ऑनलाईन लोकमतआर्वी : विधानसभा क्षेत्र अल्पसंख्याक आघाडीच्यावतीने अल्पसंख्याक संवाद यात्रेच्या निमित्ताने संवाद कार्यक्रमाचे आयोजन शालिग्राम धर्मशाळेत करण्यात आले होते. या कार्यक्रमला अध्यक्ष म्हणून माजी आमदार दादाराव केचे व प्रमुख उपस्थिती अल्पसंख्याक सख्यांक मोर्चा भाजपाचे राज्याध्यक्ष जमाल सिद्दिकी, उपाध्यक्ष जुनेद भाई, नगराध्यक्ष प्रशांत सव्वालाखे, रमजानभाई अन्सारी यांची होती.भारतीय जनता पक्षाचे सरकारच अल्पसंख्याकांच्या हक्काचे सरकार असल्याचे विचार जमाल सिद्दीकी यांनी व्यक्त केले. याचे मूर्तींमंत उदाहरण म्हणजे दादाराव केचे यांनी समाजासाठी आर्वी विधानसभा क्षेत्रात केलेली विकास कामे आहेत. औरंगाबादपासून आर्वी पर्यंत पोहचलेल्या या संवाद यात्रेने आर्वीतील विकास कामांची पाहणी केली.जुनेद खान यांनी संवाद यात्रे दरम्यान आयोजनचाी प्रशंसा केली. माजी आमदार दादाराव केचे यांनी सांगितले की, आम्ही मतांचे राजकारण करत नसून विकासाचे समाजकारण करतो.सर्व समाजातील जनतेसाठी भारतीय जनता पक्षाचे सरकार करीत आहे याची जाणीव आर्वी विधानसभा क्षेत्रातील कामांनी होत असल्याचे ते म्हणाले.यावेळी तालुका अध्यक्ष मिलिंद हिवाळे, शहर अध्यक्ष विनय डोळे, अल्पसंख्याक संघटनेचे अध्यक्ष अज्जुभाई अन्सारी, समसाम हाजी, अकील भाई हाजी, भाजपा अल्पसंख्याक जिल्हा महामंत्री अफसर खान, जिल्हा अध्यक्ष बिस्मिल्ला खान, जिल्हा नियोजन समितीचे अध्यक्ष अब्दुल कय्युम भाई, हब्बु हसन भाई तसेच युनूस भाई, ऐजाज खान, रमजूभाई, मोसिमभाई, चिंटू अंकल, गफार भाई, समशेर भाई, अयाज खान, फैजान पटेल, गुजर भाई, शब्बीर भाई, अब्देअली भाई, जैनुद्दीन मोहम्मद भाई, अयुब भाई, सत्तार भाई, नवाज खॉ, अवेज खॉ, नगरसेवक शेख निसार, शब्बीर शाहा, शेख शब्बीर भाई, कालीमोद्दीन सौदागर, शाबिर भाई, सलाम भाई, सुनील बाजपैयी, मथुरेश पुरोहित, रशिद भाई, रहमान भाई, दिनेश डेहनकर व अल्पसंख्याक समाजातील नागरिकांची उपस्थिती होती. संचालन आवेज खान यांनी केले तर आभार विनय डोळे यांनी मानले. बोहरा समाजाने यात्रेचे स्वागत केले.
अल्पसंख्याक संवाद कार्यक्रम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 29, 2018 11:56 PM
विधानसभा क्षेत्र अल्पसंख्याक आघाडीच्यावतीने अल्पसंख्याक संवाद यात्रेच्या निमित्ताने संवाद कार्यक्रमाचे आयोजन शालिग्राम धर्मशाळेत करण्यात आले होते.
ठळक मुद्देजमाल सिद्दीकी : विविध योजनांवर दिली माहिती