लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : जिल्ह्यातील आदिवासी समाजाची अनेक वर्षांपासून असलेली मागणी आमदार डॉ. पंकज भोयर यांनी पूर्ण केली आहे. राज्यात मागील ५ वर्षात वर्धेत एकमेव एकात्मिक आदिवासी प्रकल्प कार्यालय मंजूर झाले आहे. आज त्याचे उदघाटन करताना आंनद होत आहे. चांगला लोकप्रतिनिधी मिळाला की, आपली कामे व समस्या चुटकीसरशी सुटतात. भोयर यांच्या रुपात एक चांगला आमदार तुम्हाला मिळाला आहे. त्यांनी हे प्रकल्प कार्यालय आणून आदिवासी समाजाला न्याय मिळवून दिला, असे प्रतिपादन पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले.येथील एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयाचे उद्घाटन गुरूवारी पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते करण्यात आले. सर्कस मैदानावर आयोजित या कार्यक्रमाला स्वागताध्यक्ष आमदार डॉ.पंकज भोयर, कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी खासदार रामदासजी तडस तर प्रमुख अतिथी म्हणून जिल्हा परिषद अध्यक्ष नितीन मडावी, नगराध्यक्ष अतुल तराळे, जिल्हाधिकारी विवेक भिमनवार, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यपालन अधिकारी डॉ. सचिन ओंबासे, आदिवासी विभागाचे अपर आयुक्त संदीप राठोड, जिल्हा परिषदेचे माजी सभापती मिलिंद भेंडे, राजू मडावी, जिल्हा परिषदच्या समाजकल्याण सभापती नीता गजाम, जिल्हा परिषद सदस्य सरस्वती मडावी, विनोद लाखे, समुद्रपूर पंचायत समितीच्या सभापती कांचन मडकाम, जिल्हा परिषदच्या सदस्य चंद्रकला धुर्वे, जयश्री चोखे, सहायक प्रकल्प अधिकारी दिगंबर चव्हाण, भाजपचे शहर अध्यक्ष प्रशांत बुर्ले यांच्यासह भाजपाचे पदाधिकारी व कार्यकर्ते आणि जिल्ह्यातील आदिवासी समाज बांधवांची उपस्थिती होती.आपल्या मतांची व्याजासह परतफेड केलीकेंद्र व राज्य सरकारने मागील पाच वर्षात विकासाला चालना दिली आहे. आदिवासी समाजासाठी केंद्र सरकारच्या २९ तर राज्य सरकारच्या १८ योजना सुरू आहे. प्रत्येक परिवारासाठी सरकारने योजना सुरु केली आहे. ३० वर्षात वर्धेला जे मिळाले नाही. ते या ५ वर्षात आमदार भोयर यांच्यामुळे मिळाले आहे. एक चांगले मत आयुष्य बनविते. मागील निवडणुकीत आपण मताचे दान केले. त्यामुळे व्याजासह आपले कार्य करुन ते परत देण्याचा प्रयत्न आहे. राज्यातील २८८ आमदारांपैकी डॉ. पंकज भोयर एक चांगले आमदार म्हणून ओळखले जातात. २०२२ पर्यंत प्रत्येक आदिवासीला हक्काचे घर देण्याचा आमचा माणस आहे. आयुष्यमान योजना, आदिवासींसाठी सुरू करण्यात आली आहे. या योजनेतून आदिवासींना ५ लाखाचे आरोग्यकवच देण्यात आले आहे. संजय गांधी निराधार योजनेचे अनुदान सरकारने वाढविले आहे, असे पालकमंत्री बावनकुळे यांनी सांगितले.खुर्च्या तोडण्यापेक्षा गावात जाऊन काम कराअधिकाऱ्यांनी कार्यालयात बसून खुर्च्या तोडण्याऐवजी गावागावांत जाऊन कार्य करावे, असे आवाहन पालकमंत्र्यांनी केले आहे. प्रकल्प कार्यालयासाठी सुसज्ज अशी इमारत तयार करण्यात येईल. संबंधितांनी तातडीने प्रस्ताव तयार करावा. या प्रस्तावाला याच वर्षी मंजुरी दिली जाईल. आदिवासींसाठी जात पडताळणी कार्यालय वर्ध्यात सुरू करण्यात येईल. राज्यात यापुढे सर्वप्रथम वर्र्ध्याच्या कार्यालयाला मंजुरी दिली जाईल, असेही बावनकुळे म्हणाले.जिल्ह्यातील आदिवासी बांधवांना विविध योजनांचा लाभ घेण्याकरिता नागपुरला जावे लागत होते. त्यामुळे त्यांचा वेळ आणि पैसाही मोठ्या प्रमाणात खर्च व्हायचा. आदिवासी समाज बांधवांनी प्रकल्प कार्यालयाची मागणी केल्यानंतर पाठपुरावा सुरु केला. त्यात यश आले आणि आज जिल्ह्यात प्रकल्प कार्यालय सुरु झाले. आपल्या छोट्याशा प्रयत्नाने आदिवासी समाजबांधवांचा मोठा प्रश्न सोडविता आला, याचे समाधान आहे.डॉ. पंकज भोयर, आमदार
प्रकल्प कार्यालय आणून आमदारांनी आदिवासी समाजाला न्याय दिला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 20, 2019 6:00 AM
चांगला लोकप्रतिनिधी मिळाला की, आपली कामे व समस्या चुटकीसरशी सुटतात. भोयर यांच्या रुपात एक चांगला आमदार तुम्हाला मिळाला आहे. त्यांनी हे प्रकल्प कार्यालय आणून आदिवासी समाजाला न्याय मिळवून दिला, असे प्रतिपादन पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले.
ठळक मुद्देचंद्रशेखर बावनकुळे : आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयाचे उद्घाटन