शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रचारसभेहून परतत असताना वाहनावर दगडफेक; अनिल देशमुख जखमी, उपचारांसाठी रुग्णालयात दाखल
2
आपला उमेदवार १ नंबर, यादीत नाव १ नंबर, लीड १ नंबर लागली पाहिजे; रितेश देशमुखचा लय भारी प्रचार
3
“काँग्रेसचे कायम कुटुंबाला प्राधान्य, पण आमच्यासाठी राष्ट्र प्रथम”; CM मोहन यादव यांची टीका
4
'लोकशाहीचे धिंडवडे...', अनिल देशमुखांवरील हल्ल्याचा शरद पवार गटाकडून निषेध
5
“विश्वजित कदम यांच्यात मुख्यमंत्री होण्याची क्षमता, दीड लाखांहून अधिक मतांनी विजयी होतील”
6
2 तास पाठलाग अन् पाकिस्तानी जहाजावरून भारतीय मच्छिमारांची सुटका! इंडियन कोस्ट गार्डनं दाखवला दम
7
“अजितवर अन्याय, तो काय सोसतोय हे मला माहिती आहे”; आई आशाताई पवारांचा पत्राद्वारे संवाद
8
यंदा बारामती अंडरकरंट! दोन्ही पवारांच्या सभांना तोबा गर्दी, कोणालाच थांगपत्ता लागेना...
9
“...तर उद्या सकाळी निवडणुकीतून माघार घेईन”; दिलीप वळसे पाटलांचे खुले आव्हान
10
'ही राष्ट्रीय आणीबाणी', मुख्यमंत्री आतिशी यांनी दिल्लीतील प्रदूषणाचे खापर केंद्रावर फोडले
11
हो..., मी सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आले, पण...; सुप्रिया सुळे स्पष्टच बोलल्या
12
गोरगरीब धारावीकरांना पक्के घर मिळू नये हीच राहुल गांधींची इच्छा; भाजपाचा घणाघाती आरोप
13
याला म्हणतात पैशांचा पाऊस...! ₹4 चा शेअर 4 महिन्यांत ₹282631 वर पोहोचला, गुंतवणूकदारांना केलं मालामाल
14
मुंबई पोलिसांना मोठे यश! लॉरेंस बिश्नोईच्या भावाला अमेरिकेत अटक; भारतात आणणार
15
'छोटा पोपटने काँग्रेसला बरबाद केले', राहुल गांधींच्या 'सेफ' विधानावर भाजपचा पलटवार
16
मणिपूरमध्ये कोकोमीचे मोठे प्रदर्शन, सरकारी कार्यालयांना टाळे; आता सात जिल्ह्यांत इंटरनेट बंद करण्यात
17
“खरगेंच्या गावात सोयाबीनला ३८०० चा दर, काँग्रेस निवडणुकांनंतर आश्वासन विसरते”: फडणवीस
18
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'हसन मुश्रीफ गाडला जाणार', शरद पवारांसाठी बहीण सरोज पाटील मैदानात, विरोधकांवर हल्लाबोल
19
“लोकांचे प्रश्न सोडवायची धमक, पुढच्या पिढीची गरज, युगेंद्रला निवडून द्या”: शरद पवार
20
“२ लाखांच्या लीडने विजयी होतील, बारामतीकरांनी ठरवलेय की अजितदादांना CM करायचे”: जय पवार

जलसंधारणासाठी काकडधरा ठरले मॉडेल

By admin | Published: July 13, 2017 12:52 AM

पाणीटंचाईचा सातत्याने सामना करताना आपले गाव पाण्यासाठी स्वयंपूर्ण व्हावे यासाठी सत्यमेव जयते वॉटरकप स्पर्धेमध्ये

