लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : जिल्हा कंत्राटदार कल्याण समिती व सुशिक्षित बेरोजगार अभियंता संघटनेच्या नेतृत्त्वात शासकीय कंत्राटदारांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयासमोर आपल्या विविध मागण्यांसाठी १ डिसेंबरपासून साखळी उपोषण सुरू केले आहे. आंदोलनकर्त्यांच्या मागण्यांवर सहानुभूतीपूर्वक विचार होत ठोस निर्णय न झाल्याने सोमवारी २४ व्या दिवशी हे आंदोलन सुरूच होते. सोमवारी आंदोलनकर्त्या कंत्राटदारांनी उपोषण मंडपात ‘मनी हाय भाव, ‘देवेंद्र’ आम्हा पाव असे साकडे घालत एकापेक्षा एक भजनं सादर केली. शिवाय सरकारच्या कंत्राटदार विरोधी धोरणांचा निषेध नोंदविला.सा.बा. विभाग व आदिवासी विभागामार्फत ईमारती, पुलांची कामे पूर्ण झाली. परंतु, तीन वर्षांपासून कंत्राटदारांची सहा कोटींची देयके अदा करण्यात आली नाही. ती तात्काळ अदा करण्यात यावी. जि.प. बांधकाम विभागाच्यावतीने २५१५ विशेष निधी अंतर्गत ४ कोटी ५२ लाख रुपयांची कामे सन २०१६-१७ या आर्थिक वर्षात पूर्ण करून घेण्यात आली आहे. परंतु, सदरचे देयक एक वर्षांपासून देण्यास टाळाटाळ होत आहे. जि.प. लघुसिंचन विभागामार्फत उमरी ता. कारंजा येथील तलावाचे काम पूर्ण करण्यात आले; पण तीन वर्षांपासून कंत्राटदारांचे देयक थकले आहे. जि.प. ग्रामीण पाणी पुरवठा विभागातर्फे ग्रामीण पाणी पुरवठा योजनेंतर्गत पाणी पुरवठ्याची कामे पूर्ण झाली असताना वर्षभऱ्यापासून देयक देण्यात आलेली नाही. सदर देयके तात्काळ देण्यात यावी, अशी मागणी या आंदोलनाच्या माध्यमातून रेटण्यात आली.आंदोलनादरम्यान आंदोलनकर्त्या कंत्राटदारांनी काळ्या फिती बांधून व काळे झेंडे झडकवून शासनाच्या कंत्राटदार विरोधी धोरणांचा निषेध नोंदविला. तसेच विविध मागण्या तात्काळ निकाली काढण्याची मागणी केली. आंदोलनात किशोर मिटकरी, मुन्ना झाडे, प्रणव जोशी, राजेश नासरे, रवी एकापुरे, राजेश हाडोळे, विजय घवघवे, प्रशांत घाटे, अमोल क्षीरसागर, बाबा जाकीर, हेमंत नरहरशेट्टीवार, संजय नंदनवार, सतीश बुरे, मनोज भुतडा, विजय लांबाडे, अंकुश दर्यापुरकर, नंदु थोरात, शशीकांत नायसे आदी सहभागी झाले होते.मागण्या मान्य होईपर्यंत लढा कायम ठेवणारन्यायिक मागण्यांसाठी मागील २३ दिवसांपासून कंत्राटदार आंदोलन करीत आहेत. सरकारने आंदोलनकर्त्यांची समस्या लक्षात घेता मागण्या मान्य कराव्या. सरकार लहान कंत्राटदारांवर अन्याय करीत असून बाहेरच्या कंत्राटदारांवर पैशाचा पाऊसच पाडत आहे. त्यांना कुठल्याही अटी व नियम लागू नाहीत. कंत्राटदारांवरील अन्याय संघटना खपवून घेणार नाही. जोपर्यंत मागण्या मान्य होणार नाही तोपर्यंत हे साखळी उपोषण सुरूच राहिल, अशी माहिती संघटनेचे अध्यक्ष किशोर मिटकरी यांनी दिली.
मनी हाय भाव आता ‘देवेंद्र’ आम्हा पाव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 24, 2018 10:46 PM
जिल्हा कंत्राटदार कल्याण समिती व सुशिक्षित बेरोजगार अभियंता संघटनेच्या नेतृत्त्वात शासकीय कंत्राटदारांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयासमोर आपल्या विविध मागण्यांसाठी १ डिसेंबरपासून साखळी उपोषण सुरू केले आहे. आंदोलनकर्त्यांच्या मागण्यांवर सहानुभूतीपूर्वक विचार होत ठोस निर्णय न झाल्याने सोमवारी २४ व्या दिवशी हे आंदोलन सुरूच होते. सोमवारी आंदोलनकर्त्या कंत्राटदारांनी उपोषण मंडपात ‘मनी हाय भाव, ‘देवेंद्र’ आम्हा पाव असे साकडे घालत एकापेक्षा एक भजनं सादर केली. शिवाय सरकारच्या कंत्राटदार विरोधी धोरणांचा निषेध नोंदविला.
ठळक मुद्देकंत्राटदारांचे साकडे : साखळी उपोषणात भजनाने आणली रंगत