शहरं
Join us  
Trending Stories
1
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
2
"तुम्हाला आत टाकणार"; आदित्य ठाकरेंचा सदा सरवणकरांना भरसभेत इशारा
3
आधी २ 'बदक' आता 'पदक' मिळवणारी सेंच्युरी! संजूनं मोडला KL राहुलचा रेकॉर्ड
4
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
5
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
6
"काळा डाग गुलाबी रंगाने झाकला जात नाही...", अमोल कोल्हेंचा नाव न घेता अजित दादांवर निशाणा
7
संजू सॅमसन अन् तिलक वर्मा दोघांची शतकं; टीम इंडियाच्या जोडीनं रचला खास विक्रम
8
IND vs SA : सर्वोच्च धावसंख्या, सर्वाधिक षटकार अन् दोन शतकवीर; मॅचमधील ५ रेकॉर्ड्स 
9
दिल्लीत पुन्हा ड्रग्सची मोठी खेप जप्त; आंतरराष्ट्रीय बाजारात तब्बल 900 कोटी रुपये किंमत
10
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
11
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् आता सांगतात की..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
12
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
13
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
14
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
15
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
16
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
17
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
18
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
19
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
20
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!

कंत्राटदारांकडून दिशाभूल; ‘वेस्ट मटेरियल’ रस्त्यातच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 31, 2019 11:43 PM

वर्धा-हिंगणघाट या दीडशे कोटी रुपयांच्या रस्ता बांधकामात कंत्राटदाराकडून वेस्ट मटेरियलचा वापर करण्यात आला आहे. याबाबत वृत्त प्रकाशित करताच राष्ट्रीय महामार्गाच्या अधिकाऱ्यांनी कंन्सलटंट कंपनीच्या टीम लिडरला सूचना करून वेस्ट मटेरियल बाहेर काढण्याचे आदेश दिले.

ठळक मुद्देसदोष बांधकाम : अधिकाऱ्यांच्या उंटावरून शेळ्या

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : वर्धा-हिंगणघाट या दीडशे कोटी रुपयांच्या रस्ता बांधकामात कंत्राटदाराकडून वेस्ट मटेरियलचा वापर करण्यात आला आहे. याबाबत वृत्त प्रकाशित करताच राष्ट्रीय महामार्गाच्या अधिकाऱ्यांनी कंन्सलटंट कंपनीच्या टीम लिडरला सूचना करून वेस्ट मटेरियल बाहेर काढण्याचे आदेश दिले. त्यामुळे दोन दिवसांनी कंत्राटदार व कंन्सलटंट कंपनीकडून वेस्ट मटेरियल काढल्याचेही सांगण्यात आले. मात्र, प्रत्यक्षात वेस्ट मटेरियल रस्त्यातच दाबल्याचे चित्र आहे.वर्धा ते हिंगणघाट या ३५ किलोमीटर महामार्गाच्या रुंदीकरणाकरिता शासनाकडून जवळपास दीडशे कोटी रुपयांचा निधी दिला आहे. या कामाचा कंत्राट आरटीसी इन्फ्रास्ट्रक्चर या कंपनीला दिला असून कामाची सुरुवातही करण्यात आली आहे. वायगाव (निपाणी) ते सेलू (काटे) दरम्यान रस्त्याच्या बाजूला खोदकाम करून रुंदीकरणाचे काम केले जात आहे. या खोदकामात गिट्टी व मुरुमाऐवजी डांबरी रस्त्याचे वेस्ट मटेरियल वापरण्यात आल्याचे वृत्त ‘लोकमत’ने प्रकाशित केले. या प्रकाराला कंत्राटदारासह क न्सलटंट कंपनी व महामार्गाच्या उपविभागीय अभियंत्यांनीही दुजोरा दिला.बायमिस्टेक एक किलो मीटरदरम्यान वेस्ट मटेरियल वापरले असून ते काढून घेतले जाईल, असे सांगितले होते. दोन दिवसांनंतर कंत्राटदाराने ते मटेरियल काढल्याचेही कंन्सलटंट कंपनीचे टिम लिडर व उपविभागीय अभियंत्यांनी सांगितले. मात्र, प्रत्यक्षात मार्गावर जाऊन पाहणी केली असता वेस्ट मटेरियल काढण्याऐवजी रस्त्यात दाबलेले दिसून आले. यामुळे कंन्सलटंट कंपनी कंत्राटदारासोबतच असून उपविभागीय अभियंता उंटावरून शेळ्या हाकत असल्याचे निदर्शनास येत आहे. त्यामुळे वरिष्ठांनी याकडे लक्ष देऊन कारवाई करण्याची गरज आहे.रस्त्याची चौकशी करण्याची मागणीराष्ट्रीय महामार्ग विभागाच्यावतीने या रस्त्याच्या देखभालीची जबाबदारी एका क न्सलटंट कंपनीकडे सोपविली आहे. त्यामुळे राष्ट्रीय महामार्गाचे अधिकारी आपले हात वर करून मोकळे होत आहे. क न्सलटंट कपनीही कंत्राटदाराची पाठराखण करीत असल्याचे या प्रकारावरून लक्षात येत आहे. एक किलोमीटर दरम्यान वेस्ट मटेरियल वापरण्यात आले. ते काढणार असल्याचे सांगूनही न काढता तसेच कायम ठेवल्याने हिंगणघाट ते वायगावपर्यंतच्या रस्त्यात इतरही ठिकाणी वापरण्याची शक्यता बळावली असून या रस्त्याच्या कामाची चौकशी करण्याची गरज व्यक्त होत आहे.मला कंन्सलटंट कंपनीचे टिम लिडर चौकसे यांनी कंत्राटदाराकडून वेस्ट मटेरियल काढून घेतल्याचे सांगितले. पण, मी प्रत्यक्षात जाऊन पाहिले नाही. आता या कामाची पाहणी करून काय वास्तविकता आहे, ती तपासून कारवाई केली जाईल.पी. बी. तुंडुलकर,उपविभागीय अभियंता, राष्ट्रीय महामार्गकंत्राटदाराला रस्त्यावर वापरलेले वेस्ट मटेरियल काढण्याच्या सूचना केल्या होत्या. त्यानुसार त्याने काढलेही, परंतु मातीत दबलेले सर्वच वेस्ट मटेरियल काढणे शक्य होत नाही. काही प्रमाणात ते शिल्लक राहिले असावे. परंतु प्रत्यक्ष काय स्थिती आहे हे पाहिल्या शिवाय सांगता येणार नाही.व्ही. के. चौकसे,टिम लिडर