जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार : दोषींवर कारवाईची मागणीलोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : नजीकच्या पिपरी (पुनर्वसन) सालोड येथे सुरू असलेल्या पाणी पुरवठा विहीर व पाईपलाईनच्या कामात गैरप्रकार होत असल्याचा आरोप करीत या प्रकरणाची सखोल चौकशी करावी. तसेच चौकशीत दोषी आढळणाऱ्यांवर कठोर कार्यवाही करण्यात यावी, अशी मागणी जिल्हाधिकाऱ्यांना सादर केलेल्या निवेदनातून करण्यात आली आहे.प्रकल्पग्रस्तांकरिता होत असलेल्या नागरी सुविधेत पाणी पुरवठा योजनेचे काम करण्यात येत आहे. या कामात अनियमितता असल्याने कामाच्या दर्जेबाबत प्रश्न उपस्थित होत आहेत. विदर्भ पाटबंधारे विभागाचे अभियंता यांना १ जूनला सुरू असलेल्या मनमर्जी कामाची माहिती निवेदनाद्वारे देण्यात आली. परंतु, तेही याकडे दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप निवेदनातून करण्यात आला आहे.पिपरी पुनर्वसन सालोड (हि.) येथे होत असलेल्या कामादरम्यान कंत्राटदाराकडून सर्व शासकीय नियमांना फाटा दिल्या जात आहे. या कामासाठी वापरण्यात येणारे पाईप निकृष्ट दर्जाचे आहे. होत असलेल्या विकास कामाला आमचा विरोध नसून ते काम निकृष्ट व दर्जाचे होत असल्याने सदर काम तात्काळ थांबवून त्याची सखोल चौकशी करीत मनमर्जी काम करणाऱ्यांना तसेच दोषींवर कठोर कार्यवाही करण्यात यावी, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.मागणीचा विचार न झाल्यास आंदोलनपिपरी पुनर्वसन सालोड येथे २० लाख रुपयांचा निधी खचून होत असलेल्या पाणीपूरवठा योजनेच्या कामात गैरप्रकार होत आहे. सदर प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कार्यवाही करण्यात यावी, अशी मागणी नागरिकांनी निवेदनातून केली आहे. येत्या काही दिवसात मागणीचा विचार न झाल्यास तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशाराही निवेदनातून देण्यात आला आहे.
पाणी पुरवठा योजनेच्या कामात गैरप्रकार
By admin | Published: June 05, 2017 1:10 AM