लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : वर्धा ते माळेगाव (ठेका) या मार्गावरील बससेवा नेहमीच अनियमित असल्याने विद्यार्थ्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. आजही विद्यार्थ्यांना दुपारपासून बसच्या प्रतीक्षेत थांबावे लागल्याने विद्यार्थ्यांनी आमदार डॉ. पंकज भोयर यांच्याशी संपर्क साधला. आमदारांनी बसस्थानकावर जात अधिकाऱ्यांना धारेवर धरले आणि तात्काळ बस उपलब्ध करून देण्याच्या मागणीकरिता ठिय्या मांडला. त्यामुळे बसस्थानकावरील अधिकाऱ्यांनीच चांगलीच धावपळ उडाली होती.वर्धा ते माळेगाव (ठेका) या मार्गावर येळाकेळी, सुकळी फाटा, जामनी, आकोली, म्हसाळा, आमगाव, मदनी, मदना, बोरखेडी या गावांचा समावेश आहे. या परिसरातील शेकडे विद्यार्थी व नागरिक दररोज प्रवास करतात.अंतरानुसार विद्यार्थी दरमहा ९०० रुपयांपासून तर ५०० रुपये खर्च करुन पास काढतात. या विद्यार्थ्यांना ये-जा करण्याकरिता दिवसभर एकच बस धावतात. त्यामुळे एका बसफेरीची वेळ चुकली की दिवसभरातील इतरही बसफेरी दोन ते तीन तास उशिराने जातात. परिणामी, सकाळी साडेसहा वाजता घराबाहेर पडलेल्या विद्यार्थ्यांना रात्री दहा वाजता घरी पोहोचतात. आजही दुपारी ३ वाजताची बस सायंकाळी सहा वाजतापर्यंत बसस्थानकावर आली नाही. विद्यार्थ्यांनी चौकशी कक्षात विचारणा केल्यास आम्हाला माहिती नाही, असे उत्तर मिळाले. म्हणून विद्यार्थ्यांनी थेट आमदार भोयर यांच्या संपर्क साधून आपल्या समस्या मांडल्या.आमदारांनी लागलीच बसस्थानकावर जाऊन विद्यार्थ्यांच्या समस्या जाणून घेत बसस्थानकावर ठिय्या मांडला. या बसच्या वाहकाकडून नेहमीच उद्धटपणाची वागणूक मिळते, चौकशी कक्षातील महिला योग्य माहिती न देता ओरडतात, असेही यावेळी विद्यार्थ्यांनी सांगितले. अवघ्या दहा ते पंधरा मिनिटात बस आल्यानंतर विद्यार्थ्यांना बसमध्ये बसवून आमदार माघारी परतले. यावेळी पल्लवी निकोडे, शीतल तगडे, अश्विनी तामगणे, आदित्य बावणे, साक्षी काळे, अमिशा खेळकर, चेतन श्रीवास, रितीक काकडे, विनोद सातघरे, प्रज्वल ठाकरे, वैभव खोबे, आकाश कांबळे, हर्षल खोबे, सूरज वाघळे, समिकेश सिमनाथ यांच्यासह असंख्य विद्यार्थी उपस्थित होते.
आमदारांचा बसस्थानकात ठिय्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 10, 2019 6:00 AM
वर्धा ते माळेगाव (ठेका) या मार्गावर येळाकेळी, सुकळी फाटा, जामनी, आकोली, म्हसाळा, आमगाव, मदनी, मदना, बोरखेडी या गावांचा समावेश आहे. या परिसरातील शेकडे विद्यार्थी व नागरिक दररोज प्रवास करतात.अंतरानुसार विद्यार्थी दरमहा ९०० रुपयांपासून तर ५०० रुपये खर्च करुन पास काढतात. या विद्यार्थ्यांना ये-जा करण्याकरिता दिवसभर एकच बस धावतात.
ठळक मुद्देअनियमित बससेवा : चार तास विद्यार्थ्यांची ताटकळ