लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा: पाळीव प्राण्यांवर व त्यांच्या दुधावर कोरोनाचा थेट कोणता प्रभाव होतो का? किंवा दुधाळ जनावरांच्या माध्यमातून जंतूंचा प्रसार शक्य आहे का? याविषयीचे संशोधनासाठी आर्वी येथील गौतीर्थ गौसंगोपन व संशोधन केंद्राचे संस्थापक शैलेश अग्रवाल यांनी पुढाकार घेतला आहे. शैलेश अग्रवाल यांच्या गौतीर्थ प्रकल्पात सेंद्रिय शेतीसह सेंद्रिय दुग्ध उत्पादनही केले जाते. या प्रकल्पातील जनावरांसाठी चारा व पशुखाद्याची निर्मितीही सेंद्रिय प्रतीची याचठिकाणी करण्यात येते. गौतीर्थ याठिकाणी सेंद्रिय शेती आणि दुग्ध व्यवसायातील नफा वाढविण्याच्या दृष्टिकोनातून शेतकरी व पशुपालकांसाठी नियमित मोफत कार्यशाळांचे आयोजन करण्यात येते. गावातील नवीन पिढीसह सुशिक्षित व उच्च शिक्षितांना सेंद्रिय शेती व पशुपालनाकडे आकर्षित करण्यासाठी या प्रकल्पाची स्थापना करण्यात आली आहे.सध्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मनुष्यांना सामाजिक अंतर राखण्याचा व संशयितांना गृह अलगीकरणाचा सल्ला जगभरात देण्यात आला आहे. पाळीव प्राण्यांना कोरोनाचे लसीकरण करण्यात येतेच परंतु दुग्धजन्य प्राण्यांमध्ये भारतात कोरोना लसीकरणाचे प्रचलन नाही. दुधाच्या माध्यमातून विषाणूंचा प्रादुर्भाव व प्रसार अशक्यच आहे परंतु दुधाळ जनावरांमध्ये संसर्गित मनुष्यांच्या संपकार्तून व त्या माध्यमातून मनुष्याला संसगार्ची शक्यता नाकारलेली नाही. या पार्श्वभूमीवर गौतीर्थ येथील दुधाळ गाईंना व त्यांच्या वासरांना निजंर्तुकीकरण केलेल्या संगरोध क्षेत्रात ठेवण्यात आले असून अलगीकरण आवारात दोन काळजीवाहू व्यक्तिंव्यतिरिक्त इतरांना प्रवेश निषेध करण्यात आला आहे.दूध काढतांना व चारा टाकतांना संगरोध क्षेत्राच्या आतच कर्तव्यावर असणाऱ्या काळजीवाहूंकडून कोरोना संदर्भातील स्वच्छतेसंबंधी मार्गदर्शक तत्वांचे काटेकोर पालन करूनच जनावरांची निगा राखण्यात येत आहे. डॉ. राहुल गुप्ता, डॉ. दिवाकर काळे व डॉ. प्रशांत कदम यांच्यासह पदवीयुत्तर पशु वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या चमूचा या अभ्यासात सहभाग आहे
Corona Virus in Wardha; वर्ध्यातील दुधाळ गाई व वासरेदेखील ठेवली क्वारंटाईन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 29, 2020 7:28 PM
पाळीव प्राण्यांवर व त्यांच्या दुधावर कोरोनाचा थेट कोणता प्रभाव होतो का? किंवा दुधाळ जनावरांच्या माध्यमातून जंतूंचा प्रसार शक्य आहे का? याविषयीचे संशोधनासाठी आर्वी येथील गौतीर्थ गौसंगोपन व संशोधन केंद्राचे संस्थापक शैलेश अग्रवाल यांनी पुढाकार घेतला आहे.
ठळक मुद्देगौतीर्थ गौसंगोपन व संशोधन केंद्राचा पुढाकार