लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : जिल्ह्यात सोमवार आंदोलन वारच ठरला. या दिवशी एक-दोन नव्हे तर तब्बल तीन आंदोलने झाली. वर्धेत जिल्हाधिकारी कार्यालयालगत ८२ गटसचिवांचे बेमुदत उपोषण सुरू आहे. या उपोषणाचा आज पाचवा दिवस असून गटसचिवांनी त्यांच्या मागण्यांकडे जिल्हा प्रशासनाचे लक्ष वेधण्याकरिता मुंडण आंदोलन केले तर हिंगणघाट येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासह इतर सर्व पक्षांनी एकत्र येत शेतकऱ्यांच्या मागण्यांकरिता आंदोलन करीत उपविभागीय अधिकाºयांना विविध समस्यांचे निवेदन सादर केले. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनेही उपजिल्हा रुग्णालयांतील अनागोंदीवर हल्ला केला. यात रुग्णांना आवश्यक सुविधा मिळत नसल्याचा आरोप करण्यात आला. तत्सम निवेदन वैद्यकीय अधीक्षकांना देत मागण्यांकडे दुर्लक्ष झाल्यास आंदोलनाचा इशाराही देण्यात आला.वेतनासाठी गटसचिवांचे केशार्पण आंदोलनबेमुदत उपोषणाचा पाचवा दिवसलोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : थकित वेतन तात्काळ देण्यात यावे यासह विविध मागण्यांसाठी जिल्हा बँकेंतर्गत देखरेख सहकारी संस्थांच्या जिल्ह्यातील ८२ गटसचिवांनी ७ जूनपासून बेमुदत उपोषण सुरू आहे. आंदोलनकर्त्यांच्या मागण्यांवर समाधानकारक तोडगा न काढल्याने सोमवारी पाचव्या दिवशीही सदर आंदोलन सुरूच होते. सोमवारी आंदोलनात सहभागी गटसचिवांनी जिल्हाकचेरीसमोर मुंडण करून कर्मचारी विरोधी धोरणांला केस अर्पण करून निषेध केला.दि. वर्धा जिल्हा देखरेख सहकारी संस्था मर्या. वर्धा अंतर्गत कार्यरत ८३ गटसचिवांचे सुमारे तीन वर्षांपासून वेतन देण्यात आलेले नाही. त्यामुळे सदर गटसचिवांवर सध्या उपासमारीची वेळ आली आहे. सदर वेतनाची रक्कम मिळावी म्हणून संबंधितांना वेळोवळी निवेदने देण्यात आली. मात्र, त्यांनीही याकडे दुर्लक्ष करण्यातच धन्यता मानली. अखेर अन्यायग्रस्त गटसचिवांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत उपोषण सुरू केले आहे. जिल्ह्यातील गटसचिवांना त्यांच्या तीन वर्षांच्या वेतनाची रक्कम तात्काळ देण्यात यावी, अशी मागणी आंदोलनकर्त्यांची आहे.सोमवारी उपोषणाच्या पाचव्या दिवशी मागण्यांवर तोडगा न निघाल्याने हे आंदोलन सुरूच होते. सोमवारी दुपारी १२ वाजता आंदोलनकर्त्यांनी वेतनाच्या मागणीसाठी तसेच बेमुदत उपोषण सुरू करून चार दिवसांचा कालावधी लोटूनही मागण्यांकडे दुर्लक्ष करणाºया अधिकाºयांच्या निषेधार्थ मुंडण आंदोलन केले.सदर आंदोलनात महेंद्र ठाकूर, पी.डी. झाडे, के. एन. जिन्नेवार, एम.एम. राऊत, एस.सी. बुचे, एन. आर. फुलकरी, जी.बी. महाजन, पी.एम. काळे, ए. जी. बोरकर, जी.एम. डाहाके, डी. वाय. घोडमारे यांच्यासह मोठ्या संख्येने गटसचिव सहभागी झाले होते.शेतकऱ्यांच्या मागण्यांनी उपविभागीय कार्यालय दणाणलेलोकमत न्यूज नेटवर्कहिंगणघाट : राष्ट्रवादी काँगे्रस, भारतीय राष्ट्रीय काँग्रेस (आय), पिरिपा, विदर्भ राज्य आघाडी, भारिप बहुजन महासंघ, शेतकरी संघटना, रिपब्लिकन पार्टी यांच्या संयुक्त विद्यमाने शेतकरी, शेतमजूर, कामगार यांच्या विविध समस्यांबाबत उपविभागीय अधिकारी कार्यालयासमोर सोमवारी धरणे आंदोलन केले. या आंदोलनादरम्यान शेतकऱ्यांच्या विविध समस्यांचे निवेदन उपविभागीय अधिकाºयांना सादर करण्यात आले.