शहरं
Join us  
Trending Stories
1
‘धर्मयुद्ध’, ‘व्होट जिहाद’वर स्वामी गोविंददेव गिरी स्पष्टच बोलले; म्हणाले, “हिंदू समाजाने...”
2
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
3
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
4
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
5
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
6
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
7
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
8
ठाकरे सेनेच्या मुस्लिम उमेदवाराची मंदिरात पूजा, शिवलिंगाचा अभिषेक अन् आरती केली...
9
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
10
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
12
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
13
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
14
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
15
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
16
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
17
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
18
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
19
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
20
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं

जनआरोग्य योजना ठरताहेत मृगजळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 26, 2019 11:47 PM

गोरगरीब व जनसामान्यांना विनामूल्य आरोग्य सेवा मिळावी म्हणून शासनाने सुरू केलेल्या महात्मा फुले व पंतप्रधान जन आरोग्य योजनेचा मोठा गाजा होत आहे. परंतु अस्थी रुग्ण वगळता अन्य कोणत्याही रुग्णाला या योजनेचा लाभ येथील उपजिल्हा रु ग्णालयातून मिळत नसल्याची ओरड होत आहे.

ठळक मुद्देअस्थिरुग्ण वगळता इतर लाभापासून वंचित : रिक्तपदांमुळे योजनांना ग्रहण

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगणघाट : गोरगरीब व जनसामान्यांना विनामूल्य आरोग्य सेवा मिळावी म्हणून शासनाने सुरू केलेल्या महात्मा फुले व पंतप्रधान जन आरोग्य योजनेचा मोठा गाजा होत आहे. परंतु अस्थी रुग्ण वगळता अन्य कोणत्याही रुग्णाला या योजनेचा लाभ येथील उपजिल्हा रु ग्णालयातून मिळत नसल्याची ओरड होत आहे.प्रशासनाने वेळीत दखल घेत येथील १०० खाटांच्या या उपजिल्हा रुग्णालयात आवश्यक डॉक्टरांची उपलब्धी करावी अन्यथा या योजना कागदावरच राहणार आहे. येथील ट्रामा केअर यूनिट मध्ये ५ व उपजिल्हा रुग्णालयात १३ अशी १८ डॉक्टरांची पदे मंजूर आहेत. या युनिटचे एक अस्थीरोग तज्ज्ञ एक वर्षांपासून व एक भूलतज्ज्ञ गत ५ वर्षापासून कार्यरत असून इतर वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी नियुक्तीच्या प्रतीक्षेत आहे. या १०० खाटांचे उपजिल्हारुग्णालयात ८ डॉक्टर हजेरी पटावर आहे. यापैकी एक डॉ. कपूर मागील चार वर्षांपासून जिल्हा रुग्णालयात प्रतिनियुक्तीवर आहेत. उर्वरित डॉक्टरांमध्ये प्रमुख मेडिसीन, शल्य चिकित्सक, स्त्रीरोग व प्रसूती तज्ज्ञांचा अभाव आहे. उपलब्ध डॉक्टरकडून २४ तास रुग्णसेवा व जवळपास १००० बाह्यरुग्ण तपासणी केल्या जात आहे. डॉ. राहुल भोयर व डॉ.आशिष लांडे या अस्थिरोग तज्ज्ञांनी मागील ५ महिन्यात ५० च्या वर शस्त्रक्रिया केल्या असून लहानात लहान फ्रॅक्चरपासून सांधाबदली पर्यंतच्या अस्थीरोग शस्त्रक्रिया विनामूल्य होत आहेत.मेडिसीन, शल्य चिकित्सक, स्त्रीरोग व प्रसूती तज्ज्ञांचा अभाव असल्याने महात्मा फुले व पंतप्रधान जन आरोग्य शासन योजना कागदावर दिसून येत आहे. त्यामुळे हिंगणघाट समुद्रपूर तालुक्याच्या या उपविभागातील नागरिकांना उपचारासाठी सावंगी मेघे, सेवाग्राम व जिल्हा रुग्णालयात धाव घ्यावी लागते. अनेकांना वेळीच उपचार न मिळाल्याने मोठ्या रुग्णालयात पोहोचण्याआधीच जीव गमविण्याच्या घटना सातत्याने सुरु आहे. अशा स्थितीत मनुष्यबळ नसल्याने रुग्णांना मात्र नाईलाजास्तव स्थानिक खाजगी रुग्णालयात उपचार घ्यावा लागतो. वेळप्रसंगी कर्जबाजारी होऊन जीव वाचविण्याशिवाय पर्याय उरत नाही. अशा स्थितीत शासनाची विनामूल्य आरोग्य उपचार योजना तज्ञ डॉक्टरांअभावी फसवी ठरत आहे.नागपुर- हैदराबाद राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ७ व चंद्रपूर राज्यमार्ग तसेच दिल्ली-कन्याकुमारी लोहमार्गावरील हिंगणघाटच्या परिसरात दरवर्षी अपघातांमध्ये मुत्यूमुखी पडणाऱ्यांची संख्या मोठी आहे. अपघातातील जखमी रुग्णांना अतिदक्षता विभागात पहिल्या तासात तातडीचे प्राथमिक उपचार अत्यावश्यक आहे. याची शासनाने दखल घेऊन २० खाटांचे ट्रामा केअर युनिट मंजूर केले. याला वीस वर्षाचा कालावधी लोटला तरी ते पुर्णत्वास गेले नसल्याने आरोग्य यंत्रणा कशी ठेपाळली याचे हे उदाहरण ठरत आहे.वीस वर्षांपासून हिंगणघाटवासीयांना ट्रामा केअर युनिटची प्रतीक्षायेथे वीस वर्षांपूर्वी २० खाटांचे ट्रामा केअर युनिट मंजूर केले होते. २०१२ मध्ये ७० लाखाच्या ट्रामा केअर युनीटच्या इमारतीचे बांधकाम सुरू होऊन ५ वर्षापूर्वी पूर्णत्वास आले. परंतु अनेक त्रुटी अभावी ट्रामा केअर अजूनही लोकार्पणाचे प्रतीक्षेत आहे.सोबतच १०० खाटांच्या उपजिल्हा रुग्णालयातही अनेक डॉक्टरांची पदे रिक्त असल्याने कामाचा भार वाढत आहे. तसेच हिंगणघाट व समुद्रपूर हे मोठे शहर असून परिसरातील खेड्यातून नागरिकही उपचारासाठी येतात. परंतू अपुऱ्या अधिकाऱ्यांअभावी त्यांना योग्य उपचार मिळत नाही.

टॅग्स :Healthआरोग्य