लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : आष्टी तालुक्यातील पांढुर्णा येथील आश्रम शाळेतील एका साडेनऊ वर्षीय मुलीवर बलात्कार करणाºया राजू उर्फ राजकुमार लांडगे (४७) रा. साहूर, याला दाखल कलमान्वये मरेपर्यंत जन्मठेपेची शिक्षा ठोठावली आहे. हा निकाल जिल्हा न्यायालयाच्या विशेष न्यायाधीश अंजू शेंडे यांनी गुरुवारी दिला.घटनेची थोडक्यात हकीगत अशी की, ६ सप्टेंबर २०१५ च्या दीड महिन्यापूर्वी आरोपी राजू उर्फ राजकुमार लांडगे याने पीडितावर पांढुणा येथील आश्रम शाळेच्या नविन बांधकामाच्या इमारतीत नेत बलात्कार केला. याची माहिती कुणाला दिल्यास जीवे मारण्याची धमकी दिली. यावेळी आरोपी हा या आश्रम शाळेत सुरू असलेल्या कामावर चौकीदार म्हणून कार्यरत होता. त्या दरम्यान त्याने पीडितावर व अन्य मुलींवर सुद्धा बलात्कार केल्याचे समोर आले. हा प्रकार उघड होताच आरोपीविरूद्ध आष्टी पोलिसात तक्रार करण्यात आली. या तक्रारीवरून राजू लांडगे याच्यावर भादंविच्या विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला. सदर प्रकरणाचा तपास पूर्ण करून न्यायप्रविष्ट करण्यात आले.या प्रकरणात प्रारंभी सहायक सरकारी अभियोक्ता अमोल कोटंबकर यांनी बाजू मांडली. त्यानंतर सहायक सरकारी अभियोक्ता विनय आर. घुडे यांनी साक्षीपुरावे घेतले व युक्तीवाद केला. सदर प्रकरणात एकूण १२ साक्षीदार तपासण्यात आले. यावरून न्यायाधीश शेंडे यांनी राजू लांडगे याला कलम ३७६ (२)(आय) अंतर्गत मरेपर्यंत जन्मठेप व ५ हजार रुपये दंड तसे दंड न भरल्यास २ महिने सश्रम कारावास, कलम ५०६ (२) अंतर्गत ७ वर्षे सश्रम कारावास व १ हजार रुपये दंड. दिलेला दंड न भरल्यास १५ दिवस सश्रम कारावास तसेच कलम ३(२) (५) अनु. जाती-जमाती कायद्यांतर्गत मरेपर्यंत जन्मठेप व ५ हजार रुपये दंड शिवाय दंड न भरल्यास दोन महिने सश्रम कारावासाची शिक्षा ठोठावली.पुराव्यादरम्यान आष्टी ठाण्याचे जमादार मनोहर भेंडे यांनी साक्षदारांना हजर करून मोलाची कामगिरी बजावली. तसेच एसडीपीओ राजन पाली यांनी गुन्ह्याचा तपास केला.
अल्पवयीन मुलीवर अत्याचार प्रकरणी मरेपर्यंत जन्मठेप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 06, 2017 12:10 AM
आष्टी तालुक्यातील पांढुर्णा येथील आश्रम शाळेतील एका साडेनऊ वर्षीय मुलीवर बलात्कार करणाºया राजू उर्फ राजकुमार लांडगे (४७) रा. साहूर, याला दाखल कलमान्वये मरेपर्यंत जन्मठेपेची शिक्षा ठोठावली आहे.
ठळक मुद्देपांढुर्णा येथील आश्रम शाळेतील प्रकरण