लोकमत न्यूज नेटवर्कआर्वी : शासनाच्या सर्व विकास कामांचा योजनाबद्ध पद्धतीने अंगीकार करून गावचा विकास व्हावा म्हणून पुढाकार घेण्यात आला. या ध्यासातून झालेली गावातील विकास कामे इतर गावांकरिता ‘मॉडेल’ ठरणारीच आहेत. आजही राजापूर गावाची विकासाकडे घोडदौड सुरू असून सर्वांगिन विकास साधण्यासाठी नेत्यांसह ग्रामस्थांचीही धडपड सुरू आहे.शासनाकडून प्राप्त निधीतून गावात अनेक विकास कामे करण्यात आलीत. यात गावात १० लाखांचे ग्रामपंचायत भवन, बाकळी नदीवर २.५० कोटी रुपयांच्या पुलाचे बांधकाम, राजापूर, कर्माबाद या गावांसाठी ४० लाखांची पाणीपुरवठा योजना पूर्ण करण्यात आली आहे. राजापूर येथील हनुमान मंदिर, अवधूत महाराज मंदिर यांचा जीर्णोद्धार, ठक्करबाप्पा योजनेंतर्गत गावातील नाल्यांचे बांधकाम, कर्माबाद येथे पोच मार्गावर पुलाचे बांधकाम यासाठी २ कोटी मंजूर करण्यात आले आहे. राजापूर, कर्माबाद येथे १२ लाखांची दलितवस्ती सुधार योजनेची कामे, राजापूर येथे बाजार ओटे, राजापूर पूनर्वसन येथे २३ लाखांचे नाली बांधकाम, प्रवासी निवारा बांधकाम, स्वच्छ भारत मिशन अंतर्गत गावात १०० टक्के शौचालयाचे बांधकाम करण्यात आले. शिवाय राजापूर व कर्माबाद येथील पाणीपुरवठा योजनेवर फिल्टर प्लॉन्ट उभारण्यासाठी १० लाख रुपये मंजूर आहे. राजापूर पुनर्वसन येथील रस्त्यांचे डांबरीकरण, राजापूर येथील स्मशानभूमीचे सौंदर्यीकरण, राजापूर-देऊरवाडा मार्ग डांबरीकरण, कर्माबाद येथे बसस्थानक ते गावापर्यंत पथदिवे लावणे आदी कामे होत आहेत.कर्माबाद येथे बसस्थानकाचे बांधकाम, राजापूर येथील सेवा सहकारी सोसायटीच्या माध्यमातून शेतमाल ठेवण्यासाठी गोदाम निर्मिती, बचतगटांच्या महिलांना दुधाळ जनावरांचे वाटप, राजापूर, कर्माबाद येथे व्यायामशाळेचे बांधकाम, राजापूर येथे महिला, मुलींसाठी सॅनेटरी मशिन बसविणे आदी कामे प्रस्तावित करण्यात आली आहेत.राजापूर गावाच्या सर्वांगिण विकासासाठी गावातील सर्व विकासकामे ग्रामस्थांच्या सहकार्याने पार पडत आहेत. चार वर्षांपासून राजापूर ग्रा.पं. च्या माध्यमातून विकास कामे पूर्णत्वास नेत आहे. या कार्यासाठी माजी आमदार दादाराव केचे यांचे मार्गदर्शन लाभत आहे.- प्रा. धर्मेंद्र राऊत, पं.स. उपसभापती, आर्वी.
राजापूर गावातील विकास ठरणार ‘मॉडेल’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 18, 2018 11:37 PM
शासनाच्या सर्व विकास कामांचा योजनाबद्ध पद्धतीने अंगीकार करून गावचा विकास व्हावा म्हणून पुढाकार घेण्यात आला. या ध्यासातून झालेली गावातील विकास कामे इतर गावांकरिता ‘मॉडेल’ ठरणारीच आहेत.
ठळक मुद्देआदर्श ग्राम पुरस्काराने सन्मानित