या निवेदनात सरकारने जाहीर केल्याप्रमाणे सर्व शेतकऱ्यांची सरकसट कर्ज माफी करावी व त्यावरील व्याज माफ करावे, सन २०१८ च्या हंगामात शेतकऱ्यांना पीक कर्जाचे वाटप त्वरित करण्यात यावे तसेच ज्या शेतकऱ्यांवर कर्ज आहे त्याचे पुनर्गठण करून पीक कर्ज द्यावे. सरकारने सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना २०० रुपये प्रती क्विंटल जाहीर केलेले अनुदान देण्यात यावे, बोंडअळी कापूस उत्पादक शेतकऱ्यांना जाहीर केलेली रक्कम त्वरित देण्यात यावी यासह तूर, चण्याची रखडलेली नाफेडची खरेदी सुरू ठेवण्यात यावी आणि रखडलेले चुकारे तत्काळ देण्यात यावे, शेतकऱ्यांच्या शेतमालाला उत्पादन खर्चाच्या आधारावर व अधिक ५० टक्के नफा मिळवून हमी भाव द्यावा यासह हिंगणघाट येथील झोपडपट्टीवासींच्या समस्यांचाही या निवेदनात समावेश आहे.या आंदोलनात माजी आमदार प्रा. राजू तिमांडे, माजी आमदार वसंत बोंडे, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे राज्य उपाध्यक्ष समीर देशमुख, राकाँचे जिल्हाध्यक्ष सुनील राऊत, माजी नगराध्यक्ष विनायक चौधरी, विदर्भ राज्य पार्टीचे अनिल जवादे, शालिक डेहणे, सुवर्णा भोयर, मुस्दीक पटेल, वासुदेव गौळकार, भाष्कर राऊत, रसपाल शेंदे्र, कविता वानखेडे, मारोतराव सावेकर, कुंडलीक बकाने, सुधाकर दांडेकर आदींसह विविध राजकीय पक्षांचे कार्यकर्ते उपस्थित होते. या आंदोलनामुळे शेतकºयांच्या समस्यांनी उपविभागीय कार्यालयाचा परिसर दणाणल्याचे दिसून आले.उपजिल्हा रुग्णालयावर मनसेची धडकआठवड्यात रुग्णांकरिता असलेल्या १८ सोई पूर्ण न झाल्यास आंदोलनलोकमत न्यूज नेटवर्कहिंगणघाट : उपजिल्हा रुग्णालयात रुग्णांची गैरसोय होत असून वैद्यकीय अधिकाºयांनी डोळेझाक केली आहे. याकडे लक्ष वेधण्यासह महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हाध्यक्ष अतुल वांदिले यांच्यासह कार्यकर्त्यांनी सोमवारी या रुग्णालयावर धडक दिली.हिंगणघाट येथील उपजिल्हा रुग्णालय हे नागपूर ते आदीलाबादपर्यंतच्या राष्ट्रीय महामार्गावर असलेले एकमात्र मोठे रुग्णालय आहे. तालुक्यातील गरीब कामगार, शेतकरी, शेतमजूर, नोकरदार रुग्णांना तसेच राष्ट्रीय महामार्गावरील अपघातग्रस्तांना तात्काळ वैद्यकीय सेवा मिळण्याच्या हेतूने या रुग्णालयाकडे लोकांचा कल असतो; मात्र हिंगणघाट येथील रुग्णालयात रुग्णाच्या जीवासोबत खेळल्या जात आहे. याबाबत मनसेच्यावतीने जिल्हाध्यक्ष अतुल वांदिले यांनी रुग्णालयात कार्यकर्त्यांसह धडक देत वैद्यकीय अधीक्षक डॉ. किशोर चाचरकर यांना निवेदन सादर करून समस्यांच्या गांभिर्याबाबात अवगत केले.या मागण्यांत रुग्णालयातील सोनोग्राफी मशीन, एक्स-रे मशीन खराब झाल्याची बतावणी करून रुग्णांना खासगीत जाण्याचा सल्ला दिला जातो. यातच अनेक उपजिल्हा रुग्णालयात रुग्णांची नि:शुल्क रक्त चाचणी होते. येथे मात्र त्याकरिता पैसे द्यावे लागतात. रिक्त पदांचा घोळ कायम आहेच. यासह अनेक मागण्या यावेळी करण्यात आल्या. वॉटर कुलर बंद आहे. औषधीसाठा नाही. रुग्णालयात घाणीचे साम्राज्य आहे. या समस्या सोडविण्याची मागणी मनसेच्यावतीने करण्यात आली.
सोमवार ठरला आंदोलनवार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 11, 2018 11:08 PM
जिल्ह्यात सोमवार आंदोलन वारच ठरला. या दिवशी एक-दोन नव्हे तर तब्बल तीन आंदोलने झाली. वर्धेत जिल्हाधिकारी कार्यालयालगत ८२ गटसचिवांचे बेमुदत उपोषण सुरू आहे. या उपोषणाचा आज पाचवा दिवस असून गटसचिवांनी त्यांच्या मागण्यांकडे जिल्हा प्रशासनाचे लक्ष वेधण्याकरिता मुंडण आंदोलन केले तर हिंगणघाट येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासह इतर सर्व पक्षांनी एकत्र येत शेतकऱ्यांच्या मागण्यांकरिता आंदोलन करीत उपविभागीय अधिकाºयांना विविध समस्यांचे निवेदन सादर केले.
ठळक मुद्देवर्धेत गटसचिवांचे मुंडण : हिंगणघाट येथे शेतकऱ्यांच्या समस्येवर सर्वपक्षीय धरणे, मनसेचाही मोर्चा