लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : पॅनकार्ड क्लबमध्ये गुंतविलेल्या रकमा परत देण्यात याव्या, अशी मागणी गुंतवणूकदारांनी शिवा संघटनेचे जिल्हाप्रमुख सुरेश पट्टेवार यांच्या नेतृत्वात जिल्हाधिकाऱ्यांमार्फत केंद्रीय अर्थमंत्र्यांना पाठविलेल्या निवेदनातून केली आहे.भरमसाठ व्याजाचे आमिष देऊन पॅनकार्ड क्लबने गुंतवणूकदारांची कोटी रुपयांनी फसवणूक केली. सेबीने या प्रकरणात क्लबविरुद्ध कारवाई केली. मात्र, अद्याप कोणत्याही प्रकारचा निकाल लागला नसून प्रकरण थंडबस्त्यात पडले आहे. मुंबई येथील उच्च न्यायालयात सुरू असलेल्या या प्रकरणात सेबीकडून कुणीच उपस्थित राहात नाही. त्यामुळे गुंवणूकदारांच्या रकमा अद्याप अडकून असून प्रकरणात केवळ टाईमपास होत असल्याचा आरोप गुंतवणूकदारांनी केला आहे.यासंदर्भात केंद्र सरकार आणि राज्य सरकारातील मंत्र्यांकडे वारंवार पाठपुरावा करण्यात आला. मात्र, कुठल्याही हालचाली होत नसून रकमा अडकून पडल्या आहेत. अनेक गुंतवणूकदार सर्वसामान्य आहेत. लाखावर रकमा अडकून पडल्याने त्यांच्यावर उपासमारीची वेळ ओढवली आहे. या प्रकरणात शासनाने कारवाई करून गुंतवणूदारांच्या रकमा व्याजासह परत मिळवून द्याव्या, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.निवेदनावर अ. कृ. जाचक, प्रदीप वानखेडे, कृष्णा उमाटे, सचिन कावळे, अशोक नगराळे, कविश्वर जारुंडे, लतिका रणनवरे, संजय चौधरी, दिली डारबी, शीतल दाते, योगेश आकरे, गणेश भोगे, गिरीश सावळकर, राजेश जयस्वाल, प्रवीण एकापुरे, विवेक घुंगरुड, निकिता पेरके, पुष्पा नगराळे आदींच्या स्वाक्षरी आहेत.जिल्ह्यात नागरिकांनी पॅनकार्ड क्लबमध्ये १० कोटी रुपयांवर गुंतवणूक केली आहे. रक्कम परत मिळावी याकरिता नागरिकांनी शासन-प्रशासनाचे उंबरठे झिजविले; मात्र पदरी निराशाच पडली. कित्येक गुंतवणूकदारांचा मृत्यूही झाला आहे. मात्र, रक्कम मिळाली नाही. पॅनकार्डचे एजंट हात वर करून नामानिराळे झाले आहेत. एजंटवरही कारवाई करण्यात यावी, अशीही मागणी गुंतवणूकदारातून आता होत आहे.
‘पॅनकार्ड’ क्लबमध्ये रकमा अद्याप अडकून
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 12, 2019 10:34 PM
पॅनकार्ड क्लबमध्ये गुंतविलेल्या रकमा परत देण्यात याव्या, अशी मागणी गुंतवणूकदारांनी शिवा संघटनेचे जिल्हाप्रमुख सुरेश पट्टेवार यांच्या नेतृत्वात जिल्हाधिकाऱ्यांमार्फत केंद्रीय अर्थमंत्र्यांना पाठविलेल्या निवेदनातून केली आहे.
ठळक मुद्देजिल्हाधिकाऱ्यांमार्फत केंद्रीय अर्थमंत्र्यांना दिले निवेदन