लोकमत न्यूज नेटवर्कहिंगणघाट : मोहता इंडस्ट्रीज मधील प्रोसेस, फोल्डिंग आणि अन्य विभागातील कामगारांचा नोव्हेंबर महिन्याचे वेतन अद्यापही अदा करण्यात आले नाही. त्यामुळे कामगारांवर उपासमारीची वेळ आली असून सदर कंपनीच्या संचालकांवर गुन्हे दाखल करण्यात यावे, अशी मागणी संतप्त कामगारांनी केली. इंटकचे महासचिव आफताब खान यांच्या नेतृत्त्वात शुक्रवारी सकाळी ११ वाजता मोर्चा काढून सदर मागणीचे निवेदन हिंगणघाट पोलीस ठाण्यातील अधिकाऱ्यांना सादर करण्यात आले. सदर आंदोलनात मोठ्या संख्येने कामगार सहभागी झाले होते.मोहता ग्रुपने प्रोसेस, फोल्डिंग व अन्य विभागातील कामगारांचे नोव्हेंबर २०१९ या महिन्याचे वेतन अद्यापही कामगारांना दिलेले नाही. त्यामुळे कामगारांना आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. शिवाय त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. मागील पाच ते सहा महिन्यांपासून वेतन न मिळाल्याने या कामगारांच्या कुटुंबीयांचा जीवन जगण्यासह त्यांच्या मुलांचा शिक्षणाचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. वेतन न देता कामगारांची बोळवणूक करणे हा प्रकार कामगारांची पिळवणूक करणारा असून मोहता इंडस्ट्रीजच्या संचालकांवर गुन्हे दाखल करण्यात यावे, अशी मागणी निवेदनातून देण्यात आली आहे. कामगारांचा मोर्चाने शहरातील प्रमुख मार्गाने मार्गक्रमण करून मोहता इंडस्ट्रीज गाठली. यावेळी इंटकचे महासचिव आफताब खान यांनी कामगारांना मार्गदर्शन केले. वेळीच कामगारांच्या समस्या निकाली न निघाल्यास आणि कुठलाही अनुचित प्रकार घडल्यास याची सर्वस्वी जबाबदारी मोहता इंडस्ट्रीजची राहील असा इशाराही यावेळी देण्यात आला आहे. मोर्चात मोठ्या संख्येने कामगार सहभागी झाले होते.
मोहता इंडस्ट्रीजच्या संचालकांवर गुन्हे दाखल करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 28, 2019 6:00 AM
मोहता ग्रुपने प्रोसेस, फोल्डिंग व अन्य विभागातील कामगारांचे नोव्हेंबर २०१९ या महिन्याचे वेतन अद्यापही कामगारांना दिलेले नाही. त्यामुळे कामगारांना आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. शिवाय त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. मागील पाच ते सहा महिन्यांपासून वेतन न मिळाल्याने या कामगारांच्या कुटुंबीयांचा जीवन जगण्यासह त्यांच्या मुलांचा शिक्षणाचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
ठळक मुद्देमागणी : पोलीस ठाण्यावर धडकला कामगारांचा मोर्चा