लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : शहरानजिकच्या म्हसाळा ग्रामपंचायत परिसरातील वॉर्ड क्र मांक ३ मधील रवीनगरात अतिक्रमण करुन रस्ता अडविण्यात आला आहे. हा रस्ता मोकळा करुन देण्याकरिता ग्रामपंचायतला वारंवार तक्रारी करुनही दुर्लक्ष केले. त्यामुळे नागरिकांनी तहसीलदांना निवेदन दिल्यानंतर तहसीलदारांनी अतिक्रमण हटविण्याचे आदेश दिले. तरीही ग्रामपंचायत प्रशासनाने या आदेशालाही बगल दिल्यामुळे संतप्त ग्रामस्थांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे धाव घेतली आहे.वॉर्ड क्रमांक ३ मधील रवीनगरात एका बाजुला काशिकर यांचे शेत आहे तर दुसºया बाजुने खान यांचे घर आहे. यामधून नागरिकांकरिता ११ फुटाचा रस्ता आहे. मात्र या रस्त्यावर अतिक्रमण करण्यात आल्याने चारचाकी वाहनेही जाऊ शकत नाही. त्यामुळे नागरिकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. या रस्त्याच्या मधोमध निंबाचे मोठे झाड असल्याने वाहतुकीला अडथळा ठरत असल्यामुळे अनेकांच्या घराचे बांधकाम रखडले आहे. यासंदर्भात अतिक्रमण हटविण्यासह निंबाचे झाड तोडण्याकरिता नागरिकांनी अनेकदा ग्रामपंचायत प्रशासनाकडे अर्ज केले. परंतु निगलगट्ट ग्रामपंचायत प्रशासनाने अद्यापही लक्ष दिले नाही. त्यामुळे तलसील कार्यालय गाठून तहसीलदारांनी अतिक्रमण हटवून नागरिकांना न्याय देण्याचे आदेश दिले. तरीही अतिक्रमण हटविण्याकरिता पुढाकार घेतला नाही. त्यामुळे ग्रामपंचायत प्रशासनाला अतिक्रमणाची इतकी गोडी का? असाही प्रश्न उपस्थित होत आहे. अनेक महिन्यापासून ही समस्या प्रलंबित असल्यामुळे नागरिकांनी जिल्हाधिकारी यांनाही निवेदन दिले आहे. या निवेदनावर मंगशे गौरकर, प्राची ईश्वर इतवारे, सुनिल मनोहर चव्हाण, योगिता सुनिल चव्हाण, संगीता रमेश बोरकर, संध्या मिलिंद भैसारे, दिलीप सुखदेव उमाळे, बबनराव भगत, दिलीप उपासे, किरण वायगोकार, उमेश इंगळे, किशोर चव्हाण, करुणा चव्हाण यांची स्वाक्षरी आहे.तीन वर्षापासून नागरिक त्रस्तया अतिक्रमणाच्या समस्येसाठी रवीनगरातील नागरिकांची मागील तीन वर्षापासून पायपीट सुरु आहे. ग्रामपंचायत, तहसील कार्यालय, जिल्हाधिकारी कार्यालय व आमदारांनाही निवेदन दिले. त्यांनी ग्रामपंचायतला अतिक्र मण काढण्याबाबत सूचनाही दिल्या. परंतु सरपंच व सचिवांच्या हेकेखोरपणामुळे त्रास सहन करावा लागत आहे. सरपंचाकडून अतिक्रमणधारकांची पाठराखन करीत असल्याचा आरोप नागरिकांकडून होत आहे.ग्रामपंचायतचे अतिक्रमण हटविण्याबाबत प्रयत्न सुरु आहे. खान यांनी अतिक्रमण काढायला मंजुरी दिली परंतू काशिकर यांना पत्रव्यवहार केला.पण, त्यांचे अद्याप उत्तर मिळाले नाही. तसेच अतिक्रमण हटविण्यासंदर्भात ग्रामपंचायतला तहसील कार्यालयाकडून कोणतेही पत्र प्राप्त झाले नाही.संदीप पाटील, सरपंच, म्हसाळा
म्हसाळ्यात अतिक्र मण; ग्रा.प.निगरगट्ट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 09, 2019 9:37 PM
शहरानजिकच्या म्हसाळा ग्रामपंचायत परिसरातील वॉर्ड क्र मांक ३ मधील रवीनगरात अतिक्रमण करुन रस्ता अडविण्यात आला आहे. हा रस्ता मोकळा करुन देण्याकरिता ग्रामपंचायतला वारंवार तक्रारी करुनही दुर्लक्ष केले. त्यामुळे नागरिकांनी तहसीलदांना निवेदन दिल्यानंतर तहसीलदारांनी अतिक्रमण हटविण्याचे आदेश दिले.
ठळक मुद्देनागरिकांच्या तक्रारीकडे दुर्लक्ष : तहसीलदारांच्या आदेशालाही बगल