लोकमत न्यूज नेटवर्कसिंदी (रेल्वे) : शासनाकडून दलित वस्ती सुधार योजनेअंतर्गत प्राप्त निधीचा मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार केल्याचा ठपका समाज कल्याण विभागाच्या सहायक आयुक्तांनी नुकताच एका पत्राद्वारे केला आहे. प्रभाग क्र.४ मधील एका सिमेंट रोडबाबत हा प्रकार घडला आहे. चौकशी केली असता सदर तक्रारीत तथ्य न आढळून आल्याचा अभिप्राय समाज कल्याण आयुक्तांनी दिला आहे. या प्रकरणी चौकशी करून दोषींविरुद्ध अविलंब कारवाई करावी, असे पत्रात नमूद करण्यात आले आहे.भारिप बहुजन महासंघ आणि वंचित बहुजन आघाडीने तक्रारीत म्हटले आहे की, प्रभाग क्र. ४ मधील रिलायन्स टॉवर ते गुंज कॉन्व्हेंटदरम्यानच्या सिमेंट रस्ता बांधकामात दलित वस्ती सुधार योजनेचा निधी वापरण्यात आला. प्रत्यक्षात बांधकाम करण्यात आले त्या प्रभागात संबंधित रस्त्याच्या आजूबाजूला दलितांची वस्तीच नाही. ढोक ते राजू कस्तुरे यांच्या घरापर्यंत बांधण्यात आलेल्या रस्त्याची चौकशी श्रीमती बाराहाते यांनी केली असता ढोक व कस्तुरे यांचे निवासस्थान प्रभाग ४ मध्ये असले तरीही मार्गाजवळ ते राहत नसल्याचे बयानात नमूद केले होते.मात्र, या व्यवहारात घोळ असल्याची तक्रार पुन्हा काही नागरिकांनी केली. त्या अनुषंगाने समाजकल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त कुलकर्णी तसेच पालिकेच्या मुख्याधिकाऱ्यांनी रस्ता बांधकामाची पाहणी केली. त्यावेळी तक्रारीत तथ्य असल्याचे सहाय्यक आयुक्त कुलकर्णी यांना जाणवले. तथापि, रस्त्याच्या बांधकामाला २४ आगस्ट २०१६ रोजी मंजुरी प्रदान करताना घातलेल्या अटींचे उल्लंघन करण्यात आले आहे. रस्ता गैरदलित वस्तीत बांधून प्रशासनाची दिशाभूल करण्यात आली, असा आरोपही त्या पत्रातून करण्यात आला आहे.विहित मुदतीत बांधकाम पूर्ण झाले नाही आणि मुदत संपल्यानंतर दीड वर्षाचा कालावधी लोटला असून बांधकाम अपूर्ण असल्याचे समाज विभागाने मुख्याधिकाºयांच्या लक्षात आणून दिले. मुदत संपल्या नंतर संबंधितांनी वाढीव मुदत देण्यात यावी या करिता शासनाची परवानगी घेतली नाही, तसे जिल्हाधिकारी व मुख्याधिकारी सिंदी (रेल्वे) यांना पाठविलेल्या पत्रात म्हटले आहे. या प्रकरणी सखोल चौकशी करून अनुसूचित जाती व्यतिरिक्त इतरांना फायदा घेण्याकरिता हा गैरव्यवहार झाला आहे, असे मत सहाय्यक आयुक्तांनी नोंदविले आहे. परिणामी या प्रकरणी दोषी वर कारवाही करून तसा अहवाल जिल्हाधिकारी आणि समाजकल्याण आयुक्त वर्धा यांना सादर करावा असे पत्रात म्हटले आहे.कारवाईकडे नागरिकांचे लक्षसूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रभाग क्रमांक ४ मधील सदर मार्गाच्या बांधकामात सत्ता पक्षाचे नगरसेवक व नगराध्यक्षांचे चे हित जुळले तर नाही ना, अशी चर्चा गावात आहे. या प्रकरणी शासन-प्रशासन काय कारवाई करते, याची उत्सुकता या प्रभागातील नागरिकांना आहे.
दलित वस्ती सुधारच्या निधीचा गैरवापर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 09, 2019 11:15 PM
प्रभाग क्र.४ मधील एका सिमेंट रोडबाबत हा प्रकार घडला आहे. चौकशी केली असता सदर तक्रारीत तथ्य न आढळून आल्याचा अभिप्राय समाज कल्याण आयुक्तांनी दिला आहे. या प्रकरणी चौकशी करून दोषींविरुद्ध अविलंब कारवाई करावी, असे पत्रात नमूद करण्यात आले आहे.
ठळक मुद्देजिल्हाधिकाऱ्यांंना कारवाई अहवाल सादर करण्याच्या सूचना