लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : कारंजा तालुक्याच्या धर्ती या गावासाठी चार वर्षांपूर्वी सेतू केंद्र रुपेश म्हस्के याला शासनाने मंजूर केले होते. हे सुविधा केंद्र ग्रामीण भागात न चालविता रुपेश म्हस्के तालुका मुख्यालयी शहरी भागात नियमबाह्यपणे चालवित होता. एवढेच नव्हे तर त्याने नगर पंचायतीच्या जागेवर बेकायदेशीररित्या अतिक्रमण करून ही जागाही बळकावली होती.पत्रकार असल्याची बतावणी करून तालुका प्रशासनातील अधिकाऱ्यांना धमकाविण्याचा त्याचा गोरखधंदा असल्याची माहिती तलाठी मारहाणीच्या घटनेनंतर लोकमतला मिळाली आहे. अनेक अधिकाºयांनी याबाबतचे पुरावे लोकमतकडे सुपूर्द केले आहेत. म्हस्के हा सद्गुरु झेरॉक्स अॅण्ड कॉम्प्युटर जॉब वर्क या नावाने कारंजा येथील मुख्य मार्गावर सेतू केंद्र चालवित होता. अतिक्रमणीत जागा बळकाविण्यासाठी त्याने या जागेचा अनधिकृत आठ-अ व उतारा सुद्धा जमविला होता. येथे ग्रा.पं. असताना हे काम करण्यात आले होते. या अतिक्रमणीत जागेवर विद्युत जोडणीही महावितरणच्या अधिकाऱ्यांनी कसे दिले. हा प्रश्न आता निर्माण झाला आहे.या ठिकाणी नियमबाह्यपणे सेतू केंद्र चालवून जात प्रमाणपत्र, नॉन क्रिमीलेयर प्रमाणपत्र, डोमेसाईल प्रमाणपत्र तयार केले जात होते. ५५ रुपयांत तयार होणारे या प्रमाणपत्राचे कागदपत्र तयार करण्यासाठी २०० रुपये आकारले जात होते. तसेच सालवंसी प्रमाणपत्रासाठी सुद्धा ५०० रुपये घेतले जात होते. याबाबतच्या रसीदा लोकमतच्या हाती लागल्या आहे. मात्र, अलीकडेच कारंजा नगरपंचायतीने अतिक्रमण हटाव मोहीम राबवून म्हस्के यांचे अवैध सेतू केद्र जमिनदोस्त केले. ही जागा मोकळी केली आहे; पण त्यानंतरही हे सेतू केंद्र धर्ती येथे न नेता आपल्या घरातून म्हस्के चालवित असल्याची माहिती तलाठी संघटनेने आता जमा केली आहे. याबाबत तत्काळ कारवाई महसूल प्रशासनाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी करावी, अशी मागणी तलाठी संघटनेची आहे.आरोपीची रवानगी वर्धा येथील कारागृहातकारंजा पोलिसानी रुपेश म्हस्के याला तलाठी मारहाणीच्या प्रकरणात अटक केल्यानंतर शुक्रवारी आर्वी न्यालयात त्याला हजर करण्यात आले. तेथे त्याचा जामीन नाकारण्यात आला. शिवाय त्याला ३० आॅगस्टपर्यत न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. त्यानंतर लगेच कारंजा पोलिसानी त्याची वर्धा येथील कारागृहात रवानगी केली आहे.
नियमबाह्य जागा बळकावून सुरू होते म्हस्केचे सेतू केंद्र
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 17, 2018 11:42 PM
कारंजा तालुक्याच्या धर्ती या गावासाठी चार वर्षांपूर्वी सेतू केंद्र रुपेश म्हस्के याला शासनाने मंजूर केले होते. हे सुविधा केंद्र ग्रामीण भागात न चालविता रुपेश म्हस्के तालुका मुख्यालयी शहरी भागात नियमबाह्यपणे चालवित होता.
ठळक मुद्देरुपेश म्हस्केचा प्रताप : पत्रकार असल्याची करीत होता बतावणी