सत्यमेव जयतेच्या वॉटरकपमध्ये घेतली आघाडी : ५२ गावांमध्येही जलसंधारणाचा आदर्श पॅटर्न लोकमत न्यूज नेटवर्क वर्धा : पाणीटंचाईचा सातत्याने सामना करताना आपले गाव पाण्यासाठी स्वयंपूर्ण व्हावे यासाठी सत्यमेव जयते वॉटरकप स्पर्धेमध्ये सहभागी होवून काकडधरा गावाने जलसंधारणाची कामे पूर्ण केली. संपूर्ण गाव जलयुक्त करण्याचा अभिनव उपक्रम जिल्ह्यातील अतिदुर्गम व आदिवासीबहुल काकडधरा या गावाने यशस्वीपणे राबवित वॉटरकप स्पर्धेत आघाडी घेतली आहे. जलदेवतेचे गाव म्हणून काकडदरा हे गाव संपूर्ण राज्यात ओळखले जात असून जलसंधारणाचे मॉडेल ठरले आहे. यासह आर्वी तालुक्यातील ५२ गावांनीही वॉटरकप स्पर्धेत उतरुन पाणीटंचाईवर मात करण्यासाठी विविध उपाययोजना यशस्वीपणे पूर्ण केल्या. सत्यमेव जयतेकडून वॉटरकप स्पर्धा जाहीर झाल्यानंतर नागपूर विभागात केवळ आर्वी तालुक्याने पुढाकार घेवून काकडधरासह ५२ गावांनी स्पर्धेत सहभागी होण्याचा निर्धार केला होता. यासाठी आर्वीचे सुमित वानखेडे तसेच युवा सहकाऱ्यांंनी केलेल्या दीड महिन्याच्या अथक प्रयत्नानंतर ५२ गावात जलसंधारणाची विविध कामे यशस्वीपणे पूर्ण करण्यात आली. यासाठी गावातील सरपंच व ग्रामस्थांचा सहभाग मिळाल्यामुळे लोकसहभागातून करावयाच्या विविध कामांना चांगला प्रतिसाद मिळाला. या संपूर्ण उपक्रमाची प्रेरणा ठरली ते गाव म्हणजे काकडधरा. गावात पडणारा पावसाचा प्रत्येक थेंब अडवून ग्रामस्थांनी श्रमदानाने उभ्या केलेल्या जलसंधारणाच्या उपचारामुळे पहिल्याच पावसात हे गाव पाणीदार ठरले आहे. ग्रामदेवता म्हणून जलदेवतेची प्रतिस्थापना हे या गावाचे वैशिष्ट्य ठरले. वॉटरकप स्पर्धेच्या अंतिम निवडीमध्ये आपले गाव निश्चित आघाडीवर राहील हा आत्मविश्वास येथील ग्रामस्थांना आहे. काकडधरा या गावाने जलसंधारणाच्या केलेल्या विविध उपक्रमामुळे या गावात मोठ्या प्रमाणात पाणीसाठा निर्माण होणार आहे. यामध्ये सलग समतल चर (सीसीटी) बांधकामामुळे ७५.८४ घनमीटर, कंटुर बांधकामामुळे २ हजार ९३८.६४ घनमीटर तसेच अनघड दगडी बांधामुळे ९१९.०६ घनमीटर कामामुळे मोठ्या प्रमाणात जलसाठा निर्माण होणार आहे. ही संपूर्ण कामे ग्रामस्थांनी सकाळी ६ ते रात्री उशिरापर्यंत श्रमदानाने पूर्ण केली आहे. अशा प्रकारचा उपक्रम प्रथमच होत आहे. श्रमदानाबरोबरच लोकसभागातून मशीनद्वारे खोल, समतल, पातळीचर, शेतीबांध बंदीस्ती, कपॉर्मेंट बंडींग, कंटुर बंध, शेततळे, लहान माती बंधारा, माती नाला बांध, नाला खोलीकरण व रुंदीकरणाची सरासरी ५६ हजार ६६५.८९ घनमीटरची कामे पूर्ण झाली आहेत. जलयुक्त शिवारासोबतच गाव स्वच्छ व पर्यावरणयुक्त राहावे यासाठी प्रत्येक घरातून वाहणारा सांडपाण्यावर प्रक्रिया करण्यासाठी ७० शोषखड्डे खोदण्यात आले आहे. विहीर पूर्नभरण व रचनांची दुरुस्तीची कामे पूर्ण करतानाच गावात वृक्षारोपण करण्यासाठी चारशे खड्डे खोदून तेथे वृक्षलागवड करण्यात आली. काकडधरासह पिंपळगाव (भोसले), नेरी (मिझार्पूर), बोथली (नटाळा) या गावानेही काकडधराचा आदर्श पुढे नेऊन नाला खोलीकरण, रुंदीकरण, शेततळे, कम्पार्टमेन्ट बंडींग, लहान माती बंधारा, दगडी बांध अशी प्रत्येक गावात सरासरी ६० हजार ते ६५ हजार घनमीटरची कामे पूर्ण केली आहे. त्यासोबत गावात शोषखड्डे व प्रत्येक गावात वृक्षारोपणासाठी सरासरी चारशे ते पाचशे खड्डे खोदून वृक्षरोपणाला सुरुवात केली आहे. या गावाचा आदर्श घेत तालुक्यातील सावंगी (पोळ), पिंपळखुटा, माळेगाव (ठेका), बोथली (किन्हाळा), सावद, विरुळ, रसुलाबाद, दिघी, रोहणा, बेढोणा, बेलोरा, वाढोणा, दहेगाव (मुस्तफा), तळेगाव (रघुजी), पानवाडी, बोरगाव (हातला), उमरी (सुकळी) या गावातही जलसंधारणाची कामे मोठ्या प्रमाणात पूर्ण झाली आहे. विशेष म्हणजे या संपूर्ण गावातील ग्रामस्थांनी सहभाग घेत श्रमदान करुन कामे पूर्ण केली आहे. सत्यमेव जयतेच्या वॉटरकप स्पर्धेच्या निमित्ताने ‘जल है तो कल है’, हा एकच ध्यास घेवून पाण्यासाठी पुढच्या पिढीला त्रास होवू नये यासाठी जलयुक्त शिवारसाठी हजारो हात एकत्र आले आहेत. उद्देश केवळ गावं जलयुक्त करण्याचा. पहिल्याच पावसात ६६ हजार ६९९ घ.मी. जलसाठा पिण्याच्या पाण्यासाठी स्वयंपूर्णतेकडे जातांना आदिवासीबहुल काकडधरा या गावाने लोकसहभागातून तसेच स्व: परिश्रमातून गावात ६२ हजार ५९०.०७ घनमीटर जलसाठा निर्माण होईल ऐवढी कामे केली आहे. या कामाची दखल सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धेच्या चमुने सुध्दा घेतली आहे. या गावासोबतच पिंपळगाव (भोसले) येथे ५६ हजार ५८४.९२ घनमीटर, नेरी (मिझार्पूर) एकूण ७० हजार ९६४.१६ घनमीटर तर बोथली (नटाळा) यागावातही राबविलेल्या विविध उपचारामुळे ७५ हजार ६२१.९८ घनमीटर जलसाठा निर्माण होणार आहे. पहिल्याच पावसात या गावांमध्ये राबविलेल्या विविध उपक्रमात जलसाठा निर्माण झाल्यामुळे गावकरी आनंदीत झाले आहेत.