लोकमत न्यूज नेटवर्कसेलू : येथील पंचायत समितीची नियोजित मासिक सभा अधिकाऱ्यांच्या कामचुकार धोरणामुळे तहकूब करण्यात आली. मासिक सभेत असणारे प्रोसिडिंग बूकच गायब करण्यासह टेबल उपलब्ध नसल्याचा प्रकार उघडकीस आला. यावेळी उपस्थित सभापती उपसभापती व पंचायत समिती सदस्य यांनी प्रचंड नाराजी व्यक्त करीत येथील कार्यरत विस्तार अधिकारी यांची तातडीने हकालपट्टी करण्याची मागणी वरिष्ठ अधिकारी यांच्याकडे करणार आहे.मागील तीन मासिक सभेतील अनुपालनातील प्रश्नाची उत्तरे अद्यापही न मिळाल्याने संबंधित अधिकाºयाविषयी प्रचंड नाराजी व्यक्त करण्यात आली. अधिकारी व कर्मचाऱ्यांची अर्जित रजा मंजूर नसून सुद्धा अनेक अधिकारी व कर्मचारी हे या सभेला गैरहजर होते. पंचायत समितीच्या गट विकास अधिकारी कोल्हे यांचा अधीकारी व कर्मचारी यांच्यावर कोणताही वचक नसल्याचा आरोप यावेळी पंचायत समिती सदस्यांकडून करण्यात आला. पंचायत समिती क्षेत्रातील अनेक कामे प्रलंबित असून अधिकाºयांच्या नाकरतेपणामुळे अनेक अतीआवश्यक कामाला ब्रेक लागल्याचे चित्र आहे. सभापती उपसभापती यांच्या कक्षात पंचायत समिती सदस्यांना बसायला खुर्च्या नसून स्वच्छतागृहाची परिस्थिती वाईट आहे. स्वत: पंचायत समिती सदस्यांना लघुशंकेसाठी उघड्यावर जाण्याची वेळ आली आहे. एकंदर पंचायत समितीचा कारभार आणि येथील अपुरी व्यवस्था व गटविकास अधिकारी यांचे संबंधित विभागातील अधिकारी व कर्मचाºयांवर वचक नसणे असा सर्व प्रकार या मासिक सभेच्यानिमित्ताने उघडकीस आले.अध्यक्षांच्या परवानगी शिवाय पंचायत समितीचे अधिकारी व कर्मचारी हेतूपुरस्सर नियोजित मासिक सभेला गैरहजर होते. गटविकास अधिकारी यांचे अधिकाºयांवर कोणताही वचक नसून गैरहजर असणाºया अधिकारी व कर्मचारी यांच्यावर गटविकास अधिकाºयांनी शिस्तभंगाची कार्यवाही करावी.- जयश्री खोडे, सभापती, पं.स. सेलू.पं.स. सदस्यांना जावे लागते उघड्यावरपंचायत समितीमधील स्वच्छतागृहाची दैनावस्था झाली आहे. त्यामुळे खुद्द पंचायत समिती सदस्यांना लघुशंकेसाठी उघड्यावर जाण्याची वेळ आली आहे.मागील मासिक सभेतील अनुपालनातील ठेवलेली प्रश्नांची उत्तरे नसल्यामुळे नियोजित सभा तहकूब झाली. कार्यालयात प्रोसिडिंग बुक उपलब्ध आहे.- संघमित्रा कोल्हे,गटविकास अधिकारी, सेलू.
पंचायत समितीची मासिक सभा तहकूब
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 12, 2019 5:00 AM
मासिक सभेत असणारे प्रोसिडिंग बूकच गायब करण्यासह टेबल उपलब्ध नसल्याचा प्रकार उघडकीस आला. यावेळी उपस्थित सभापती उपसभापती व पंचायत समिती सदस्य यांनी प्रचंड नाराजी व्यक्त करीत येथील कार्यरत विस्तार अधिकारी यांची तातडीने हकालपट्टी करण्याची मागणी वरिष्ठ अधिकारी यांच्याकडे करणार आहे.
ठळक मुद्देप्रोसिडिंग बुक टेबलवरुन गायब : कामचुकारपणा चव्हाट्यावर