ठळक मुद्देचोरलेल्या मोबाईलची ओएलएक्सवर विक्री
लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा: आजकाल यू ट्यूब किंवा गुगल या सर्च इंजिनवरून काय वाट्टेल ते पाहून गुन्हेगारी कृत्य करणाऱ्यांची संख्या वाढते आहे. अशाच प्रकारची एक घटना वर्ध्यात उघडकीस आली. शहरातील दोन व्यावसायिक प्रतिष्ठानांमधून मोबाईल चोरीला गेले होते. स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी या तीन चोरट्यांना जेरबंद केले तेव्हा त्यांच्या तंत्रशुद्ध चोरीची घटना उघडकीस आली.यू ट्यूबवर चोरी कशी करायची याचे शिक्षण देणारे व्हिडिओ पाहून या तिघांनी दुकानातून मोबाईल चोरणे सुरू केले. चोरलेल्या मोबाईलला ओएलएक्स या विक्री संकेतस्थळावरून ते विकत होते. या चोरट्यांपैकी एकजण अल्पवयीन आहे. तिघेही उच्च शिक्षित कुटुंबातील असून पुढील तपास सुरू आहे.