राथमिक शाळा, पळसगाव येथील चिमुकल्यांनी आकर्षक वेशभूषा करुन नृत्य सादर केले. ‘बेटी बचाओ बेटी पढाओ’ असा संदेश ग्रामवासियांना वृक्षदिंडीच्या माध्यमातून देण्यात आला. वृक्षदिंडीत गावातील भजनी मंडळ, बचत गटातील महिला पदाधिकारी, जि.प. प्राथमिक शाळा, पळसगाव येथील विद्यार्थी तसेच शिबिरार्थी सहभागी होते. यावेळी विद्यार्थ्यांनी घोषवाक्य दिले. गीतगायनातून वृक्षाचे महत्त्व पटवून दिले. उद्घाटन कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य डॉ. मिलिंद सवाई तर उद्घाटक म्हणून सरपंच रजनी ठाकरे होत्या. गटविकास अधिकारी श्वेता पालवे, डॉ. धनंजय सोनटक्के, शिवप्रसाद सालोडकर, हराडे, चावट यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी बोलताना पोलीस उपनिरीक्षक दराडे यांनी राज्यातील लिंग गुणोत्तराचे प्रमाण सांगितले. आधुनिक समाजामध्ये मुलींचे महत्व वाढत आहे. शिवप्रसाद सालोडकर यांनी मार्गदर्शन केले. यानंतर विद्यार्थ्यांनी नाटीका सादर केली. यावेळी ग्रामस्थांची लक्षणीय उपस्थिती होती.(स्थानिक प्रतिनिधी)
‘बेटी बचाओ, बेटी पढाओ’चा संदेश
By admin | Published: February 10, 2017 1:33 AM